AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अवघ्या 16 मिनिटात सामना रद्द झाला अन् अख्खं स्टेडियम रिकामं झालं, 5 मिनिटं उशीर झाला असता मृत्यूचं…

या सामन्यासाठी लोकांना बनावट तिकीट विकण्यात आले होते. त्यामुळे मोठ्या संख्येने लोक स्टेडियममध्ये आले. त्यामुळे एवढी मोठी दुर्घटना घडल्याचं सांगण्यात आलं.

अवघ्या 16 मिनिटात सामना रद्द झाला अन् अख्खं स्टेडियम रिकामं झालं, 5 मिनिटं उशीर झाला असता मृत्यूचं...
Stampede in Football StadiumImage Credit source: tv9 marathi
| Updated on: May 22, 2023 | 5:54 AM
Share

सॅन साल्वाडोर : फुटबॉलचा खेळ आणि अपघात, दुर्घटना याचं जुनच नातं आहे. अनेक फुटबॉल सामन्यात अत्यंत भयानक अपघात झाले आहेत. साल्वाडोर या छोट्याश्या देशातही अशीच एक भयानक घटना घडली आहे. येथील एका स्टेडियममध्ये अवघे 16 मिनिटे सामना रंगला. त्यानंतर अचानक लोकांमध्ये धावपळ उडाली. चेंगराचेंगरी झाली. त्यात 12 लोकांचा मृत्यू झाला. या दुर्घटनेत 500 लोक जखमी झाले आहेत. या घटनेमुळे सर्वच हादरून गेले आहेत.

मोनूमेंटल स्टेडियममध्ये ही घटना घडली. हे स्टेडियम साल्वाडोरच्या राजधानीपासून 25 मैल उत्तर पूर्वेत आहे. या स्टेडियममध्ये देशांतर्गत फुटबॉल सामना सुरु होता. क्वॉर्टर फायनल सुरू होती. एलियांजा क्लब आणि एफएएस क्लब दरम्यान हा सामना सुरू होता. या स्टेडियमची एकूण 44836 प्रेक्षकांची क्षमता आहे. एवढी मोठी प्रेक्षक संख्या असूनही हा सामना पाहण्यासाठी क्षमतेपेक्षा अधिक लोक स्टेडियममध्ये आले होते. त्यामुळे संपूर्ण स्टेडिय प्रेक्षकांनी खच्चून भरलं होतं. काही प्रेक्षकांना तर बसायलाही जागा नव्हती.

16 मिनिटानंतर मॅच सस्पेंड

स्टेडियममध्ये प्रेक्षकांची एवढी गर्दी झाली की त्यांनी उत्पात सुरू केला. प्रचंड हंगामा सुरू केला. त्यामुळे स्टेडियममध्ये खळबळ उडाली. स्टेडियममध्ये गोंधळ माजल्याने मॅच सुरू झाल्यानंतर अवघ्या 16 मिनिटात मॅच सस्पेंड करण्यात आली. स्टेडियममध्ये गोंधळ सुरू झाला. अफरातफरी निर्माण झाली. लोक इकडे तिकडे पळू लागले. त्यामुळे बसलेले लोकही उठून धावत सुटले आणि बघता बघता मोठी दुर्घटना घडली.

100 लोक रुग्णालयात

बघता बघता स्टेडियममध्ये चेंगराचेंगरी सुरू झाली. लोक एकमेकांच्या अंगावर पडले. जे खाली पडले त्यांच्या अंगावरून लोक धावत सुटले. त्यामुळे अनेकांना गुदमरायला झाले. या दुर्घटनेत 12 जणांचा मृत्यू झाला. तर 500 लोक जखमी झाले. त्यापैकी 100 जणांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. शहरातील विविध रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. यातील अनेकांची प्रकृती चिंताजनक असल्याचं सांगितलं जात आहे. तसेच आतापर्यंत 500 लोकांना बाहेर काढण्यात आल्याचं नॅशनल सिव्हिल पोलीसच्या संचालकांनी सांगितलं. सामना रद्द  करण्यात आल्यानंतर लगेचचं स्टेडियम रिकाम झालं. थोडा उशीर झाला असता, पाच मिनिटं जरी उशीर झाला असता तर होत्याचं नव्हतं झालं असतं असं अनेकांनी सांगितलं.

Stampede at football stadium

Stampede at football stadium

चौकशी होणार, कारवाई होणार

ही दुर्घटना कशी झाली? अचानक असं काय झालं? असा सवाल केला जात आहे. या सामन्यासाठी लोकांना बनावट तिकीट विकण्यात आले होते. त्यामुळे मोठ्या संख्येने लोक स्टेडियममध्ये आले. त्यामुळे एवढी मोठी दुर्घटना घडल्याचं सांगण्यात आलं. या दुर्घटनेची चौकशी करण्यात येणार आहे. चौकशीच्या प्रक्रियेलाही सुरुवात झाली आहे. तसेच स्थानिक पोलीस या प्रकरणाची फौजदारी चौकशीही करणार आहे.

या दुर्घटनेवर साल्वाडोर फुटबॉलने दु:ख व्यक्त केलं आहे. त्यांनी मृतांच्या प्रति संवेदना व्यक्त केली आहे. या संपूर्ण प्रकरणाची चौकशी होईल. मग ती टीम असो, मॅनेजर असो, स्टेडियम ऑर्गनायझर असो, तिकीट विक्रेते असो किंवा फेडरेशन असो. प्रत्येकाची चौकशी केली जाणार आहे, अशी माहिती साल्वाडोर फुटबॉलच्या अध्यक्षांनी दिली.

जसं पार्थ पवारांना माफ केलं तसं तपोवनातील झाडांना...मनसेकडून थेट इशारा
जसं पार्थ पवारांना माफ केलं तसं तपोवनातील झाडांना...मनसेकडून थेट इशारा.
मालवणमध्ये फिरायला जाताय? सिंधुदुर्गात जाणाऱ्या जेटीची अवस्था बघा!
मालवणमध्ये फिरायला जाताय? सिंधुदुर्गात जाणाऱ्या जेटीची अवस्था बघा!.
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?.
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला.
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन.
तपोवन वृक्षतोडीविरोधात मनसे नाशिककरांच्या सोबतीला, चित्रपट सेना आक्रमक
तपोवन वृक्षतोडीविरोधात मनसे नाशिककरांच्या सोबतीला, चित्रपट सेना आक्रमक.
फडणवीस सरकारच 1 वर्ष, मुख्यमंत्र्यांना किती मार्क? काय सांगतो सर्व्हे?
फडणवीस सरकारच 1 वर्ष, मुख्यमंत्र्यांना किती मार्क? काय सांगतो सर्व्हे?.
फोडाफोडीन नाराजी, वाक् युद्धानंतर आज शिंदे-रवींद्र चव्हाण एकाच मंचावर?
फोडाफोडीन नाराजी, वाक् युद्धानंतर आज शिंदे-रवींद्र चव्हाण एकाच मंचावर?.
फडणवीसांच्या इशाऱ्याने इतर पक्ष चालतात, कुणाच्या वक्तव्याची होते चर्चा
फडणवीसांच्या इशाऱ्याने इतर पक्ष चालतात, कुणाच्या वक्तव्याची होते चर्चा.
CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?
CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?.