PKL8 Bengaluru Bulls VS U Mumba : मुंबईचे धुरंधर बंगळुरुवर भारी, पहिल्याच सामन्यात 16 गुणांनी विजय

| Updated on: Dec 22, 2021 | 9:07 PM

मुंबईने या सामन्यात बंगळुरुवर 46-30 अशी मात केली आहे. मुंबईच्या अभिषेक सिंगने या सामन्यात तब्बल 19 पॉईंट्स मिळवत बंगळुरुचं कंबरडं मोडलं. त्याने 15 रेड पॉईंट्स आणि 4 बोनस पॉईंट्स मिळवले.

PKL8 Bengaluru Bulls VS U Mumba : मुंबईचे धुरंधर बंगळुरुवर भारी, पहिल्याच सामन्यात 16 गुणांनी विजय
Bengaluru Bulls vs U Mumba
Follow us on

बंगळरु : आजपासून प्रो कबड्डी लीगचा (Pro Kabaddi League ) थरार सुरु झाला आहे. ही स्पर्धा पुढचा महिनाभर 22 जानेवारी 2022 पर्यंत चालणार आहे. कोविडचा धोका लक्षात घेऊन बंगळुरुमध्ये हे सर्व सामने होत आहेत. दरम्यान, यंदाचा मोसमातील पहिला सामना बंगळुरु बुल्स विरुद्ध यू मुंबा यांच्यात खेळवण्यात आला. या उद्घाटनाच्या सामन्यात यू मुंबाने बेंगलुरु बुल्सवर 16 पॉईंट्सनी मात करत स्पर्धेत चांगली सुरुवात केली आहे. अभिषेक सिंग मुंबईच्या विजयाचा हिरो ठरला.

मुंबईने या सामन्यात बंगळुरुवर 46-30 अशी मात केली आहे. मुंबईच्या अभिषेक सिंगने या सामन्यात तब्बल 19 पॉईंट्स मिळवत बंगळुरुचं कंबरडं मोडलं. त्याने 15 रेड पॉईंट्स आणि 4 बोनस पॉईंट्स मिळवले. अभिषेकव्यतिरिक्त मुंबईच्या रेडर अजित कुमारने 6 पॉईंट्स मिळवले. तर मुंबईच्या बचाव फळीनेदेखील शानदार कामगिरी केली. हरेंद्र कुमारने 4 टॅकल पॉईंट्स मिळवले, तर आशिष कुमारने 3, रिंकूने 2 टॅकल पॉईंट्स मिळवले. कर्णधार फजल अत्राचली आणि मोहसेनने 1 टॅकल पॉईंट मिळवला.

बंगळुरुकडून रेडर चंद्रन रंजित आणि पवन कुमार सर्वात यशस्वी ठरले. रंजितने 12 पॉईंट्स मिळवले, त्यात 8 रेड आणि 4 बोनस पॉईंट्सचा समावेश होता. तर पवन कुमारनेदेखील 12 पॉईंट्स मिळवले. त्यात 7 रेड पॉईंट्स आणि 5 बोनस पॉईंट्सचा समावेश होता. भरतने 2 रेड पॉईंट्स मिळवले. बंगळुरुच्या बचाव फळीने सर्वांची निराशा केली. मयुर कदमने 2 आणि जी. बी. मोरे याने 1 टॅकल पॉईंट मिळवला. या दोघांव्यतिरिक्त बंगळुरुच्या कोणत्याही खेळाडूला चांगली कामगिरी करता आली नाही.

अभिषेक सिंगची ऐतिहासिक कामगिरी

या सामन्यात मुंबईने बंगळुरुला तब्बल तीन वेळा ऑल आऊट केलं. अभिषेक सिंगने त्याच्या प्रो कबड्डी कारकिर्दीतली सर्वोत्तम कामगिरी आज नोंदवली. सामन्याच्या पहिल्या हाफमध्ये अभिषेकने एकट्यानेच 14 पॉईंट्स मिळवले होते. तर पहिल्या स्ट्रॅटेजिक टाईमआऊटपर्यंत मुंबईने 32-24 आघाडी मिळवली होती. दुसऱ्या हाफमध्ये ही आघाडी थोडी कमी झाली होती. 34-29 अशी स्थिती झाली होती. मात्र मुंबईच्या खेळाडूंनी पुन्हा जोरदार कमबॅक करत बंगळुरुला खूप मागे टाकलं.

इतर बातम्या

PKL 2021-22 LIVE Score and Updates, Bengaluru Bulls VS U Mumba : अभिषेक सिंगची शानदार कामगिरी, यू मुंबाची बेंगलुरुवर 46-30 अशी मात

PKL8: महाराष्ट्राचा सुपुत्र यूपीचा आधारस्तंभ, हलाखीच्या परिस्थितीवर मात करणाऱ्या श्रीकांत जाधवची गोष्ट

परभणीत आजपासून कबड्डीचा दम घुमणार, महाराष्ट्रातील नवीन टॅलेंट येणार समोर