विनेश फोगाटचं एशियन गेम्स स्पर्धेत भाग घेण्याचं स्वप्न भंगलं, उपांत्य फेरीत 6-4 ने मिळाली मात; पण…

एशियन्स गेम्स 2026 स्पर्धेपूर्वी पार पडलेल्या चाचणी स्पर्धेत विनेश फोगाटला पराभवाचं तोंड पाहावं लागलं. उपांत्य फेरीच्या लढतीत कुस्तीपटू मीनाक्षीने तिला 6-4 ने मात दिली. पण पराभवानंतरही विनेश स्पर्धेत भाग घेण्यासाठी जिद्द कायम ठेवली आहे.

विनेश फोगाटचं एशियन गेम्स स्पर्धेत भाग घेण्याचं स्वप्न भंगलं, उपांत्य फेरीत 6-4 ने मिळाली मात; पण...
विनेश फोगाटचं एशियन गेम्स स्पर्धेत भाग घेण्याचं स्वप्न भंगलं, उपांत्य फेरीत 6-4 ने मिळाली मात; पण...
Image Credit source: PTI
| Updated on: May 30, 2026 | 8:04 PM

एशियन्स गेम्स 2026 स्पर्धा 19 सप्टेंबरपासून सुरू होणार आहे. ही स्पर्धा 4 ऑक्टोबरला संपणार आहे. या स्पर्धेत क्रिकेटसह 43 विविध खेळांचा समावेश आहे. एशियन्स गेम्स 2026 स्पर्धेतील पात्रतेसाठी दिल्लीत निवड चाचणी स्पर्धा पार पडली. या स्पर्धेत भाग घेण्यासाठी सुप्रीम कोर्टाकडून तिला हिरवा कंदील मिळाला होता. त्यामुळे तिच्या कामगिरीकडे लक्ष लागून होतं. पण या स्पर्धेत विनेश फोगाट अपयशी ठरली. उपांत्य फेरीत मीनाक्षीने तिला 4-6 ने मात दिली. त्यामुळे आठ वर्षानंतर एशियन्स गेम्समध्ये पुनरागमन करण्याची संधी हुकली. विनेश फोगाट 53 किलो वजनी गटाच्या निवड चाचणी उपांत्य फेरीत पराभूत झाली. पराभवामुळे विनेशचा पुनरागमन करण्याचा प्रयत्न फसला आहे. या वर्षाच्या अखेरीस जपानमधील आयची-नागोया येथे होणाऱ्या एशियन्स गेम्ससाठी पात्र ठरण्याची तिची संधी संपुष्टात आली. असं असताना विनेश फोगाट म्हणाली की, “मला प्रत्येक मुद्द्यासाठी लढावे लागले. मला योग्य न्याय मिळाला नाही.”

चाचणी स्पर्धेत विनेश कोणत्या गटातून खेळणार यावरून वादाची ठिणगी पडली होती. त्यानंतर तिला फक्त 50 किलो गटातच स्पर्धा करण्याची परवानगी असल्याचं सांगितलं. कारण पॅरिस ऑलिम्पिकसह तिने मागच्या चार आंतरराष्ट्रीय स्पर्धेत याच गटातून भाग घेतला होता. पण विनेशने यावर आक्षेप नोंदवला. त्यानंतर तिने पसंतीच्या गटातून खेळण्याची मागणी केली. विनेशचं वजन 53.9 किलोग्रॅम असल्याने तिला 53 किलो वजनी गटात ठेवलं गेलं. भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष संजय सिंह म्हणाले की, “विनेशने आरोप केल्यानंतर, आम्ही अधिकाऱ्यांना तिचे वजन मोजण्याची परवानगी दिली. आम्हाला कोणाशीही भेदभाव करायचा नाही. तिला कोणत्या गटात स्पर्धा करायची आहे हे तिने स्पष्ट केले नाही, तरीही आम्ही तिला परवानगी देत ​​आहोत.”

उपांत्यपूर्व लढतीत काय झालं?

उपांत्यपूर्व फेरीत विनेश फोगाटचा सामना निशूसोबत झाला. या सामन्यात अतितटीची लढत झाली.खडतर लढतीत कोण बाजी मारेल याची उत्सुकता होती. पण शेवटच्या क्षणी आपल्या अनुभवाच्या जोरावर विनेशने बाजी मारली. या सामन्यात 7-6 असा निसटता विजय मिळवला आणि अव्वल चारमध्ये स्थान पटकावले. पण उपांत्य फेरीत तिच्या आशा संपुष्टात आल्या. एशियन गेम्ससाठी पात्र ठरण्याच्या आपल्या ध्येयापासून विनेश केवळ दोन विजय दूर राहिली.

 

Follow Us