News9 Corporate Badminton Championship 2025 स्पर्धेसाठी कॅटेगरी काय? जाणून घ्या
पुलेला गोपीचंद बॅडमिंटन अकादमीमध्ये होणारी न्यूज9 कॉर्पोरेट बॅडमिंटन चॅम्पियनशिप 2025 या स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं आहे. कंपन्यांना कर्मचाऱ्यांच्या सहभागाला चालना देण्यासाठी, ब्रँड प्रतिमा सुधारण्यासाठी आणि खेळाद्वारे नेतृत्व विकासाला चालना देण्यासाठी एक अनोखी संधी या माध्यमातून मिळणार आहे.

भारत एक क्रीडा राष्ट्र म्हणून उदयास येत आहे. गेल्या काही वर्षांपासून टीव्ही 9 नेटवर्क यासाठी प्रयत्न करत आहे. या प्रयत्नांना यश मिळताना दिसत आहे. आता या प्रतिबद्धतेला पुढे नेत टीव्ही9 नेटवर्कने देशात क्रीडा संस्कृती वाढवण्यासाठी अनेक उपक्रम सुरू केले आहेत. कॉर्पोरेट कप फुटबॉलच्या भव्य यशानंतर, टीव्ही9 न्यूज9 कॉर्पोरेट बॅडमिंटन चॅम्पियनशिपसह आणखी एक विक्रम मोडण्यास सज्ज आहे. न्यूज 9 कॉर्पोरेट बॅडमिंटन चॅम्पियनशिप ही क्रीडा स्पर्धा व्यावसायिक, कॉर्पोरेट संघ आणि व्यावसायिकांना स्पर्धात्मक वातावरणात एकत्रित आणण्यासाठी प्रयत्नशील आहे. या माध्यमातून फिटनेस आणि काम-जीवन संतुलनाला प्रोत्साहन देण्याची संधी मिळणार आहे. अनौपचारिक आणि मजेदार वातावरणात व्यावसायिक नेटवर्क तयार करण्यास मदत होईल. टीमवर्क आणि निरोगी स्पर्धेला प्रोत्साहन या माध्यमातून मिळणार आहे. पद्मश्री पुलेला गोपीचंद यांच्या सहकार्याने ही स्पर्धा आयोजित केली जाईल. ही 3 दिवसांची स्पर्धा (9 ते 11 मे) हैदराबादमधील पुलेला गोपीचंद बॅडमिंटन अकादमी आयोजित करण्यात आली आहे.
या स्पर्धेत कोण भाग घेऊ शकतं? काय कॅटेगरी आहेत?
न्यूज9 कॉर्पोरेट बॅडमिंटन चॅम्पियनशिप 2025 मध्ये पुरुष गटात एकेरी आणि मिश्र दुहेरीचे सामने असतील. यामध्ये प्रत्येक कॉर्पोरेट अनेक संघांची नोंदणी करू शकते. तर खुल्या गटात पुरुष एकेरी, महिला एकेरी आणि मिश्र दुहेरीचे सामने खेळवले जातील. यासाठी पुलेला गोपीचंद बॅडमिंटन अकादमीतील तज्ज्ञांनी दोन दिवसांचे प्रशिक्षण सत्र देखील आयोजित केले आहे. ही स्पर्धा राउंड रॉबिन पद्धतीने खेळवली जाईल. प्रत्येक संघाने स्वतःची नोंदणी करणे आवश्यक आहे. या स्पर्धेत फक्त अशा कंपन्या आणि एलएलपी सहभागी होऊ शकतील ज्या 2 वर्षांहून अधिक काळापासून स्थापन झाल्या आहेत. तसेच किमान कर्मचारी 10 आहेत.
बक्षिसांची रक्कम
पुरुष श्रेणीतील पहिल्या विजेत्याला रोख बक्षीस 1,50,000 रुपये मिळेल. उपविजेत्याला 1 लाख रुपये, तर दुसऱ्या उपविजेत्याला 50 हजार रुपये मिळतील. तर मुक्त श्रेणीत पहिल्या विजेत्याला 25 हजार, पहिल्या उपविजेत्याला 15 हजार, तर दुसऱ्या उपविजेत्याला 5 हजार रुपये मिळतील. पहिल्या विजेत्याला पुलेला गोपीचंद बॅडमिंटन अकादमीमध्ये दोन दिवसांचे प्रशिक्षण सत्र मिळेल. इतकंच काय तर पहिल्या विजेत्याला भारतात होणाऱ्या बॅडमिंटन ओपन चॅम्पियनशिपसाठी विशेष आमंत्रण मिळेल.
