
टीव्ही 9 नेटवर्कच्या माध्यमातून अनेक लोकपयोगी उपक्रम राबवले जातात. क्रीडाक्षेत्रात उदयोन्मुख खेळाडूंना व्यासपीठ मिळावं म्हणून नुकतंच इंडियन टायगर्स अँड टायग्रेसेस या उपक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. त्यानंतर कॉर्पोरेट फुटबॉल कप स्पर्धाही भरवली होती. या उपक्रमांना भरभरून प्रतिसाद मिळाला. तसेच या स्पर्धा यशस्वीरित्या पार पडल्या. आता टीव्ही 9 नेटवर्कने कॉर्पोरेट जगतासाठी एक पाऊल टाकलं आहे. धकाधकीच्या आयुष्यात बऱ्याच गोष्टी मागे सुटून जातात. इतकंच करण्याची भरपूर इच्छा असते पण व्यासपीठ मिळत नाही. अशा स्थितीत आपल्यातील खेळाडूवृत्तीला हवा तसा वाव मिळत नाही. हीच बाब लक्षात घेऊन टीव्ही 9 नेटवर्कने स्पर्धेचं आयोजन केलं आहे. वाढत्या कॉर्पोरेट आव्हानांना तोंड देण्यासाठी आणि संघटनांना मदत करण्यासाठी ही स्पर्धा तयार करण्यात आली आहे.पद्मश्री पुलेला गोपीचंद यांच्या सहकार्याने ही स्पर्धा आयोजित केली जाईल. तीन दिवसांची स्पर्धा असून 9 मे ते 11 मे दरम्यान हैदराबादमधील पुलेला गोपीचंद बॅडमिंटन अकादमी आयोजित केली जाणार आहे.
टीव्ही 9 नेटवर्कने कॉर्पोरेट जगात असणाऱ्या प्रत्येकाचं हीत लक्षात घेऊन या स्पर्धेचं आयोजन केलं आहे. कॉर्पोरेट क्षेत्रात काम करणाऱ्यांचं आरोग्य, सहकार्य आणि सौहार्द वाढवण्यासाठी ही स्पर्धा आयोजित केली आहे. या माध्यमातून तुमच्यातील खेळाडूला एक व्यासपीठ मिळणार आहे. फिटनेससोबतच कामाचं संतुलन राखण्यासाठी, मजेशीर वातावरणात व्यावसायिक नेटवर्क तयार करण्याचा हेतू आहे. यामुळे टीमवर्कसह निरोगी स्पर्धेला प्रोत्साहन मिळणार आहे. तसेच तुमची आवड जगण्याची संधी मिळणार आहे. इतकंच या माध्यमातून कॉर्पोरेट जगताला नवं व्यासपीठ मिळणार आहे.
या स्पर्धेत भाग घेण्यासाठी काही नियम आणि अटी आहेत. ज्या कंपन्या आणि एलएलपीची स्थापना होऊन दोन वर्षांहून अधिक काल लोटला आहे. तसेच कंपन्यांमध्ये कमीत कमी 10 कर्मचारी आहेत. अशा कंपन्या यात भाग घेऊ शकतात. जर तुम्हाला या स्पर्धेत भाग घ्यायचा असेल तर www.news9corporatecup.com आणि corporatecup@tv9.com च्या माध्यमातून रजिस्टर करू शकता.