Pakistan Tour New Zeland | पाकिस्तानला ‘सातवा’ झटका, आणखी एका खेळाडूला कोरोनाची लागण

| Updated on: Nov 28, 2020 | 5:19 PM

पाकिस्तान न्यूझीलंड दौऱ्यात टी 20 आणि कसोटी मालिका खेळणार आहे.

Pakistan Tour New Zeland | पाकिस्तानला सातवा झटका, आणखी एका खेळाडूला कोरोनाची लागण
Follow us on

वेलिंग्टन : पाकिस्तान क्रिकेट संघाच्या आणखी एका खेळाडूला कोरोनाची लागण झाली आहे. न्यूझीलंडच्या आरोग्य विभागाने याबाबतीत माहिती दिली आहे. कोरोना झालेल्या खेळाडूचे नाव गुप्त ठेवण्यात आले आहे. कोरोना झालेला हा खेळाडू सातवा खेळाडू ठरला आहे. याआधी पाकिस्तानच्या एकूण 6 खेळाडूंना कोरोनाची लागण झाली आहे. पाकिस्तानचा संघ सध्या न्यूझीलंड दौऱ्यावर ( Pakistan Tour New Zealand) आहे. pakistan tour new zealand new case of corona in pakistan team 7th member positive in new zealand

पाकिस्तानचा संघ मंगळवारी 24 नोव्हेंबरला न्यूझीलंड दौऱ्यावर पोहचला होता. यानंतर पाकिस्तानच्या खेळाडूंसह इतर सपोर्ट स्टाफची कोरोना चाचणी करण्यात आली होती. या चाचणीतील एकूण 6 खेळाडू हे पॉझिटिव्ह सापडले होते. त्यामुळे पाकिस्तानच्या कोरोना खेळाडूंची संख्या 7 इतकी झाली आहे. कोरोना पॉझिटिव्ह सापडलेल्या खेळाडूला इतर 6 खेळाडूंसह स्वतंत्र्यरित्या क्वारंटाईन करण्यात आलं आहे.

या 7 व्या खेळाडूला कोरोनाची लागण झाल्याची माहिती शुक्रवारी प्राप्त झाली. शुक्रवारी पाकिस्तानच्या खेळाडूंना क्वारंटाईन होवून 3 दिवस झाले होते. यादरम्यान सर्व खेळाडूंची पुन्हा एकदा कोरोना चाचणी करण्यात आली. न्यूझीलंडच्या नियमांनुसार क्वारंटाईन केल्यानंतरच्या 3 ऱ्या आणि 12 व्या दिवशी कोरोना चाचणी करण्यात येते.

मंगळवारी न्यूझीलंडमध्ये पोहचलेल्या पाकिस्तानी संघाला 14 दिवस क्वारंटाईन करण्यात आलं आहे. न्यूझीलंडच्या नियमांनुसार 14 दिवसांच्या क्वारंटाईन कालावधीमधील तिसऱ्या आणि बाराव्या दिवशी चाचणी केली जाते.

छोट्या गटातही सराव करता येणार नाही

पाकिस्तानच्या खेळाडूंना आता छोटे गट करुन सरावही करता येणार नाही. पाकिस्तानच्या संघाने न्यूझीलंडमध्ये पोहचल्यानंतर पहिल्याच दिवशी कोरोना नियमांचं उल्लंघनं केलं होतं. त्यामुळे पाकिस्तानच्या खेळाडूंना न्यूझीलंडच्या अधिकाऱ्यांनी शेवटचा इशारा दिला होता. यामुळे पाकिस्तानला 3 दिवसांच्या क्वारंटाईन कालावधीनंतर सरावातची परवानगी मिळणार होती. मात्र आता सराव करता येणार नाही. पाकिस्तानच्या खेळाडूंनी पुन्हा नियमाचं उल्लंघन केलं नाही, तर त्यांना सरावाची परवानगी मिळू शकते.

नियमांचं उल्लंघन, नक्की काय घडलं?

पाकिस्तानच्या खेळाडूंना ख्राईस्टचर्च येथील हॉटेलमध्ये क्वारंटाईन करण्यात आलं. या हॉटेलमध्ये पाकिस्तानचे काही खेळाडू विनामास्क फिरताना आढळले. तसेच काही खेळाडूंनी विनामास्कशिवाय हॉटेलमधील कर्मचाऱ्यांकडून जेवण स्वीकारलं. तसंच हे खेळाडू आपसात बोलतही होते. हा सर्व प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला. यामुळे न्यूझीलंडचे अधिकारी संतापले. पुन्हा नियमांचं उल्लंघन केलं, तर मायदेशी परत पाठवू अशी धमकीच पाकिस्तानच्या खेळाडूंना दिली. दरम्यान तेव्हापासून पाकिस्तानी संघ नियमांचं कोटेकोरपणे पालन करत आहे.

लाहोरमध्ये सर्व खेळाडू निगेटीव्ह

पाकिस्तानचा संघ न्यूझीलंड दौऱ्यावर निघाला होता. त्याआधी लाहोरमध्ये सर्व खेळाडूंची कोरोना चाचणी करण्यात आली. मात्र तेव्हा सर्व खेळाडूंची चाचणी निगेटिव्ह आली होती. मात्र न्यूझीलंडमध्ये दाखल झाल्यानंतर 6 खेळाडूंची करोना चाचणी पॉझिटिव्ह आली. विशेष म्हणजे या 6 पैकी 2 खेळाडूंना कोरोनाची लक्षणं होती, अशी महिती न्यूझीलंड क्रिकेट बोर्डाने दिली होती.

असा आहे न्यूझीलंड दौरा

पाकिस्तान या दौऱ्यात न्यूझीलंडविरुद्ध 3 टी 20 आणि 2 कसोटी सामन्यांची मालिका खेळणार आहे. या दौऱ्याची सुरुवात 20 डिसेंबरपासून होणार आहे. कोरोनानंतरचा पाकिस्तानचा हा दुसरा दौरा आहे. याआधी पाकिस्तानचा संघ इंग्लंड दौऱ्यावर गेला होता. या दौऱ्यामध्ये इंग्लंडने पाकिस्तानचा कसोटी मालिकेत 0-1 असा पराभव केला. तर पाकिस्तना टी 20 मालिका बरोबरीत सोडवण्यात यश आलं. 2 टी सामन्यांच्या मालिकेत पाकिस्तान आणि इंग्लंडन प्रत्येकी 1 सामना जिंकला होता.

संबंधित बातम्या :

Pakistan Tour New Zealand | पाकिस्तानच्या खेळाडूंकडून कोरोना नियमांचं उल्लंघन, न्यूझीलंडच्या अधिकाऱ्यांचा पारा चढला

Pakistan Tour New Zealand | न्यूझीलंड दौऱ्यावर गेलेल्या पाकिस्तानच्या 6 खेळाडू्ंना कोरोनाची लागण

pakistan tour new zealand new case of corona in pakistan team 7th member positive in new zealand