
भारत आणि पाकिस्तान सामना म्हटले की संपूर्ण देशात तणावाचे वातावरण असते. नुकताच झालेल्या आशिया कप 2025मध्ये भारत आणि पाकिस्तान सामना झाला. पण हा सामना केवळ मैदानापुरता मर्यादित राहिला नाही तर त्यामुळे संपूर्ण देशात संतापाची लाट पाहायला मिळाली. सोशल मीडियावर चांगलेत शाब्दिक वार पाहिले मिळाले. आशिया कपमधील सामन्या दरम्यान पाकिस्तानी खेळाडूंची कृत्ये ही वादग्रस्त होती. पण भारतीय खेळांडूंनी त्यांना त्यांची जागा दाखवली. दरम्यान, सोशल मीडियावर एका पाकिस्तानी खेळाडूचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये तो शिखर धवनला थोबडवण्याविषयी बोलत आहे.
काय आहे प्रकरण?
भारत आणि पाकिस्तान सामना झाल्यानंतरही दोन्ही संघांमधील वैर आणखी तीव्र झाले आहे. फायनलमध्ये भारताने पाकिस्तानचा दणदणीत पराभव केला. दरम्यान, पाकिस्तानच्या खेळाडूने मला शिखर धवनला थोबडावायचंय असे वादग्रस्त वक्तव्य केले आहे. त्याच्या या वक्तव्याच्या व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होताना दिसत आहे. अनेकजण यावर कमेंट करत पाकिस्तानी खेळाडूला सुनावत आहेत.
वाचा: गौतमी पाटीलची दर महिन्याची कमाई किती? आकडा वाचून फुटेल घाम
Bsdk Abrar Ahmed Aukaat dekh kar baat Kiya kar, maarke jameen me 10 foot gaadh dega tujhe shikhar Dhawan pic.twitter.com/IUU6MDHeiC
— Ritik (@ThenNowForeve) October 4, 2025
व्हिडीओमध्ये नेमकं काय?
हा क्रिकेटपटू दुसरा तिसरा कोणी नसून पाकिस्तानचा फिरकीपटू अबरार अहमद (Abrar Ahmed) आहे. त्याला एका मुलाखतीदरम्यान विचारण्यात आले होते की, “जगात कोणत्या खेळाडूसोबत तू बॉक्सिंग करायला आवडेल? कोणावर जास्त राग येतो?” त्यावर अबरारने उत्तर देत, “मला बॉक्सिंग करायचं आहे आणि माझ्यासमोर शिखर धवन (Shikhar Dhawan) उभा असावा” अशी इच्छा व्यक्त केली आहे. त्याच्या या विधानाची सध्या जोरदार चर्चा सुरु आहे.
शिखर धवन होता चर्चेत
भारताचा माजी डावखुरा सलामीवीर शिखर धवन गेल्या काही दिवसांपासून चांगलाच चर्चेत आहे. त्याने पाकिस्तानचा माजी कर्णधार शाहिद आफ्रिदीला सोशल मीडियावर चांगलेच सुनावले होते. दोघांमधील शाब्दिक वार चर्चेचा विषय ठरला होता. त्यानंतर धवनने वर्ल्ड चॅम्पियनशिप ऑफ लेजेंड्स स्पर्धेत पाकिस्तानविरुद्धचा सामना खेळण्यास नकार दिला होता. त्या पाकिस्तानी संघात शाहिद आफ्रिदीसह अनेक दिग्गज खेळाडू होते.