IndvsAus: कप्तान-उपकप्तानाने भारताचं जहाज सुस्थितीत पोहोचवलं

पर्थ: ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या दुसऱ्या कसोटीत टीम इंडियाच्या कर्णधार-उपकर्णधाराने भारताची पडझड रोखली. विराट कोहली आणि अजिंक्य रहाणे यांच्या नाबाद खेळीच्या जोरावर भारताने दुसऱ्या दिवसअखेर 3 बाद 172 अशी मजल मारली आहे. विराट कोहली नाबाद 82 आणि  अजिंक्य रहाणे 51 धावांवर खेळत आहेत. भारत अद्याप 154 धावांनी पिछाडीवर आहे. या कसोटीत ऑस्ट्रेलियाचा पहिला डाव 326 धावांत आटोपला. ऑस्ट्रेलियाला …

IndvsAus: कप्तान-उपकप्तानाने भारताचं जहाज सुस्थितीत पोहोचवलं

पर्थ: ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या दुसऱ्या कसोटीत टीम इंडियाच्या कर्णधार-उपकर्णधाराने भारताची पडझड रोखली. विराट कोहली आणि अजिंक्य रहाणे यांच्या नाबाद खेळीच्या जोरावर भारताने दुसऱ्या दिवसअखेर 3 बाद 172 अशी मजल मारली आहे. विराट कोहली नाबाद 82 आणि  अजिंक्य रहाणे 51 धावांवर खेळत आहेत. भारत अद्याप 154 धावांनी पिछाडीवर आहे. या कसोटीत ऑस्ट्रेलियाचा पहिला डाव 326 धावांत आटोपला.

ऑस्ट्रेलियाला गुंडाळल्यानंतर भारतीय सलामीवीर मुरली विजय आणि के एल राहुल फलंदाजीसाठी मैदानात आले. मात्र या दोघांनीही मागचा कित्ता पुन्हा गिरवला. मुरली विजय शून्यावर तर के एल राहुल 2 धावांवर माघारी परतला. त्यानंतर हुकमी फलंदाज चेतेश्वर पुजाराने तब्बल 103 चेंडू खेळून काढत पडझड रोखली. मात्र 103 चेंडूत 24 धावा करुन तो माघारी परतला. मिचेल स्टार्कने विकेटकीपर पेनकरवी त्याला झेलबाद केलं. पुजारा बाद झाला तेव्हा भारताची अवस्था 3 बाद 82 होती.

पुजारा-विराट कोहलीने तिसऱ्या विकेटसाठी 74 धावांची भागीदारी रचली. पुजारा बाद झाल्यानंतर विराटच्या साथीला उपकर्णधार अजिंक्य रहाणे आला. रहाणेचा सध्याचा फॉर्म पाहता तो विराटला कितपत साथ देईल याबाबत शंकाच होती. मात्र रहाणे नेटाने उभा राहिला.  टीम इंडियाच्या कप्तान-उपकप्तानाने भारताचं संकटात सापडलेलं जहाज आधी बाहेर काढलं. मग दोघांनी वैयक्तिक अर्धशतकं पूर्ण केली आणि  त्यानंतर टीम इंडियाला दिवसअखेर 3 बाद 172 अशा सुस्थितीत पोहोचवलं.

रहाणेने 103 चेंडूत 6 चौकार आणि 1 षटकारासह नाबाद 51 धावा केल्या. तर विराट कोहलीने 181 चेंडूत 9 चौकारांसह नाबाद 82 धावा केल्या.

संबंंधित बातम्या 

IndvsAus : ऑस्ट्रेलिया सुस्थितीत, शेपूट गुंडाळण्याचं भारताला आव्हान 

 

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *