AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताची यशाला गवसणी, PM मोदी म्हणाले – अभिमानाचा क्षण

आशियाई क्रीडा स्पर्धेच्य इतिहासात भारताने आतापर्यंतची सर्वात चमकदार कामगिरी केली आहे. भारताने आतापर्यंत 74 पदके जिंकली आहेत. यामध्ये 16 सुवर्ण, 27 रौप्य आणि 31 कांस्यपदकांचा समावेश आहे. पीएम मोदी यांनी देखील या कामगिरीसाठी खेळाडूंचे कौतूक केले आहे.

आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताची यशाला गवसणी, PM मोदी म्हणाले - अभिमानाचा क्षण
| Updated on: Oct 04, 2023 | 5:20 PM
Share

Asian Games 2023 : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताच्या ऐतिहासिक कामगिरीबद्दल अभिमान असल्याचं म्हटलं आहे. पंतप्रधानांनी ट्विट करून भारतीय खेळाडूंच्या कामगिरीचं कौतूक केले आहे. आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताने चांगली कामगिरी केली आहे. देशासाठी हा अभिमानाचा क्षण असल्याचं पीएम मोदी यांनी म्हटले आहे. प्रत्येक पदक कठोर परिश्रम आणि आवड दर्शवते. असं मोदींनी म्हटले आहे.

आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताने पहिल्यांदाच नवा इतिहास लिहिला आहे. भारताने आतापर्यंत 74 पदके जिंकली आहेत. यामध्ये 16 सुवर्ण, 27 रौप्य आणि 31 कांस्यपदकांचा समावेश आहे. 2018 आशियाई स्पर्धेत भारताने एकूण 70 पदके जिंकली गेली, ज्यात 16 सुवर्ण पदकांचा समावेश आहे. तिरंदाजीच्या कंपाऊंड मिश्र सांघिक स्पर्धेत भारताने 16 वे सुवर्णपदक जिंकले. या स्पर्धेत त्याने दक्षिण कोरियाचा पराभव केला.

आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताची चमकदार कामगिरी

71 पदक जिंकत भारताने आतापर्यंतची सर्वोत्कृष्ट कामगिरी केली आहे  असं पंतप्रधान नरेंद्र मोदी (narendra modi) यांनी म्हटलं आहे.

रँकिंगबद्दल बोलायचे झाले तर भारत पदकतालिकेत चौथ्या स्थानावर आहे. यजमान देश चीन पदकतालिकेत पहिल्या स्थानावर आहे. चीनने एकूण 304 पदके जिंकली आहेत. यामध्ये 166 सुवर्ण, 91 रौप्य आणि 47 कांस्य पदकांचा समावेश आहे. जपान 135 पदकांसह (34 सुवर्ण, 49 रौप्य आणि 52 कांस्य) दुसऱ्या स्थानावर आहे. कोरियाचे प्रजासत्ताक १४२ पदकांसह तिसऱ्या स्थानावर आहे. त्याने 32 सुवर्ण, 44 रौप्य आणि 66 कांस्य पदके जिंकली आहेत.

मागील एशियन गेम्समधील भारताची कामगिरी

वर्ष सुवर्ण रौप्य कांस्य एकूण
2010 14 17 34 65
2014 11 10 36 57
2018 16 23 31 70
2023 16 27 31 74*
मुंबईत चौरंगी लढत, ठाकरेंना टेंशन? बदलत्या राजकीय समीकरणांचे चित्र
मुंबईत चौरंगी लढत, ठाकरेंना टेंशन? बदलत्या राजकीय समीकरणांचे चित्र.
मोदी, ईव्हीएममुळे भाजपचा माज; राज ठाकरेंचा हल्लाबोल, कशाववरून निशाणा?
मोदी, ईव्हीएममुळे भाजपचा माज; राज ठाकरेंचा हल्लाबोल, कशाववरून निशाणा?.
पुणे, पिंपरी चिंचवडमध्ये दोन्ही NCP एकत्र, जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला
पुणे, पिंपरी चिंचवडमध्ये दोन्ही NCP एकत्र, जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला.
घड्याळ्याशी घरोबा, तुतारीचा खेळखंडोबा? नेत्यांची पक्षाला सोडचिठ्ठी
घड्याळ्याशी घरोबा, तुतारीचा खेळखंडोबा? नेत्यांची पक्षाला सोडचिठ्ठी.
तिकीट वाटपावरून निष्ठावंतांचा उद्रेक, उपऱ्यांना उमेदवारी अन्....
तिकीट वाटपावरून निष्ठावंतांचा उद्रेक, उपऱ्यांना उमेदवारी अन्.....
शिवसेनेला मत देणारे स्वर्गात जाणार, शहाजीबापू पाटलांचे अजब वक्तव्य
शिवसेनेला मत देणारे स्वर्गात जाणार, शहाजीबापू पाटलांचे अजब वक्तव्य.
कोकणी मतांसाठी भाजपकडून नारायण राणेंवर मोठी जबाबदारी
कोकणी मतांसाठी भाजपकडून नारायण राणेंवर मोठी जबाबदारी.
दिनकर पाटलांना विजयाची खात्री, उमेदवारी अर्ज भरल्यावर म्हणाले...
दिनकर पाटलांना विजयाची खात्री, उमेदवारी अर्ज भरल्यावर म्हणाले....
भाजपची माजी नगरसेविका बंडखोरीच्या तयारीत, पत्राद्वारे भावनिक आवाहन
भाजपची माजी नगरसेविका बंडखोरीच्या तयारीत, पत्राद्वारे भावनिक आवाहन.
आम्हाला न्याय द्या, नाराज इच्छुकांची ठाकरेंकडे मागणी, मातोश्री बाहेर..
आम्हाला न्याय द्या, नाराज इच्छुकांची ठाकरेंकडे मागणी, मातोश्री बाहेर...