Prithvi Shaw : पृथ्वी शॉकडे पुन्हा दुर्लक्ष, बांगलादेश दौऱ्यावर भारत अ संघात स्थान नाही

बीसीसीआयने निवड समिती बरखास्त केली.

Prithvi Shaw : पृथ्वी शॉकडे पुन्हा दुर्लक्ष, बांगलादेश दौऱ्यावर भारत अ संघात स्थान नाही
prithvi shaw
Image Credit source: twitter
| Updated on: Nov 24, 2022 | 1:12 PM

मुंबई: टीम इंडियाचा (Team India)खेळाडू पृथ्वी शॉ (Prithvi Shaw) यांच्या निवड समिती वारंवार दुर्लक्ष करीत असल्याचे पाहावयास मिळत आहे. ज्यावेळी न्यूझिलंड (NZ) दौऱ्यासाठी टीम इंडिया जाहीर झाली त्यावेळी सुद्धा त्याची निवड न झाल्याने तो निराश झाला होता. त्यानंतर बांगलादेशविरुद्ध सुद्धा त्याची निवड झाली नाही, त्यावेळी त्याने इंन्स्टाग्रामवरती इमोशनल पोस्ट केली होती.

आतापर्यंत पृथ्वी शॉने देशभरात क्रिकेट खेळत असताना चांगली कामगिरी केली. विशेष म्हणजे भारतात होणाऱ्या आयपीएल स्पर्धेत विविध टीमकडून त्याने आतापर्यंत अनेक गोलंदाजांची धुलाई केली आहे.

विश्वचषक स्पर्धेत लाजीरवाणा पराभव झाल्यानंतर टीम इंडियामध्ये मोठा बदल होणार असल्याची माहिती बीसीसीआयच्या सुत्रांनी दिली होती. त्यानंतर बीसीसीआयने निवड समिती बरखास्त केली. नव्या निवड समितीची प्रक्रिया सुरु झाली आहे.

पुढच्या महिन्यात टीम इंडियाचा झिम्बाब्वे दौरा होणार आहे. त्यामध्ये एकदिवसीय आणि कसोटी सामने होणार आहेत. त्याच्या आगोदर टीम इंडियाचा अ संघ झिम्बाब्वे विरुद्ध चार एकदिवसीय सामने खेळणार आहे. त्या टीममध्ये पृथ्वी शॉला संधी देण्यात आलेली नाही.

अभिमन्यू ईश्वरन (क), रोहन कुनुमल, यशस्वी जैस्वाल, यश धुल्ल, सरफराज खान, टिळक वर्मा, उपेंद्र यादव (विकेटकीपर), सौरभ कुमार, राहुल चहर, जयंत यादव, मुकेश कुमार, नवदीप सैनी, अतित शेठ, चेतेश्वर पुजारा, उमेश यादव. आणि केएस भरत.