AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Commonwealth Games 2022 IND vs PAK: राष्ट्रकुलमध्ये भारताची चमकदार कामगिरी; बॅडमिंटनच्या मिश्र सांघिकमध्ये पाकिस्तानचा 5-0 ने पराभव

भारतीय संघाकडून पाकिस्तानचा 5-0 अशा फरकाने पराभव करण्यात आला. अंतिम सामन्यावेळी गायत्री गोपीचंद-त्रिशा जॉली यांनी माहूर शहजाद आणि गझला सिद्दीकी या जोडीचा 21-4 आणि 21-5 असा पराभव केला.

Commonwealth Games 2022 IND vs PAK: राष्ट्रकुलमध्ये भारताची चमकदार कामगिरी; बॅडमिंटनच्या मिश्र सांघिकमध्ये पाकिस्तानचा 5-0 ने पराभव
| Updated on: Jul 29, 2022 | 10:11 PM
Share

नवी दिल्लीः बॅडमिंटनच्या मिश्र सांघिक स्पर्धेत (Badminton in mixed team competition)  भारत आणि पाकिस्तान (India Vs Pakistan) यांच्यात जोरदार सामना झाला. भारतीय संघानेही चमकदार कामगिरी करत पाकिस्तानचा 5-0 ने पराभव केला. राष्ट्रकुल स्पर्धेत (Commonwealth Games) स्टार खेळाडूंसोबतच भारतीय संघात युवा खेळाडूंचाही भरणा करण्यात आला आहे. गेल्या वेळी जेव्हा दोन्ही संघ आमनेसामने आले होते, तेव्हाही भारताकडून पाकिस्तानला दारुण पराभव पत्करावा लागला होता. यावेळी त्याची पुनरावृत्ती झाल्याने भारतीय खेळाडूंवर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.  कॉमनवेल्थ गेम्स 2022 मध्ये सध्या रोमांचकारी सामन्यांचे पर्व सुरू आहे.

अलेक्झांडर स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या मिश्र सांघिक स्पर्धेत भारतीय बॅडमिंटन संघाने पाकिस्तानचा 5-0 ने पराभव केला. भारतीय संघात अनुभवी खेळाडूंसोबतच युवा खेळाडूंचाही यावेळी सहभाग आहे. यावेळी भारतीय खेळाडूंकडून पाकिस्तानविरुद्ध एकतर्फी विजय मिळविण्यात आला.

पाकिस्तानचा 5-0 फरकाने पराभव

या सामन्यावळी भारतीय संघाकडून पाकिस्तानचा 5-0 अशा फरकाने पराभव करण्यात आला. अंतिम सामन्यावेळी गायत्री गोपीचंद-त्रिशा जॉली यांनी माहूर शहजाद आणि गझला सिद्दीकी या जोडीचा 21-4 आणि 21-5 असा पराभव केला.

भारतीय संघ 4-0 ने पुढे

राष्ट्रकुलच्या या सामन्यात भारतीय संघ 4-0 ने पुढे आहे तर पुरुष दुहेरीत सात्विक साईराज रँकी रेड्डी-चिराग शेट्टी यांनी मुहम्मद इरफान सईद भाटी आणि मुराद अली यांचा 21-12, 21-9 असा पराभव करण्यात आला आहे. आता शेवटच्या सामन्यात गायत्री गोपीचंद-त्रिशा जॉली यांचा सामना माहूर शहजाद-गझला सिद्दीकी यांच्यात झाला.

 माहूर शहजादचा पराभव

या स्पर्धेत पीव्ही सिंधूने शानदार कामगिरी करत माहूर शहजादचा पराभव केला असून भारताने 3-0 अशी अभेद्य आघाडी घेतली आहे. सिंधूने माहूर शहजादचा 21-7, 21-6 असा पराभव केला.

भारताकडून पाकिस्तानवर एकतर्फी विजय

भारतीय संघाबद्दल सांगितले जात आहे की एकेरी गटात पीव्ही सिंधू, लक्ष्य सेन, किदाम्बी श्रीकांत यासारखे खेळाडू आहेत. दुहेरीत सात्विक साईराज-चिराग शेट्टी ही जोडीही अजून स्पर्धेत आशादायी राहिली आहे. महिला दुहेरी गटात गायत्री गोपीचंद आणि त्रिशा जॉली, तर मिश्र दुहेरीत अश्विनी पोनप्पा- सुमित रेड्डी यांच्यावर भारतीय चाहत्यांनी आशा ठेवली आहे. गेल्या वेळी जेव्हा दोन्ही संघ आमनेसामने होते तेव्हा भारताकडून पाकिस्तानवर एकतर्फी विजय मिळविण्यात आला होता.

चुनाभट्टीजवळ आंबेडकर अनुयायी अन् पोलिसांमध्ये वाद, थेट रस्ताच रोखला...
चुनाभट्टीजवळ आंबेडकर अनुयायी अन् पोलिसांमध्ये वाद, थेट रस्ताच रोखला....
इंडिगोची आजही 500 विमानं रद्द, प्रवाशांचा आक्रोश, कुठं काऊंटवर चढलं तर
इंडिगोची आजही 500 विमानं रद्द, प्रवाशांचा आक्रोश, कुठं काऊंटवर चढलं तर.
तपोवनातील प्रस्तावित प्रदर्शन केंद्राच्या निविदा प्रक्रियेला स्थगिती
तपोवनातील प्रस्तावित प्रदर्शन केंद्राच्या निविदा प्रक्रियेला स्थगिती.
शिंदेंमुळे 2022ला भाजप सत्तेत, शिवसेनेच्या मंत्र्याच्या दाव्यानं खळबळ
शिंदेंमुळे 2022ला भाजप सत्तेत, शिवसेनेच्या मंत्र्याच्या दाव्यानं खळबळ.
भाजप पदाधिकाऱ्यांनी मनसे पदाधिकाऱ्याला जबर धुतलं; उरणमध्ये घडलं काय?
भाजप पदाधिकाऱ्यांनी मनसे पदाधिकाऱ्याला जबर धुतलं; उरणमध्ये घडलं काय?.
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट...
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट....
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला.
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको.
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा.
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी.