भारताच्या दिग्गज फिरकीपटूची भविष्यवाणी, ‘हे 2 धुरंधर भारताला WTC फायनल जिंकवून देणार!’

| Updated on: May 13, 2021 | 9:17 AM

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपच्या अंतिम सामन्यात भारतीय संघात जाडेजा आणि अश्विन या दोघांनाही संधी द्यायला हवी, असं प्रग्यान ओझा म्हणाला. (ravidra jadeja And R Ashwin Should Play WTC Final Says pragyan Ojha)

भारताच्या दिग्गज फिरकीपटूची भविष्यवाणी, हे 2 धुरंधर भारताला WTC फायनल जिंकवून देणार!
वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपच्या अंतिम सामन्यात भारतीय संघात जाडेजा आणि अश्विन या दोघांनाही संधी द्यायला हवी, असं प्रग्यान ओझा म्हणाला.
Follow us on

मुंबई : टीम इंडिया (Team India) वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप फायनल आणि इंग्लंड विरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी इंग्लंड दौऱ्यावर जाणार आहे. इंग्लंडमध्ये खेळणं हे भारतीय फलंदाज आणि गोलंदाजांसाठी मोठं आव्हान असणार आहे. इंग्लंडमधल्या खेळपट्ट्या शक्यतो वेगवान गोलंदाजीला अनुकुल असतात. पण भारतीय संघाकडे असे दोन खेळाडू आहेत, जे या खेळपट्टीवर खेळून भारताला वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपची फायनल मारुन देऊन शकतात, असा दावा भारतीय संघाचा माजी दिग्गज फिरकीपटू प्रग्यान ओझाने (Pragyan Ojha) केला आहे. रवींद्र जाडेजा (Ravindra Jadeja) आणि आर अश्विन (R Ashwin) यांना वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपच्या अंतिम सामन्यात खेळण्याची संधी मिळायला हवी. ते आपल्या परफॉर्मन्सने भारतीय संघाला नक्की विजय मिळवून देतील, असं प्रग्यान ओझाने म्हटलं आहे. (Ravidra Jadeja And R Ashwin Should Play WTC Final Says Former Indian Spinner Pragyan Ojha)

अश्विन जाडेजाला प्लेइंग 11 मध्ये संधी द्या

प्रग्यान ओझा स्पोर्ट्स टुडेशी बोलताना म्हणाला, वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपच्या अंतिम सामन्यात भारतीय संघात जाडेजा आणि अश्विन या दोघांनाही संधी द्यायला हवी. ते दोघेही उत्तम बोलिंग आणि महत्त्वाचं म्हणजे बॅटिंग करु शकतात. जाडेजा टॉप ऑर्डरमध्ये बॅटिंग करु शकतो, ही गोष्ट देखील ध्यानात घेण्यासारखी आहे. तसंच जाडेजाच्या नावावर देशांतर्गत क्रिकेटमध्ये तीन तिहेरी शतकं आहेत, हे देखील आपण विसरायला नको, अशी आठवण ओझाने आवर्जून सांगितली.

जाडेजा हुकमी एक्का, अश्विन विकेट टेकर

जाडेजा हा भारताचा हुकमी एक्का आहे. बॅटिंग आणि बोलिंग या दोन्ही प्रकारात तो त्याचा सर्वोत्तम परफॉर्मन्स देऊ शकतो. तसंच उत्तम फिल्डिंग ही त्याची ओळख आहे. म्हणजेच तिन्ही फॉरमॅटमध्ये जाडेजा तंतोतंत बसतो. दुसरीकडे अश्विन एक विकेट टेकर फिरकीपटू आहे. तसंच तो उत्तम बॅटिंगही करु शकतो. त्याच्या बॅटमधून नुकतंच एक शतक आलंय.

हे दोन खेळाडू संघात असतील तर….

मला वाटतं न्यूझीलंडविरुद्धच्या अंतिम सामन्यात जाडेजा आणि अश्विनला संधी मिळायला हवी. कोणत्याही विकेटवर हे दोन खेळाडू उत्तम खेळू शकतात. या दोन्ही खेळाडूंजवळ खूप अनुभव आहे. अनुभव, फॉर्म आणि प्रतिभेच्या जोरावर हे फिरकीपटू संघाला विजय मिळवून देण्यात मोठी भूमिका बजावू शकतात.

भारताला इंग्लंडमध्ये 6 कसोटी सामने खेळायचे आहेत

टीम इंडियाला (Team India) इंग्लंडमध्ये 6 कसोटी सामने खेळायचे आहेत. याची सुरुवात वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपच्या अंतिम सामन्याने होणार आहे. त्यानंतर इंग्लंड विरुद्ध 5 सामन्यांची कसोटी मालिका खेळायची आहे.

(Ravidra Jadeja And R Ashwin Should Play WTC Final Says Former Indian Spinner Pragyan Ojha)

हे ही वाचा :

…म्हणून भारतीय संघात भुवनेश्वरला स्थान मिळालं नाही, समोर आलं मोठं कारण!

सुरेश रैनानंतर हरभजनच्या मदतीला धावला सोनू सूद, म्हणाला, ‘काम होऊन जाईल…!’

कुलदीप यादव म्हणतो, “मला माही भाईची खूप आठवण येतीय, त्याने निवृत्ती घेतल्यापासून मी….”