AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

कुलदीप यादव म्हणतो, “मला माही भाईची खूप आठवण येतीय, त्याने निवृत्ती घेतल्यापासून मी….”

मला माही भाईची खूप आठवण येतीय. माही भाई विकेटच्या पाठीमागून सल्ला देत असायचा, बॅट्समनला पॅव्हेलियनमध्ये पाठवण्यासाठी काही ना काही सांगायचा. धोनीजवळ प्रचंड अनुभव आहे, असं कुलदीप यादव म्हणाला. (I Miss MS Dhoni Says Kuldeep Yadav)

कुलदीप यादव म्हणतो, मला माही भाईची खूप आठवण येतीय, त्याने निवृत्ती घेतल्यापासून मी....
कुलदीप यादव
| Updated on: May 13, 2021 | 6:47 AM
Share

मुंबई : भारतीय संघाचा आघाडीचा फिरकीपटू कुलदीप यादव (Kuldeep yadav) याला वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप (WTC) आणि इंग्लंडच्या (Ind vs ENG) कसोटी मालिकेसाठी संघात स्थान मिळालेलं नाही. आयपीएलमध्येही (IPL) त्याला कोलकात्याने (Kolkata) स्थान दिलं नाही. त्यामुळे तो कमालीचा नाराज आहे. त्याला गेल्या वर्षभरात हाताच्या बोटावर मोजण्याइतक्या कमी संधी मिळाल्या आहेत. साहजिक कुलदीपला आपले जुने दिवस आठवले. आज मला माही भाईची (MS Dhoni) खूप आठवण येतीय. माही भाई असताना मी आणि युझी (युजवेंद्र चहल) आम्हाला दोघांनाही खेळायला मिळायचं.. माही भाईच्याच काळात मी हॅट्रिक घेतली, असं कुलदीप यादव म्हणाला. (I Miss MS Dhoni Says Kuldeep Yadav After Not Selected WTC 2021 India vs England)

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपच्या अंतिम सामन्यासाठी तसंच इंग्लंड विरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी टीम इंडियाची (Team India) घोषणा करण्यात आली. या दौऱ्यासाठी बीसीसीआयने 4 राखीव खेळाडूंसह एकूण 24 सदस्यीय संघ जाहीर केला आहे. जाहीर केलेल्या भारतीय संघात स्टार फिरकीपटू कुलदीप यादवला स्थान देण्यात आलेलं नाहीय. आयपीएलमध्येही त्याला खेळण्याची संधी मिळाली नाही. भारतीय संघात संधी मिळत नाही, हे पाहून कुलदीपला खूप दु:ख होतंय. कुलदीप यादवने इंडियन एक्सप्रेसशी संवाद साधला. या संवादात त्याने धोनीच्या कार्यकाळातल्या आपल्या परफॉर्मन्सवर प्रकाश टाकला.

मला धोनीची खूप आठवण येतीय

मला माही भाईची खूप आठवण येतीय. माही भाई विकेटच्या पाठीमागून सल्ला देत असायचा, बॅट्समनला पॅव्हेलियनमध्ये पाठवण्यासाठी काही ना काही सांगायचा. धोनीजवळ प्रचंड अनुभव आहे. जेव्हा धोनी होता तेव्हा मी आणि चहल एकसाथ संघात खेळायचो. जेव्हापासून धोनीने निवृत्ती घेतलीय तेव्हापासून मी आणि चहल संघात एकत्र खेळलो नाहीय. धोनीच्या निवृत्तीनंतर हाताच्या बोटावर मोजण्याइतपत मी मॅचेस खेळल्या आहेत. माही भाईच्याच काळात मी हॅट्रिकही घेतली होती.

गोलंदाजाला एका मजबूत साथीची गरज असते…

मी माही भाईच्या अनुभवाची आठवण काढतो. रिषभ पंत सध्या नवा आहे. तो जेवढा जास्त खेळेल तेवढं पुढे जाऊन विकेटच्या पाठीमागून तो बोलर्सला सल्ला देईल. मला नेहमी वाटतं गोलंदाजाला एका मजबूत साथीची आवश्यकता असते जो दुसऱ्या बाजूने मदत करीन.

महेंद्रसिंग धोनीच्या निवृत्तीनंतर कुलदीप यादवला खेळण्याची खूपच कमी संधी मिळाल्या आहे. कमी संधी मिळाल्याने कुलदीप खूप दिवसांपासून निराश आहे. आता वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप आणि इंग्लंड दौऱ्यात भारतीय संघात जागा न मिळाल्याने त्याच्या निराशेत भर पडलीय.

“कधीकधी मला वाटतं, हे आपल्यासोबत काय होतंय…?”

भारतीय संघात संधी नाकारल्यानंतर कुलदीप यादवने न्यूज 18 ला मुलाखत दिली. या मुलाखतीत त्याने मनातली खदखद मांडली. “कधीकधी मला वाटतं, हे आपल्यासोबत काय होतंय, याचा वारंवार माझ्या मनात विचार येतो. काळ अतिशय कठीण आहे. कधी कधी माझं मन म्हणतं तू आता पहिला कुलदीप राहिला नाही. कारकीर्दीतले काही दिवस असे असतात की जेव्हा तुम्हाला पाणी द्यायला आणि बेंचवर बसणं चांगले वाटतं, परंतु काही दिवस असे असतात जेव्हा आपल्याला त्या ठिकाणी अजिबात रहायचे नसतं…”, अशा भावना कुलदीपने व्यक्त केल्या.

I Miss MS Dhoni Says Kuldeep Yadav After Not Selected WTC 2021 India vs England

हे ही वाचा :

WTC 2021 : काही दिवस पाणी द्यायला, बेंचवर बसायला ठीक आहे, पण आता बस्स, कुलदीप यादव हळहळला

क्रिकेटच्या मैदानात असतानाच वडिलांच्या निधनाची बातमी कळाली, आता म्हणतो, ‘विराट भैय्याचे माझ्यावर उपकार’

असं काय झालं की ख्रिस गेल धाय मोकलून रडायला लागला? सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल

KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.
धनुष्यबाण कोणाला मिळणार ठाकरेंना कि शिंदेंना? उद्या फैसला होणार
धनुष्यबाण कोणाला मिळणार ठाकरेंना कि शिंदेंना? उद्या फैसला होणार.
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा मोर्चा पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा मोर्चा पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार.
नितीन नबीन भाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष, पंतप्रधान मोदींकडून अभिनंदन
नितीन नबीन भाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष, पंतप्रधान मोदींकडून अभिनंदन.