असं काय झालं की ख्रिस गेल धाय मोकलून रडायला लागला? सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल

मातृदिनी गेल अतिशय भावूक झाल्याचं पाहायला मिळालं. त्याने एक व्हिडीओ शेअर केलाय, ज्याच्यात तो आईच्या आठवणीत धाय मोकलून रडतोय. (Chris Gayle Crying remember His late mother Video Goes Viral On Social Media)

असं काय झालं की ख्रिस गेल धाय मोकलून रडायला लागला? सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल
ख्रिस गेल
Follow us
| Updated on: May 12, 2021 | 9:05 AM

मुंबई : एरव्ही क्रिकेटच्या मैदानात धुमाकूळ घालणारा, भल्या भल्या बोलर्सला आपल्या बॅटिंगने रडवणारा युनिव्हर्स बॉस ख्रिस गेल (Chris Gayle) धाय मोकलून रडतानाचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय. त्याचा हा व्हिडीओ पाहून अनेक जणांना धक्का बसलाय. कायम हसत असणारा आणि दुसऱ्यांना हसायला प्रवृत्त करणाऱ्या गेलला असं काय झालंय, की तो धाय मोकलून रडतोय, असा प्रश्न चाहत्यांना पडला आहे. तर गेल आपल्या आईच्या आठवणीने व्याकूळ होऊन रडत असल्याचं कारण समोर आलं आहे. (West Indies Player Chris Gayle Crying remember His late mother Video Goes Viral On Social Media)

मातृदिनी गेल भावूक

नुकताच जागतिक मातृ दिन पार पडला. या मातृदिनी साऱ्यांनी आपापल्या आईप्रति आपल्या भावना व्यक्त केल्या. मातृदिनी गेल अतिशय भावूक झाल्याचं पाहायला मिळालं. त्याने एक व्हिडीओ शेअर केलाय, ज्याच्यात तो आईच्या आठवणीत धाय मोकलून रडतोय. गेलने इन्स्टाग्राम स्टोरी पोस्ट केली आहे.

मातृदिनी गेलचा डोळ्यात पाणी आणणारा व्हिडीओ

आई, माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे. मला माहितीय तुला माझ्यावर खूप गर्व आहे. मला तुझी खूप आठवण येतीय. तुला मी सारखं मिस करतोय. तुझी आठवण मला आयुष्यभर येईल, असं भावना गेलने मातृदिनी व्हिडीओतून व्यक्त केल्या.

व्हिडीओ पाहून प्रेक्षकांच्या डोळ्यात पाणी

गेल सतत आनंदी असतो, तो पार्टीच्या मुडमध्ये असतो. आपल्या हसतमुख स्वभावाने तो संघातील सहकाऱ्यांना देखील नेहमी आनंदी राहण्यास भाग पाडतो. एकूणच गेलच्या आनंददायी स्वभााची प्रेक्षकांनाही सवय लागून गेली आहे. प्रेक्षकांनी गेलला दु:खी चेहऱ्याने कधीही पाहिलं नाही. त्यामुळे प्रेक्षकही गेलच्या व्हिडीओने भावूक झाले आहेत.

गेलचा मुक्काम मालदीवमध्ये

आयपीएल (IPL 2021) स्थगित झाल्यानंतर परदेशी खेळाडूंनी आपापल्या घराची वाट धरलीय. इंग्लंड आणि ऑस्ट्रेलियाचे खेळाडू बॉलिवूड डेस्टिनेशन मालदीवला थांबले आहेत. गेलचाही सध्या मालदीवमध्ये मुक्काम आहे.

आयपीएलमधील गेलची कामगिरी

आयपीएलच्या 14 व्या पर्वात ख्रिस गेलकडून धमाकेदार खेळी खेळली गेली नाही. त्याचं प्रदर्शन साधारण राहिलं. त्याने पंजाब किंग्जकडून 8 सामने खेळले. त्यामध्ये 25.42 च्या सरासरीने तसंच 133.83 च्या स्ट्राईक रेटने 178 रन्स केले.

(West Indies Player Chris Gayle Crying remember His late mother Video Goes Viral On Social Media)

हे ही वाचा :

रॉबिन उथप्पाच्या बायकोचा ‘आठवणीतला फोटो’, धोनीची पत्नी साक्षी म्हणते…

इरफान पठाणचं मोठं वक्तव्य, म्हणाला, ‘हैदराबादच्या खराब खेळाला डेव्हिड वॉर्नरच जबाबदार!’

Non Stop LIVE Update
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका.