रॉबिन उथप्पाच्या बायकोचा ‘आठवणीतला फोटो’, धोनीची पत्नी साक्षी म्हणते…

रॉबिन उथप्पाची (Robin Uthappa) पत्नी शीतल गौतम (Sheethal Gautam) हिने साक्षी धोनीबरोबरचा (Sakshi Dhoni) आयपीएलदरम्यानचा एक आठवणीतला फोटो शेअर केला.

रॉबिन उथप्पाच्या बायकोचा 'आठवणीतला फोटो', धोनीची पत्नी साक्षी म्हणते...

मुंबई : आयपीएलचा 14 वा मोसम (IPL 2021) जरी स्थगित झाला असला तरी क्रिकेट फॅन्स, खेळाडू आणि त्यांची पत्नी यांच्या मनातून स्पर्धेची झिंग काही उतरायला नाही. प्रत्येकाला आयपीएलची (IPL 2021) राहून राहून आठवण येत आहे. चेन्नई सुपर किंग्जचा (CSK) खेळाडू रॉबिन उथप्पाची (Robin Uthappa) पत्नी शीतल गौतम (Sheethal Gautam) हिने साक्षी धोनीबरोबरचा (Sakshi Dhoni) आयपीएलदरम्यानचा एक आठवणीतला फोटो शेअर केला. या फोटोवर साक्षीनेही कमेंट करत तिच्या मनातील भावना बोलून दाखवल्या. (Robin Uthappa Wife Sheethal Gautam Share Throback Photo Sakshi Dhoni reply On Instagram)

शीतलकडून आठवणीतला फोटो शेअर

आयपीएल स्थगित झाल्याने केवळ क्रिकेट फॅन्सच नाराज झालेत, असं नाहीय. तर खेळाडू आणि त्यांच्या कुटुंबातले सदस्य देखील तितकेच नाराज झालेत. उथप्पाची पत्नी शीतलने आयपीएलदरम्यान साक्षी, एमएस आणि रॉबिनबरोबरचा एक आठवणीतला फोटो शेअर केला.

साक्षीचा गोड रिप्लाय

उथप्पाची पत्नी शीतलने फोटो शेअर करताना साक्षीची आठवण येत असल्याचं म्हटलं. साक्षी मी तुला खूप मिस करतीय. आशा आहे आपण लवकरच भेटू…, असं शीतलने आपल्या पोस्टमध्ये म्हटलं. धोनीची पत्नी साक्षीनेही शीतलच्या या फोटोवर कमेंट केली. “आपण अपेक्षा ठेवूयात, लवकरच भेटू…”, अशी कमेंट साक्षी धोनीने केली आहे.

Sakshi Dhoni Reply

“आपण अपेक्षा ठेवूयात, लवकरच भेटू…”, अशी कमेंट साक्षी धोनीने केली आहे.

चेन्नईचा दमदार परफॉर्मन्स

आयपीएलचा 13 वा मोसम चेन्नईसाठी विशेष राहिला नव्हता किंबहुना साखळी फेरीतच चेन्नई गारद झाली होती. परंतु आयपीएलच्या 14 व्या पर्वात चेन्नईने बहारदार परफॉर्मन्स केला. चेन्नईने एकूण 7 मॅचेस खेळल्या ज्यापैकी 5 मॅचेसमध्ये त्यांनी प्रतिस्पर्ध्यांना पराभवाची धूळ चारली.

फॅफ डू प्लेसीसला सतावतेय आयपीएलची आठवण

आयपीएल स्थगितीची घोषणा झाल्यानंतर भारतीय खेळाडूंबरोबर परदेशी खेळाडूंचाही हिरमूड झालाय. जशी आयपीएल स्थगित झालीय तसे परदेशी खेळाडू विविध पोस्ट करुन आयपीएलच्या आठवणींना उजाळा देत आहेत. दक्षिण आफ्रिकन खेळाडू तथा चेन्नई सुपर किंग्जचा सलामीवीर फॅफ डू प्लेसीस याने एक इमोशनल पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये त्याने आयपीएलची आठवण येत असल्याचं म्हटलं आहे.

(Robin Uthappa Wife Sheethal Gautam Share Throback Photo Sakshi Dhoni reply On Instagram)

हे ही वाचा :

PHOTO | सौंदर्याची खाण, गायन, नृत्य ते मॉडेलिंग, सर्वच क्षेत्रात पारंगत, ‘या’ क्रिकेटपटूच्या पत्नीची जगभरात ख्याती

इरफान पठाणचं मोठं वक्तव्य, म्हणाला, ‘हैदराबादच्या खराब खेळाला डेव्हिड वॉर्नरच जबाबदार!’

विराट कोहलीने कोरोना लसीचा पहिला डोस घेतला, लस घेताच लोकांसाठी खास मेसेज