क्रिकेटच्या मैदानात असतानाच वडिलांच्या निधनाची बातमी कळाली, आता म्हणतो, ‘विराट भैय्याचे माझ्यावर उपकार’

आयपीएलमध्येही मला विराट भैय्याचं अनमोल मार्गदर्शन लाभलं. चेन्नईविरुद्धची मॅच हरल्यानंतरही विराटने माझ्या बोलिंगचं कौतुक केलं. तसंच तुझ्या बोलिंगमध्ये झालेल्या बदलाचा संघाला फायदा होईल, असं विराट म्हणाल्याचं मोहम्मद सिराजने सांगितलं. Virat kohli Mohammed Siraj

1/6
indian Captain Virat kohli always Support me Says Bowler Mohammed Siraj
ऑस्ट्रेलिया दौर्‍याच्या आठवणी मोहम्मद सिराजच्या मनात कायम जिवंत राहतील. त्याला या दौऱ्याने जितका आनंद दिला तितकं दु:खही दिलं. ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी त्याची टीम इंडियामध्ये निवड झाली. पण जेव्हा तो ऑस्ट्रेलियात कसोटी मालिका खेळत होता तेव्हा त्याच्या वडिलांच्या मृत्यूची बातमी आली. अशा कठीण काळात सिराज घरी परतण्याऐवजी संघासोबत राहिला. त्यानंतर शेवटच्या तीन सामन्यात त्याने अप्रतिम गोलंदाजी केली आणि ऑस्ट्रेलियाचे 13 गडी बाद केले. आता तो इंग्लंड दौर्‍यावरही जात आहे.
2/6
indian Captain Virat kohli always Support me Says Bowler Mohammed Siraj
'पदार्पण केल्यापासून मी नेहमीच संघाला 100 टक्के देण्याचा प्रयत्न करतो. मला नेहमी जिंकण्याची इच्छा असते, मला जिंकून विशेष फील होतो. ऑस्ट्रेलिया दौर्‍यावरून मला खूप आत्मविश्वास मिळाला आणि हाच आत्मविश्वास मी इंग्लंड दौऱ्यावर घेऊन जाईल. सिराजने आतापर्यंत भारतासाठी पाच कसोटी, एक वनडे आणि तीन टी -20 सामने खेळले आहेत.
3/6
indian Captain Virat kohli always Support me Says Bowler Mohammed Siraj
सिराज आपल्या खेळाचं क्रेडिट भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीला देतो. सिराजने म्हणाला, 'विराट भैय्या नेहमीच सांगतो की तुझ्याकडे क्षमता आहे, तुझ्याकडे कोणत्याही विकेटवर खेळण्याची क्षमता आहे आणि कोणत्याही फलंदाजाला बाद करण्याची प्रतिभा आहे.'
4/6
indian Captain Virat kohli always Support me Says Bowler Mohammed Siraj
आयपीएलमध्येही मला विराट भैय्याचं अनमोल मार्गदर्शन लाभलं. चेन्नईविरुद्धची मॅच हरल्यानंतरही विराटने माझ्या बोलिंगचं कौतुक केलं. तसंच तुझ्या बोलिंगमध्ये झालेल्या बदलाचा संघाला फायदा होईल, असं तो म्हणाला. इंग्लंडविरुद्ध दौऱ्यासाठी तयार रहा, शुभेच्छा.... असं म्हणून त्याने मला आत्मविश्वास दिला तसंच पाठीवर कौतुकाची थाप मारली.
5/6
indian Captain Virat kohli always Support me Says Bowler Mohammed Siraj
सिराज जेव्हा ऑस्ट्रेलियामध्ये होता तेव्हा त्याच्या वडिलांच्या निधनाची दु:खद बातमी आली. विराट कोहली आणि रवी शास्त्री यांनी त्याला वडिलांच्या निधनाची बातमी दिली. त्यावेळी सिराज सराव करत होता. वडिलांचे निधन झाल्याची बातमी ऐकताच तो हॉटेलच्या खोलीत गेला आणि रडू लागला. ही घटना आठवताना तो म्हणाले, 'ऑस्ट्रेलिया मालिकेदरम्यान मी माझ्या वडिलांचा गमावलं. मी आतून तुटलो होतो. विराट भैयाने मला कठीण काळात धीर दिला, पाठिंबा दिला. माझं करिअर घडण्यात विराट भैय्याचा वाटा आहे, असं सिराज म्हणाला.
6/6
indian Captain Virat kohli always Support me Says Bowler Mohammed Siraj
'विराटने नेहमीच मला साथ दिली आहे. तो नेहमी मला पाठिंबा देतो. मला आठवतं की मी हॉटेलच्या खोलीत रडत होतो. विराट भैय्या तिथे आला आणि मला घट्ट मिठी मारली. तो म्हणाला की, मी तुझ्याबरोबर आहे, काळजी करू नको. विराट माझ्यावर आतापर्यंत खूपदा विश्वास दाखवलाय, तसंच तो मला प्रेरणा देत आलाय', असं सिराज म्हणाला.