
Cricketer Ex-Wife : सोशल मीडियावर गेल्या काही दिवसांपासून एक व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे. ज्यामध्ये दिसणारी महिला स्वतःला क्रिकेटरची पत्नी असल्याचं सांगत आहे… महिलीने स्वतःची ओळख रेखा श्रीवास्तव म्हणून सांगितली असून, मी मोठ्या क्रिकेटरची पत्नी असल्यााचा दावा देखील महिलेने केला आहे. महिला बेलापूर येथील रस्त्यांवर भीक मागताना दिसली… आता ही महिली खरंच क्रिकेटरची पत्नी आहे की नाही… याचा शोध घेतला जात आहे. भारताने ऑलराउंडर क्रिकेटर सलीम दुर्रानी यांची पत्नी असल्याचा दावा महिलेने केला आहे…
महिलेचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर मुंबईच्या सामान्य लोकांमध्ये आणि क्रिकेटविश्वात खळबळ माजली आहे. सांगायचं झालं तर, दुर्राणी राजस्थानकडून रणजी ट्रॉफी क्रिकेट खेळायचे, पण ते मुंबईत राहत होते. महिलेच्या दाव्याची पडताळणी करण्यासाठी, हेल्प ड्राइव्ह फाउंडेशन या स्वयंसेवी संस्थेने रेखा श्रीवास्तव यांच्या मुलीचा शोध घेतला.
मुलीने दिलेल्या माहितीनुसार. महिला दुर्रानी यांची पहिली पत्नी आहे. आता महिलीची मुलगी अधिकृत कागदपत्रांचा शोध घेत आहे… व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर, माजी भारतीय क्रिकेटपटू अजय जडेजा यांनी संस्थेशी संपर्क साधला आणि मदतीचा हात पुढे केला आहे… ही संस्था आता रेखा यांच्या मुली आणि नातेवाईकांकडून दिवंगत क्रिकेटपटूशी असलेलं नातं सिद्ध करण्यासाठी पुरावे गोळा करत आहे.
किस्मत आपको कहां से कहां पहुंचा देती है यह एक बड़ा उदाहरण है आपके सामने देश के मशहूर क्रिकेटर सलीम दुर्रानी की पत्नी रेखा श्रीवास्तव…जो कभी बड़े-बड़े बंगलो में रही दुबई में एयरलाइंस चलाई उनके पति देश के बड़े क्रिकेटर थे आज दर-दर की ठोकरे खा रही है pic.twitter.com/y4Rw2tTGy4
— Danish Khan (@danishrmr) December 16, 2025
रिपोर्टनुसार, प्रकरणी दुरानी यांच्या मित्रांसोबत देखील संपर्क करण्यात आला. मित्रांनी दिलेल्या माहितीनुसार, दुर्रानी यांच्या पहिल्या पत्नीचं नाव रेखा होतं… पण व्हिडीओत दिसणारी महिला तिच आहे की नाही याबद्दल काहीही सांगता येत नाही. कारण रेखा आता 80 वर्षांची आहे आणि गेल्या 40 – 50 वर्षांपासून आमची भेट झालेली नाही.. अशी माहिती मित्रांनी दिली आहे.
भारताच्या सर्वोत्तम अष्टपैलू खेळाडूंपैकी एक असलेले दुर्राणी काही षटकांतच आपल्या नावावर करुन घेत होते. 1961-62 मध्ये दुर्राणी यांनी भारताला इंग्लंडविरुद्ध विजय मिळवून दिला. कोलकाता आणि चेन्नईमधील सामन्यांमध्ये त्यांनी आठ विकेट्स घेतल्या आणि नंतरच्या सामन्यात दहा विकेट्स घेतल्या. पोर्ट ऑफ स्पेनमध्ये वेस्ट इंडिजविरुद्धच्या विजयात या अष्टपैलू खेळाडूने महत्त्वाची भूमिका बजावली. सलीम दुर्रानी यांनी 2 एप्रिल 2023 मध्ये अखेरचा श्वास घेतला.