डेव्हिड वॉर्नर म्हणाला ‘बोअर होतंय…’, रोहित म्हणाला, ‘का बरं, Tik Tok ला मिस करतोय?’ दोन खेळाडूंमधला मजेशीर संवाद!

| Updated on: Apr 05, 2021 | 3:28 PM

सध्या चेन्नईतील हॉटेलमध्ये डेव्हिड वॉर्नर क्वारंटाईन आहे. तिथून डेव्हिड वॉर्नरने आपल्या चाहत्यांना एक सल्ला विचारला. त्यावर रोहित शर्माने मजेशीर कमेंट करत त्याची फिरकी घेतली. Rohit Sharma David warner

डेव्हिड वॉर्नर म्हणाला बोअर होतंय..., रोहित म्हणाला, का बरं, Tik Tok ला मिस करतोय? दोन खेळाडूंमधला मजेशीर संवाद!
रोहित शर्मा आणि डेव्हिड वॉर्नर
Follow us on

मुंबईआयपीएलच्या (IPL 2021) 14 व्या हंगामाला सुरु होण्यास केवळ चार दिवस राहिले आहेत. येत्या 9 एप्रिलला आयपीएल करंडकासाठीचा रणसंग्राम सुरु होत आहे. तत्पूर्वी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अनेक संघांचे प्लेअर्स क्वारन्टाईनमध्ये आहेत. ऑस्ट्रेलियाचा आक्रमक फलंदाज डेव्हिड वॉर्नर (David Warner) आयपीएलच्या सनराजर्स हैदराबाद (Sunrisers Hydrabad) संघाचा कर्णधारपद भूषवतो. तो सध्या भारतात दाखल झाला आहे. सध्या चेन्नईतील हॉटेलमध्ये डेव्हिड वॉर्नर क्वारंटाईन आहे. तिथून डेव्हिड वॉर्नरने आपल्या चाहत्यांना एक सल्ला विचारला. त्यावर रोहित शर्माने (Rohit Sharma) मजेशीर कमेंट करत त्याची फिरकी घेतली. (Rohit Sharma Question David warner Are you Missing tik tok viral Video)

डेव्हिड वॉर्नर सध्या चेन्नईच्या हॉटेलमध्ये क्वारंटाईन आहे. झोपेतून उठल्यानंतर त्याला करमेनासं झालं. त्याला बोअर वाटत असताना त्याने इन्स्टाग्रामवर जाऊन क्वारंटाईन असताना मी काय करु? असा प्रश्न आपल्या चाहत्यांना विचारला. रोहित शर्माने हीच संधी साधून वॉर्नरला मजेशीरपणे खिंडीत गाठलं.

रोहितची मजेशीर कमेंट

डेव्हिड वॉर्नरला टिक टॉक प्रचंड आवडतं. तो आपले व्हिडीओ टिकटॉकवर अपलोड करायचा. त्याला व्हिडीओला कोटीच्या घरात व्ह्यूज मिळायचे. मात्र सध्या भारतात टिकटॉक बंद आहे. हेच हेरुन रोहितने वॉर्नरला जोराचा चिमटा काढला. बोअर होतंय, असं वॉर्नरने चाहत्यांना सांगताच रोहितने मोक्यावर चौकार मारला. ‘का बरं, बोअर होतंय? Tik Tok ला मिस करतोय?’ असं रोहित वॉर्नरला म्हणाला.

Rohit Sharma Comment on David warner

वॉर्नर नेमकं काय म्हणाला…?

डेव्हिड वॉर्नरने ज्यावेळी चाहत्यांना टिप्स मागितल्या त्यावेळी रोहित शर्माने वॉर्नरच्या इन्स्टाग्राम पोस्टखाली कमेंट केली. दोघा खेळाडूंच्या संवादाने चाहते मात्र मंत्रमुग्ध झाले. या व्हिडीओत वॉर्नर म्हणाला, “हॅलो, मी काल चेन्नईत आलोय. मी आताच माझी झोप पूर्ण करुन उठलो आहे. मला काही आयडिया हव्यात. 6 ते 7 दिवस मी क्वारन्टाईनमध्ये काय करु, कमेंट सेक्शनमध्ये मला जरुर टिप्स द्या”

पहिला सामना 9 तारखेला, मुंबई विरुद्ध बंगळुरु आमने-सामने

इंडियन प्रीमयर लीगचं (the Indian Premier League) यंदाचं वेळापत्रक  निश्चित झालं आहे. येत्या 9 एप्रिल ते 30 मे दरम्यान आयपीएल (IPL 2021) सामने खेळवण्यात येणार आहेत. 14 व्या पर्वाचा थरार एकूण 51 दिवस रंगणार आहे. यादरम्यान 56 साखळी, 3 बाद फेरीतील सामने आणि अंतिम सामना असे एकूण 60 मॅचेस खेळवण्यात येणार आहेत. या मोसमात सर्व सामने हे त्रयस्थ ठिकाणी खेळवले जाणार आहेत. यामुळे कोणत्याही संघाला त्यांच्या होम ग्राऊंडचा फायदा मिळणार नाही. कोरोनामुळे साखळी फेरीतील सर्व सामन्यांचं आयोजन हे 6 शहरात करण्यात आलं आहे.

(Rohit Sharma Question David warner Are you Missing tik tok viral Video)

हे ही वाचा :

IPL 2021 : हे 11 बिनीचे शिलेदार जे मुंबई इंडियन्सला बनवू शकतात सहाव्यांदा चॅम्पियन!

IPL 2021 : आयपीएलमधील सर्वोत्तम 6 इनिंग्स कोणत्या? ज्यामध्ये झाली चौकार-षटकारांची लयलूट!

IPL 2021 : IPL सामने मुंबईच्या वानखेडे मैदानावर होणार की नाही?, BCCI अध्यक्ष सौरव गांगुलीचा मोठा खुलासा