Rohit Sharma : रोहित शर्माच्या सिक्सरनं चिमुकली जखमी, क्षणभर काळजाचा ठोका चुकवणारी घटना, पाहा VIDEO

| Updated on: Jul 13, 2022 | 7:14 AM

इंग्लंड संघाचे फिजिओ ताबडतोब स्टँडकडे धावले जेणेकरुन चिमुकलीवर प्राथमिक उपचार करता येतील. रवी शास्त्री इंग्लिश कॉमेंट्री करत होते आणि इंग्लंडचा माजी कर्णधार मायकेल आथर्टन ऑन एअर म्हणाला की चेंडू स्टँडवर बसलेल्या प्रेक्षकांकडे गेला.

Rohit Sharma : रोहित शर्माच्या सिक्सरनं चिमुकली जखमी, क्षणभर काळजाचा ठोका चुकवणारी घटना, पाहा VIDEO
रोहित शर्माच्या सिक्सरनं चिमुकली जखमी
Follow us on

नवी दिल्ली: ओव्हल येथे खेळल्या गेलेल्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात भारतीय संघानं (IND vs ENG) वर्चस्व गाजवले. प्रथम, जसप्रीत बुमराहच्या नेतृत्वाखालील वेगवान आक्रमणाने (7.2 षटकांत 19 धावांत 6 बळी) इंग्लंडचा अवघ्या 110 धावांत पराभव केला. नंतर कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) आणि शिखर धवनच्या (Shikhar Dhawan) जोडीनं भारताचा सामना पूर्ण 10 विकेट्ससह केला. अशा प्रकारे टीम इंडियाने तीन सामन्यांच्या मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे. 4 षटकांनंतर भारताची धावसंख्या नाबाद 8 धावा होती. पाचव्या षटकात वेगवान गोलंदाज डेव्हिड विली. पहिल्या दोन चेंडूत एकही धाव न मिळाल्यानंतर तिसऱ्या चेंडूवर रोहितनं फॉर्ममध्ये आला. सहा धावांसाठी फ्रंट फूटपासून बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या दिशेनं शॉर्ट पिच चेंडू सरळ जाऊन स्टँडवर बसलेल्या चिमुकलीला (kids) लागला. कॅमेरामननं हा संपूर्ण दाखवल्यानं सर्वजण काही काळ स्तब्ध झाले. सामना थांबवण्यात आला होता. हा क्षण काळजाचा ठोका चुकवणारा होता.

पाहा व्हिडीओ

क्षणभरात धावाधाव

इंग्लंड संघाचे फिजिओ ताबडतोब स्टँडकडे धावले जेणेकरुन चिमुकलीवर प्राथमिक उपचार करता येतील. रवी शास्त्री इंग्लिश कॉमेंट्री करत होते आणि इंग्लंडचा माजी कर्णधार मायकेल आथर्टन ऑन एअर म्हणाला की चेंडू स्टँडवर बसलेल्या प्रेक्षकांकडे गेला. कॅमेरा पुन्हा त्याच बाजूला वळला. कदाचित जखमी चिमुकली ही भारतीय क्रिकेट संघाची चाहती होती. हे वृत्त लिहेपर्यंत जखमी मुलीबाबत कोणतीही माहिती मिळालेली नाही. आशा आहे की तो पूर्णपणे बरी आहे.

पाहा व्हिडीओ

सामन्यात काय झालं?

इंडियन लायन्सनं इंग्लंडचं 111 धावांचे लक्ष्य केवळ 18.4 षटकात 114 धावा करत सामना जिंकला. एकदिवसीय इतिहासात पहिल्यांदाच भारताने ब्रिटीशांवर 10 गडी राखून विजय मिळवला. कर्णधार रोहित शर्मानं नाबाद 76 धावा केल्या तर सहकारी सलामीवीर शिखर धवन 31 धावा करून परतला. टी-20 मालिका 2-1 ने जिंकल्यानंतर भारतानं आता वनडे मालिकेतही 1-0 अशी आघाडी घेतली आहे. मालिकेतील दुसरा सामना 14 जुलै रोजी लॉर्ड्सच्या ऐतिहासिक मैदानावर होणार आहे.

चेंडू सरळ चिमुकलीला लागला

पाचव्या षटकात वेगवान गोलंदाज डेव्हिड विली. पहिल्या दोन चेंडूत एकही धाव न मिळाल्यानंतर तिसऱ्या चेंडूवर रोहितनं फॉर्ममध्ये आला. सहा धावांसाठी फ्रंट फूटपासून बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या दिशेनं शॉर्ट पिच चेंडू सरळ जाऊन स्टँडवर बसलेल्या चिमुकलीला लागला. कॅमेरामननं हा संपूर्ण दाखवल्यानं सर्वजण काही काळ स्तब्ध झाले. सामना थांबवण्यात आला होता. हा क्षण काळजाचा ठोका चुकवणारा होता.