Asian Games 2026: ठाण्याच्या रुद्रांक्ष पाटीलचं आशियाई क्रीडा स्पर्धेत दुसरं पदक; राष्ट्रपतींकडून अभिनंदन
ऐची-नागो जपान येथे सुरू असलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धा २०२६ मध्ये ठाण्याच्या रुद्रांक्ष पाटीलने नेमबाजीत दमदार कामगिरी करत भारताच्या शिरपेचात दोन पदकांची भर घातली आहे.

ऐची-नागो जपान येथे सुरू असलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धा २०२६ मध्ये ठाण्याच्या रुद्रांक्ष पाटीलने नेमबाजीत दमदार कामगिरी करत भारताच्या शिरपेचात दोन पदकांची भर घातली आहे. रुद्रांक्षने १० मीटर एअर रायफलच्या वैयक्तिक प्रकारात कांस्यपदक, तर पार्थ माने आणि हिमांशू ढिल्लों यांच्या साथीने सांघिक प्रकारात रौप्यपदक पटकावले. ठाण्यातील आनंद नगर जकात नाका या ठिकाणी ठाणे महानगरपालिका क्रीडा विभाग आणि पोलिसांतर्फे जंगी स्वागत करण्यात आले. शिवसेनेचे आमदार रवींद्र फाटक ठाणे महानगरपालिका महापौर शर्मिला पिंपलोळकर आणि मराठी कलाकार मंगेश देसाईही यांनीही यावेळी आपली उपस्थिती लावली.
रुद्रांक्षच्या या उल्लेखनीय कामगिरीचे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी सोशल मीडियावरून विशेष अभिनंदन केले आहे. रुद्रांक्षच्या या यशामागे गेल्या सात ते आठ वर्षांची कठोर मेहनत आणि सातत्यपूर्ण सराव असल्याचे त्याचे वडील तथा ठाणे पोलिस उपायुक्त बाळासाहेब पाटील यांनी सांगितले. सरावासाठी जाताना रुद्रांक्षने कधीही वडिलांच्या पदाचा किंवा त्यांच्या ओळखीचा गैरवापर केला नाही, अशीही भावना बाळासाहेब पाटील यांनी व्यक्त केली. ऑलिम्पिकमध्ये पदक जिंकण्याचे ध्येय डोळ्यासमोर ठेवून रुद्रांक्षची वाटचाल सुरू आहे. त्याच्या या यशामुळे ठाण्यासह महाराष्ट्राच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे.
आशियाई खेळ 2026 स्पर्धा ही भारतीय रायफल नेमबाज रुद्रांक्ष पाटीलसाठी खास होती. या खेळांमध्ये त्याने तीन पदके जिंकली. रुद्रांक्षने 10 मीटर एअर रायफलच्या सांघिक प्रकारात रौप्य पदक जिंकले. या वैयक्तिक स्पर्धेत कांस्यपदक जिंकण्यात त्याला यश आले. त्याचवेळी 25 सप्टेंबरला थ्री पोझिशन एअर रायफलमध्ये पदक जिंकण्यातही तो यशस्वी ठरला होता. त्याने नीरज आणि ऐश्वर्या प्रताप सिंगसह रौप्य पदक जिंकले. या आशियाई खेळांमध्ये सर्वाधिक पदके जिंकणारा नेमबाज सध्या रुद्रांक्ष आहे.
आज रुद्रांक्षसाठी शूटिंग हेच सर्वस्व आहे. रिपोर्टनुसार, रुद्रांक्षने वयाच्या १२व्या वर्षी शूटिंगला सुरुवात केली होती. तो ठाण्यातील द्रोणाचार्य स्पोर्ट्स अकादमीमध्ये प्रशिक्षण घेत असे. एकवेळ अशी आली होती जेव्हा रुद्रांक्षला शूटिंग सोडणार होता पण त्याच्या आईने त्याला थांबवले होते.
