Sachin Tendulkar: असंच नाही देव म्हणतं, भर कार्यक्रमात सचिनच्या एका कृृतीनं जिंकलं मनं, अमिताभ बच्चनही पाहत राहिले, Video Viral

Sachin Tendulkar Reel Viral: सचिन तेंडुलकरचा एक व्हिडिओ आता मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. ज्यात त्यांनी केलेल्या एका कृतीचे सर्वत्र कौतुक होत आहे.

Sachin Tendulkar: असंच नाही देव म्हणतं, भर कार्यक्रमात सचिनच्या एका कृृतीनं जिंकलं मनं, अमिताभ बच्चनही पाहत राहिले, Video Viral
| Updated on: Oct 04, 2026 | 9:08 AM
Sachin Tendulkar Video: क्रिकेटमधला देव म्हणजे एकच सचिन तेंडुलकर. सचिन यांनी अनेक रेकॉर्ड्स मोडले आहेत, अनेक पराक्रम त्यांच्या नावावर आहेत, अनेक इतिहास सचिनने रचले आहेत.  अनेकांचा आदर्श असलेला सचिन हा फक्त त्याच्या क्रिकेटसाठी जगभारत ओळखला जात नाही तर त्याच्या नम्र स्वभावासाठीही ओळखला जातो. सचिनने आयुष्यात सगळं मिळवलंय जसं की प्रसिद्धी, अनेक पुरस्कार, पैसा, आदर तरीही त्याचे पाय हे नेहमीच जमिनीवर असतात. आता याचे उदाहरण पुन्हा एकदा पाहायला मिळाले. एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
मुंबईतील एका बुक लॉचच्या कार्यक्रमात पाहुणे म्हणून गुलजार साहब, सचिन तेंडुलसकर आणि अमिताभ बच्चन यांनी आपली उपस्थिती लावली होती. यासोबत अनेक इतरही कलाकार उपस्थित होते. याच कार्यक्रमात सचिनचे संस्कार पुन्हा दिसले.  यामुळे सचिनचे खूप कौतुक होत आहे.  बॉलिवूडचे दिग्गज अभिनेते अमिताभ बच्चन आणि गुलजार यांनी मुंबईत एका पुस्तक प्रकाशन सोहळ्याला आपली उपस्थिती लावली होती. डॉ. पी. जगन्नाथ यांच्या ‘डॉ. ब्लू: अ कॅन्सर सर्जन्स जर्नी इनटू द ह्यूमन साइड ऑफ हीलिंग’ या पुस्तकाच्या प्रकाशन सोहळा होता. या सोहळ्यासाठी  अभिताभ बच्चन, सचिन तेंडूलकर आणि गुलजार साहब यांना बोलवण्यात आले होते.  याच कार्यक्रमात सचिनच्या संस्काराची झलक पुन्हा एकदा दिसली.

गुलजार साहब पुस्तकाविषयी कथन करत असताना त्यांना तहान लागली त्यांचा हातात माईक होता. ते पुढे येऊन पाणी पिणारच होते तितक्या सचिन स्वत: पुढे आला. सचिनने स्वत: ग्लासात पाणी ओतले आणि गुलजार साहब यांना नेऊन दिले. सचिनच्या बाजूला अमिताभ बच्चन बसले होते. तेही सचिनकडे पाहत राहिले. सचिनने केलेल्या या कृतीचे त्यांनाही कौतुक वाटले. याचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

या व्हिडिओनंतर आणखी एक व्हिडिओ व्हायरल झाला. ज्यात गुलजार खाली स्टेजच्या खाली उतरत होते तेव्हा ्अमिताभ बच्चन यांनी त्यांना एका बाजूने पकडले होते. पण त्यांना दुसऱ्या बाजूलाही पकडण्याची गरज आहे हे सचिनला जाणवले. यामुळे सचिनने पुढे येत त्यांना दुसऱ्या बाजूने पकडले आणि नीट खाली उतरवले.
Loading...
Unable to load recommendations.
Follow Us