AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मी टकमक टोकावर चाललो, घरी फोन करून सांगितलं; नंतर मोबाईल बंद ठेवला, किल्ले रायगडावरून तरुणाने उडी मारल्याची भीती

ठाण्यातील तरुणाने कुटुंबीयांना किल्ले रायगडावरील टकमक टोकावर जात असल्याचे सांगितले. त्यानंतर त्याचा फोन बंद झाला. पोलिसांनी त्याची शोधाशोध सुरू केली आहे.

मी टकमक टोकावर चाललो, घरी फोन करून सांगितलं; नंतर मोबाईल बंद ठेवला, किल्ले रायगडावरून तरुणाने उडी मारल्याची भीती
takmak tok Image Credit source: टीव्ही9 मराठी
| Updated on: Oct 04, 2026 | 8:58 AM
Share

किल्ले रायगडाच्या टकमक टोक परिसरात एका 37 वर्षीय तरुणाने आयुष्य संपवल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. सुयोग पांचाळ असे बेपत्ता तरुणाचे नाव आहे. तो ठाण्यातील रहिवासी आहे. या घनटेची माहिती मिळताच महाड तालुका पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. यावेळी रेस्क्यू टीम आणि स्थानिकांची मदत देखील पोलीस घेत आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, सुयोग पांचाळ हा शनिवारी किल्ले रायगडावर पोहोचल्याचे सांगण्यात येत आहे. त्यानंतर घरी फोन केला. सुयोगने फोन करून आयुष्याचा शेवट करत असल्याचे सांगितले. सुयोगने ही माहिती दिल्याने कुटुंबातील सदस्यांनी किल्ले रायगड परिसरात धाव घेतली. त्याचा भाऊ सुवेल पांचाळ किल्ले रायगडाच्या पायथ्याशी त्याच्या दुचाकीची पाहणी केली. तिथेही सुयोग कुठेही दिसला नाही. त्यामुळे सुवेलने ही माहिती महाड तालुका पोलिसांना दिली. घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलीस देखील पोहोचले. सुयोगला शोधण्यासाठी पोलिसांनी रेस्क्यू टीम आणि स्थानिकांच्या मदतीने किल्ले रायगड परिसरात शोधमोहीम सुरू केली आहे.

विशेष म्हणजे टकमक टोक परिसरात शोध घेतला. त्यानंतर आजूबाजूच्या परिसरातही शोध घेतला. त्यानंतरही सुयोगचा शोध लागला आहे. शनिवारी सांयकाळी ही घटना घडल्याची माहिती समोर आली आहे. तरुणाने नेमके कोणत्या कारणामुळे आयुष्याचा शेवट करण्याचा निर्णयापर्यंत पोहोचला, याबाबत कोणतीही माहिती समोर आलेली नाही. पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे. तसेच त्याच्या कुटुंबाकडून माहिती घेतली जात आहे. पोलीस, रेस्क्यू टीम, स्थानिकाच्या मदतीने सुयोग पांचाळ याचा शोध घेतला जात आहे. पोलिसांनी या प्रकरणी पुढील तपास सुरू केला आहे.

बीडच्या शेतकऱ्याने आयुष्य संपवलं 

बीडच्या पिंपरनई गावामध्ये एका शेतकऱ्याने शेतातील झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. विक्रम बाबासाहेब दाभाडे असे आत्महत्या केलेल्या बीडमधील शेतकऱ्याचे नाव आहे. बीड जिल्ह्यात सध्या दुष्काळी परिस्थिती आहे. त्यामुळे शेतातील पिके वाया गेली आहेत. या दुष्काळादरम्यान विक्रम दाभाडे यांच्या मुलीच्या लग्नासंदर्भात हालचाली सुरू होत्या. परंतु त्यासाठी आर्थिक जुळवा जुळव होत नसल्याने ते निराश होते. त्यामुळे शेतकरी विक्रम यांनी आयुष्य संपवल्याचे सांगण्यात येत आहे.

Follow Us
विक्रम शिंगाडेंवर विनयभंगाचा गुन्हा; अभयसिंह जगतापांचे पोलीसांसमोरच...
विक्रम शिंगाडेंवर विनयभंगाचा गुन्हा; अभयसिंह जगतापांचे पोलीस ठाण्यासमोर ठिय्या आंदोलन!
नुसताच पाऊस कमी नाही, पिकंही गेली! अहिल्यानगरच्या 14 तालुक्यांत नुकसान
नुसताच पाऊस कमी नाही, पिकंही गेली! अहिल्यानगरच्या 14 तालुक्यांत नुकसानीचे पंचनामे सुरू
विधान परिषदेच्या जागेवरून मविआत तोडगा नाही, पुन्हा बैठक होणार
विधान परिषदेच्या जागेवरून मविआत तोडगा नाही, पुन्हा बैठक होणार
महायुतीत खलबतं? पुणे शिक्षक मतदारसंघाच्या उमेदवारीवरून राजकारण;
महायुतीत खलबतं? पुणे शिक्षक मतदारसंघाच्या उमेदवारीवरून राजकारण; शिंदेंच्या नेत्यांना तातडीच्या सूचना
महायुतीच्या जागावाटपाचा तिढा सुटला; पुणे शिक्षक मतदारसंघ भाजपकडे
महायुतीच्या जागावाटपाचा तिढा सुटला; पुणे शिक्षक मतदारसंघ भाजपकडे, मंगेश चिवटेंना धक्का!
चंद्रपुरात दुष्काळामुळे सरकारी कर्मचाऱ्यांना नो लीव्ह, मुख्यालयातच...
चंद्रपुरात दुष्काळामुळे सरकारी कर्मचाऱ्यांना नो लीव्ह, मुख्यालय सोडण्यास मनाई
ठाकरे बंधूंच्या गर्जना मोर्चासाठी मनसेची मोठी तयारी; 150 जणांची स्पेशल
ठाकरे बंधूंच्या गर्जना मोर्चासाठी मनसेची मोठी तयारी; 150 जणांची स्पेशल टीम तैनात?
केंद्राकडे खर्गे यांची 3,705 कोटी रुपयांच्या मदतीची मागणी
Video : केंद्राकडे खर्गे यांची 3,705 कोटी रुपयांच्या मदतीची मागणी... पंतप्रधान मोदी, अमित शहा यांना 11 पानी पत्र
बांधावर बसले, शेतकऱ्यांसोबत जेवले; बावनकुळेंनी जाणून घेतल्या समस्या
Chandrashekhar Bawankule : बांधावर बसले, शेतकऱ्यांसोबत जेवले; चंद्रशेखर बावनकुळेंनी जाणून घेतल्या दुष्काळग्रस्तांच्या समस्या
शंभूराज देसाईंचा हर्षवर्धन सपकाळच्या ड्रग्ज प्रकरणी प्रत्युत्तर
शंभूराज देसाईंचा हर्षवर्धन सपकाळच्या ड्रग्ज प्रकरणावरील आरोपांना सडेतोड प्रत्युत्तर