कोहली, आजच्या सामन्यात शमी-जाडेजाला मैदानात उतरव : सचिन तेंडुलकर

| Updated on: Jul 09, 2019 | 11:44 AM

मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने न्यूझीलंडविरुद्धच्या महामुकाबल्यापूर्वी टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहलीला मोलाचा सल्ला दिला आहे. भारत आणि न्यूझीलंड यांच्यात पहिली सेमीफायनल आज होत आहे.

कोहली, आजच्या सामन्यात शमी-जाडेजाला मैदानात उतरव : सचिन तेंडुलकर
Photo : ICC
Follow us on

लंडन : मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने न्यूझीलंडविरुद्धच्या महामुकाबल्यापूर्वी टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहलीला मोलाचा सल्ला दिला आहे. भारत आणि न्यूझीलंड यांच्यात पहिली सेमीफायनल आज होत आहे. विराट कोहली आणि टीम मॅनेजमेंटसमोर प्लेईंग इलेव्हनची डोकेदुखी आहे. भारताचे सगळेच खेळाडू उत्तम कामगिरी करत असल्याने, अंतिम 11 जणांमध्ये कोणाची निवड करायची, हा प्रश्न विराट कोहलीसमोर आहे. अशावेळी सचिन तेंडुलकरने अष्टपैलू रवींद्र जाडेजा आणि मध्यमगती गोलंदाज मोहम्मद शमी यांचा प्लेईंग इलेव्हनमध्ये समावेश करावा, असा सल्ला दिला आहे.

भारताची मधली फळी तितकीशी उत्तम कामगिरी करत नाही. त्यामुळे मागील दोन सामन्यात केदार जाधवऐवजी दिनेश कार्तिकचा समावेश करण्यात आला. सचिन म्हणतो, “कार्तिकला सातव्या नंबरवर फलंदाजीला उतरावं लागेल. फलंदाजीसाठी जाडेजाचाही पर्याय आहे. मात्र जाडेजाच्या निवडीने भारताला डावखुरा फिरकीपटू मिळेल, ती सर्वात मोठी जमेची बाजू असेल”.

आजच्या सामन्यात भारत पाच गोलंदाजांसह मैदानात उतरु शकतो. मोहम्मद शमीने मिळालेल्या संधीचं सोनं करुन दाखवलं. मात्र श्रीलंकेविरुद्धच्या सामन्यात त्याला बसवून पुन्हा भुवनेश्वरला खेळवण्यात आलं. पण त्या सामन्यात भुवीला चमकदार कामगिरी करता आली नाही. त्यामुळे मोहम्मद शमीचा पर्याय भारतीय संघ व्यवस्थापनाकडे आहे.

शमीबाबत सचिन म्हणाला, “शनीने वेस्ट इंडिजविरुद्धच्या सामन्यात याच मैदानात उत्तम कामगिरी केली होती. या मैदानाचा शमीला अंदाज आहे. त्यामुळे त्याला खेळवल्यास फायदेशीर ठरू शकतो”

श्रीलंकेविरुद्ध खेळलेला भारतीय संघ

रोहित शर्मा, के एल राहुल, विराट कोहली, ऋषभ पंत, हार्दिक पंड्या, एम एस धोनी, दिनेश कार्तिक, रवींद्र जाडेजा, भुवनेश्वर कुमार, कुलदीप यादव, जसप्रीत बुमरा

संबंधित बातम्या 

IndvsNZ World Cup semi final : कोहली वि. बोल्ट, रोहित वि. साऊदी, बुमरा वि गप्टिल