IndvsNZ World Cup semi final : भुवी-बुमराहचा भेदक मारा

IndvsNZ World Cup semi final लंडन : आयसीसी विश्वचषकाच्या पहिल्या सेमीफायनलमध्ये आज भारताचा सामना न्यूझीलंडशी होत आहे.

IndvsNZ World Cup semi final : भुवी-बुमराहचा भेदक मारा

IndvsNZ World Cup semi final लंडन : आयसीसी विश्वचषकाच्या पहिल्या सेमीफायनलमध्ये न्यूझीलंडने टॉस जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. त्यामुळे टीम इंडियाला पहिल्यांदा क्षेत्ररक्षणासाठी मैदानात उतरावं लागलं. भारतीय संघात एक बदल करण्यात आला आहे. कुलदीप यादवच्या जागी यजुवेंद्र चहलला संधी देण्यात आली आहे.भारतानं सात सामने जिंकत गुणतालिकेत अव्वल स्थान पटकवलं आहे. मात्र आता उपांत्य फेरीत भारताचा बलाढ्य न्यूझीलंडशी मुकाबला होत आहे. साखळी सामन्यात पावसामुळे न्यूझीलंडसोबतचा सामना झाला नव्हता.  त्यामुळे यंदाच्या विश्वचषकात दोन्ही संघ पहिल्यांदाज एकमेकांशी भीडत आहेत. आज किवींना हरवून कोहली ब्रिगेडला वर्ल्डकपच्या फायनलमध्ये धडक देण्याचा इरादा आहे.

LIVE UPDATE

  • IndvsNZ – भारताला दुसरं यश, हेन्री निकोल्स (28) बाद, जाडेजाला पहिली विकेट, न्यूझीलंड 69/2 (18.2)
  • INDvNZ : भारताला पहिलं यश, मार्टिन गप्टील (1) बाद, बुमराची पहिली विकेट, न्यूझीलंड 1/1 (3.3)
  • पहिल्या दोन ओव्हर मेडन, भुवनेश्वर आणि बुमराहची झोकात सुरुवात

एकदिवसीय क्रमवारीत अव्वल असलेली टीम इंडिया, फलंदाजीत अव्वल असलेला विराट कोहली, गोलंदाजीच्या क्रमवारीत अग्रस्थानी असलेला जसप्रीत बुमराह आणि एकाच विश्वचषकात पाच शतकं करणार रोहित शर्मा, अशी तगडी असणाऱ्या टीम इंडियाला तिसऱ्यांदा विश्वचषक जिंकण्याची संधी आहे. विराट कोहली आज कोणता संघ घेऊन मैदानात उतरतो हे पाहणं महत्त्वाचं असेल. सध्या भारताची मधली फळी म्हणावी तशी तळपली नाही. त्यामुळे केदार जाधवला संधी मिळणार की त्याच्याऐवजी दिनेश कार्तिकच खेळणार हे पाहावं लागेल.

यंदाच्या विश्वचषकात इंग्लंडविरुद्धच्या सामन्यात आलेला गतिरोधक वगळता आणि न्यूझीलंडविरुद्ध पावसामुळे वाया गेलेला सामना वगळता भारतीय संघाची विजयी कामगिरीचा आलेख इतर संघापेक्षा वरचढ आहे. भारताने यंदाच्या विश्वचषकात सर्वाधिक सामने जिंकले आहेत. त्यामुळे आता विश्वषकाच्या मोहिमेला आता सुवर्णमुलामा देण्याची घटिका जवळ आली आहे. दोन पावलांचा उंबरठा पार केला की पुन्हा चॅम्पियन !

श्रीलंकेवर सात गडी राखून मात करीत टीम इंडियानं सेमी फायनलच्या गुणतालिकेत आपलं पहिलं स्थान पक्क केलं. मात्र आता न्यूझीलंडविरुद्धचा पेपर तितकासा सोपा नाही.

विराट कोहली V/S ट्रेंट बोल्ट कोहलीचा न्यूझीलंड विरुद्ध वनडे मधला रेकॉर्ड चांगला आहे. पण त्याच्यासाठी सर्वात मोठा धोका हा किवी जलद गोलंदाज ट्रेंट बोल्ट असेल. बोल्ट कोहलीला आउट-स्विंग आणि इन-स्विंगसह सारखे बॉल टाकून त्रास देऊ शकतो.  बोल्टनं भारताविरूद्ध 12 सामन्यांत 22 विकेट घेतल्या आहेत.

रोहित शर्मा V/S टीम साऊदी

रोहितनं विश्वचषकात 5 शतकं ठोकली आहेत. पण आता रोहितचा सामना हा न्यूझीलंडचा जलद गोलंदाच टीम साऊदीशी होणार आहे. साऊदीने 2013 पासून भारताच्या टॉप-ऑर्डरविरुद्ध सर्वोत्तम कामगिरी नोंदवली आहे.

हार्दिक पंड्या V/S मिशेल सँटेनर पंड्या आणि सेंटनर मधील द्वंद्वही बघण्यासारखं असेल. सँटेनर हा जगातील सर्वात चतुर स्पिनर्सपैकी एक आहे. न्यूझीलंडचा हा उगवता तारा आपल्या गोलंदाजीने अनेक श्रेष्ठ फलंदाजाला गोंधळवू शकतो.  गेल्या दोन सामन्यांमध्ये भारताच्या गोलंदाजांनी उत्तम काम केलं आहे. या सामन्यांत ती कामगिरी कायम ठेवण्याचं आव्हान भारती गोलंदाजांसमोर आहे.

जसप्रीत बुमरा V/S मार्टिन गप्टिल आपल्या क्रिकेट करिअर मधला पहिलाच विश्वकप खेळत असलेल्या बुमराचा सामना न्यूझीलंडचा सलामीवीर मार्टिन गप्टिलशी होईल. गप्टिल का न्यूझीलंडचा वादळी फलंदाज आहे. त्याने मोठे शॉट्स खेळायला सुरुवात केली की त्याला थांबवणे अशक्य आहे.

कुलदीप यादव V/S केन विल्यमसन विल्यमसन हा स्पिन बॉलिंगवर खेळणारा चांगला खेळाडू आहे. त्यामुळे विल्यमसन आणि कुलदीप यादव यांच्यातील सामना बघणं ही मजेशीर असेल.

न्यूझीलंडच्या फलंदाजीला वेसण घालण्यासाठी मार्टिन गप्टिल, केन विल्यमसन आणि रॉस टेलर यांच्याविरोधात भारताच्या गोलंदाजांना विशेष रणनीती आखावी लागेल. स्पर्धेत मागे वळून पाहिल्यास न्यूझीलंडच्या तुलनेत भारतीय संघाने अधिक सातत्यपूर्ण कामगिरी केली आहे. मात्र उपांत्य फेरीसारख्या लढतीत आधीच्या कामगिरीपेक्षा त्या त्या दिवसाचा खेळ निर्णायक ठरतो. त्यामुळे भारतीय संघाला आजच्या सामन्यात स्पर्धेतील आधीची कामगिरी विसरून नव्याने खेळ करून दाखवावा लागेल.

भारतीय संघ :

विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा (उपकर्णधार), केएल राहुल, महेंद्रसिंह धोनी, केदार जाधव, दिनेश कार्तिक, ऋषभ पंत, मयांक अग्रवाल, यजुवेंद्र चहल,  कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, भुवनेश्वर कुमार, हार्दिक पंड्या,  रवींद्र जाडेजा आणि मोहम्मद शमी

Published On - 9:56 am, Tue, 9 July 19

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI