Ranji Trophy 2026-27 : चंबळमधून डाकू यायचे पण आता एक क्रिकेटपटू आला, रणजीच्या पहिल्याच सामन्यात त्याने कमाल केली, कोण आहे सक्षम पुरोहित?
Ranji Trophy 2026-27 : एकवेळ चंबळचं खोरं हे डाकूंसाठी प्रसिद्ध होतं. चंबळच्या खोऱ्यावर डाकूंवर आधारित अनेक हिंदी सिनेमेही आहेत. आता याच चंबळमधून यशस्वी क्रिकेटपटू बाहेर येत आहेत.

इंदूरच्या होळकर स्टेडियमवर मध्य प्रदेश विरुद्ध बिहार सामना सुरु आहे. याच स्टेडियमच्या पीचवर बिहारची संपूर्ण टीम 99 रन्सवर ऑलआऊट झाली. पण त्याच पीवचर डावखुरा फलंदाज सक्षम पुरोहितने शानदार शतक ठोकलं. महत्वाचं म्हणजे सक्षमचा हा पहिला रणजी ट्रॉफी सामना होता. डेब्यू मॅच मध्ये पहिल्या दिवसाचा खेळ संपताना सक्षम पुरोहितने 166 चेंडूत नाबाद 113 धावा ठोकल्या. सक्षम चंबळचा राहणारा आहे. या खेळाडूने पहिल्याच सामन्यात आपली क्षमता दाखवून दिलीय. सक्षम बद्दल काही खास गोष्टी जाणून घेऊया.
एकवेळ चंबळचं खोरं हे डाकूंसाठी प्रसिद्ध होतं. चंबळच्या खोऱ्यावर डाकूंवर आधारित अनेक हिंदी सिनेमेही आहेत. आता याच चंबळमधून यशस्वी क्रिकेटपटू बाहेर येत आहेत. सक्षम पुरोहित त्याचं उत्तम उदहारण आहे. हा विकटेकीपर फलंदाज चंबळ मध्ये लोकप्रिय आहे. सक्षमचे वडिल जितेंद्र पुरोहित एक शिक्षक आहेत. वयाच्या 12 व्या वर्षापासून सक्षम क्रिकेट अकादमीत जायचा. चौधरी दिलीप सिंह लॉ कॉलेज ग्राऊंडवर कोच रवी शखेर कटारे यांच्याकडे सक्षमने क्रिकेटचे धडे गिरवले.
कुठल्या-कुठल्या वयोगटात खेळलाय?
सक्षम मध्य प्रदेशच्या अंडर 14, अंडर 16, अंडर 19 आणि अंडर 23 टीमकडून खेळलाय. कर्नल सी के नायडू ट्रॉफीमध्ये तो मध्य प्रदेशचा कर्णधारही होता. मध्य प्रदेश टी20 लीगमध्ये तो मालवा स्टॅलियन्सकडूनही खेळला. अलीकडेच अंडर 23 मध्ये पंजाब विरुद्ध मध्य प्रदेशचं नेतृत्व केलं. 165 धावा ठोकल्या. चंदीगड विरुद्ध त्याने 130 रन्स केल्या. या प्रदर्शनाच्या आधारावर सक्षमला मध्य प्रदेशच्या रणजी टीममध्ये स्थान मिळालं. त्याने आता पहिल्याच सामन्यात शतकी खेळी केलीय.
मुंबईकडून मुशीर खानचं शतक
चंदीगडच्या मैदानावर हिमाचल प्रदेश विरुद्ध सुरु असलेल्या सामन्यातही चंदीगडचे ओपनर्स शानदार इनिंग खेळले. नेहल पजनीने नाबाद 126 धावा केल्या. अर्जुन आझादने 147 धावा केल्या. मनन वोहराने 61 धावा केल्या. झारखंड विरुद्ध दिल्लीचा कॅप्टन आयुष बदोनी सुद्धा शानदार शतकी इनिंग खेळला. मुंबईकडून मुशीर खान आणि अंगकृष रघुवंशीने सेंच्युरी झळकवली. रघुवंशीचं रणजीमधलं हे पहिलं शतक आहे.