बहिणीप्रमाणे सानिया मिर्झा पुन्हा अडकणार विवाह बंधनात?

भारताची स्टार टेनिसपटू सानिया मिर्झा सध्या तिच्या घटस्फोटामुळे चर्चेत आहे. नुकतीच ती अंनत अंबानी यांच्या विवाह सोहळ्यात दिसली होती. सानिया मिर्झाचा घटस्फोट झाल्यानंतर आता ती दुसरं लग्न करणार असल्याची चर्चा सुरु आहे. सानियाची बहीण अनमचा देखील दुसरा विवाह झाला आहे.

बहिणीप्रमाणे सानिया मिर्झा पुन्हा अडकणार विवाह बंधनात?
| Updated on: Jul 19, 2024 | 8:43 PM

भारताची स्टार टेनिसपटू सानिया मिर्झा गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहे. काही ठिकाणी तिचे नाव क्रिकेटपटू मोहम्मद शमीसोबत जोडले जात आहे तर काही ठिकाणी ती एका मोठ्या उद्योगपतीसोबत लग्न करणार असल्याचे बोलले जात आहे. कारण असे की, याच वर्षी सानिया मिर्झाचा पाकिस्तानी क्रिकेटपटू शोएब मलिकसोबत घटस्फोट झालाय. त्यानंतर सानिया मिर्झाच्या दुसऱ्या लग्नाच्या चर्चा सुरू आहेत. सानिया मिर्झाच्या आधी तिच्या बहिणीनेही घटस्फोटानंतर दुसरं लग्न केलं होतं, त्यामुळे तिच्या बहिणीप्रमाणे तीही लवकरच सेटल होऊ शकते असं बोललं जात आहे.

सानिया मिर्झा आणि शोएब मलिक यांनी 2010 मध्ये विवाह केला होता. पण 14 वर्षानंतर त्यांच्या नात्यात तिसरा कोणीतरी व्यक्ती आला आणि दोघांनी घटस्फोट घेतला. जानेवारी महिन्यात दोघे एकमेकांपासून वेगळे झाले. सानिया पाकिस्तान सोडून हैदराबादला आली आहे. सध्या ती तिच्या आई-वडिलांसोबत राहत आहे. दुसरीकडे शोएब मलिकने पाकिस्तानी टीव्ही अभिनेत्री सना जावेदशी तिसरे लग्न केले आहे. पण त्याला पाकिस्तानात मोठ्या प्रमाणात ट्रोल देखील केले गेले.

कोण आहे सानियाची बहीण?

सानिया मिर्झाची बहिणीचे नाव अनम मिर्झा आहे. तिने मीडिया स्टडीजमध्ये पदवी घेतली आहे. तसेच अनेक राष्ट्रीय वाहिन्यांमध्ये प्रशिक्षणार्थी म्हणूनही काम केले आहे. अनम मिर्झाने 2016 मध्ये हैदराबादचे व्यापारी अकबर रशीद यांच्यासोबत विवाह केला. पण दोन वर्षानंतर त्यांचा घटस्फोट झाला. त्यानंतर तिने 2019 मध्ये अनुभवी क्रिकेटर आणि राजकारणी मोहम्मद अझरुद्दीन यांचा मुलगा मोहम्मद असदुद्दीनशी लग्न केले.

अनम मिर्झा 300 कोटींची मालकीण

मीडिया रिपोर्ट्सवर अनम मिर्झा ही जवळपास 300 कोटींची मालकीण आहे. पत्रकारितेचा कोर्स केल्यानंतर अनमने अनेक राष्ट्रीय स्तरावरील वाहिन्यांमध्ये इंटर्नशिप केली आहे. पण 2013 मध्ये तिचे मन व्यवसायाकडे वळले. त्यानंतर त्यांनी ‘इंक टू चेंज’ ही मीडियाशी संबंधित वेबसाइट सुरू केली.  त्यानंतर 2014 मध्ये त्यांनी फॅशन इंडस्ट्रीत प्रवेश केला. या व्यवसायानंतर अनमने 2022 मध्ये एक मोठा रमजान एक्सपो दावत-ए-रमजान सुरू केला.

2023 मध्ये, अनमने 2014 च्या ‘द लेबल बाजार’ नंतर आणखी एक फॅशन लेबल सुरू केले. त्याचे आणि मोहम्मद असदुद्दीन यांच्या मुलीच्या दुआच्या नावावरून ‘दुआ इंडिया’ असे नाव दिले. याशिवाय अनम तिच्या यूट्यूब चॅनलवरून लाखो रुपये कमवते. रिपोर्ट्सनुसार, त्यांची एकूण संपत्ती 331 कोटी रुपये आहे.

सानिया पुन्हा लग्न करणार का?

सानिया मिर्झा आणि मोहम्मद शमी लवकरच लग्न करणार असल्याची चर्चा सोशल मीडियावर सुरू आहे. शोएब मलिकपासून घटस्फोट घेतल्यानंतर सानिया मिर्झा आपल्या मुलासोबत एकटीच राहत आहे. जेव्हा सानिया मिर्झाला तिच्या लग्नाबद्दल विचारले जाते तेव्हा ती उघडपणे काहीही बोलत नाही. पण असे मानले जात आहे की सानिया मिर्झा लवकरच तिच्या बहिणीप्रमाणे दुसरे लग्न करू शकते.