
भारताचा माजी क्रिकेटपटू संजय बांगर याचा मुलगा मध्यंतरी खूपच चर्चेत होता. त्याने हार्मोन ट्रान्सप्लांट केलं आणि आता तो मुलगी बनला आहे. मुलीच्या रुपात आल्यावर त्याने प्रथमच जगासमोर डान्सचं कौशल्य सादर केलं. तिने इन्स्टाग्रामद्वारे संपूर्ण जगाला तिच्या नृत्याच्या अदा दाखवल्या आहेत. जर तुम्ही त्या डान्स मूव्हज पाहिल्या तर तुम्ही म्हणाल की ती बॉलिवूडच्या तमन्ना, कतरिना किंवा मलायकापेक्षा कमी नाही. ज्याप्रमाणे त्या नायिका डान्सचा जलवा सादर करतात, त्याचप्रमाणे अनाया बांगरही उत्तम नृत्य करते.
इन्स्टाग्रामवर शेअर केला डान्स व्हिडीओ
अनाया बांगरने इंस्टाग्रामवर शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये ती तिच्या मैत्रिणीसोबत नाचताना दिसत आहे. तिची मैत्रीण लीड पोझिशनला दिसते आहे, तर अनाया तिच्या मागे बसून तिच्या मैत्रिणीला फॉलो करते. त्या एखाद्या डान्स शोची तयारी करत आहेत, असं व्हिडीओ पाहून वाटतंय.
इंग्लंडमध्ये हार्मोन ट्रान्सप्लांट करून बनली मुलगी
इंग्लंडमध्ये हार्मोन ट्रान्सप्लांटनंतर संजय बांगर यांचा मुलगा आता मुलगी बनला आहे. संजय बांगरचा मुलगा, हा यापूर्वी आर्यन बांगर म्हणून ओळखला जात होता, मात्र आता मुलगी झाल्यानंतर त्याला अनया बांगर म्हणून ओळखले जाते. अनया काही दिवसांपूर्वीच इंग्लंडहून भारतात आली आहे. भारतात पोहोचल्यानंतर, तिने सर्वात पहिले काम केले ते म्हणजे तिचे केस स्ट्रेट करतानाचा व्हिडिओ शेअर केला.
भारतात आल्यानंतर, अनया बांगर येथील पारंपारिक मुलींचे कपडे घालून आनंदी दिसत होती. सलवार कमीजमध्ये एक व्हिडिओ पोस्ट करताना तिने लिहिले की ती भारताच्या पारंपारिक पोशाखाच्या प्रेमात पडली आहे.
मुलगी होण्यापूर्वी खेळायचा क्रिकेट
संजय बांगर यांच्या मुलगा हा मुलगी होण्यापूर्वी तो इंग्लंडसाठी क्लब स्तरावरील क्रिकेट सामने खेळला होता. तो अंडर एज क्रिकेट स्पर्धेत यशस्वी जयस्वालसोबतही खेळला आहे. पण आर्यनपासून अनया होताच त्याने त्याची क्रिकेटर ओळखही गमावली.