लंडनमध्ये शुभमन गिलनंतर आता सारा तेंडुलकरचे या खास व्यक्तीसोबत सेलिब्रेशन

शुभमन गिल आणि सारा तेंडुलकरचे नाव सतत चर्चेत असते. युवराज सिंगच्या आयोजित डिनर पार्टीत शुभमन आणि साराचे अनेक फोटो व्हायरल झाले होते. मात्र त्यानंतर साराचे आणखी एका सेलिब्रेशनचे फोटो समोर आले आहेत. त्याचीही जोरदार चर्चा सुरु आहे.

लंडनमध्ये शुभमन गिलनंतर आता सारा तेंडुलकरचे या खास व्यक्तीसोबत सेलिब्रेशन
Sara Tendulkar Celebrates Bastille Day in France
Image Credit source: Instagram
| Updated on: Jul 17, 2025 | 7:19 PM

सचिन तेंडुलरची लेक सारा तेंडुलकर नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असते. त्यात शुभमन गिलचं नाव जोडलं गेलं की चर्चांना उधाण येतं. नुकतंच सारा आणि शुभमन लंडनमध्ये एकत्र दिसले होते.

युवराज सिंगच्या आयोजित डिनर पार्टीत शुभमन आणि साराचे अनेक फोटो व्हायरल झाले होते 

युवराज सिंगने डिनर पार्टी आयोजित केली होती त्या पार्टीमध्ये दोघांनीही हजेरी लावली होती. या दोघांची अनेक फोटो आणि व्हिडिओ व्हायरल झाले होते. पण, त्या पार्टीनंतर काही दिवसांनी सारा तेंडुलकर पुन्हा एकदा एका व्यक्तीसोबत सेलिब्रेशन करताना दिसली.

शुभमन गिलच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाचा लॉर्ड्सवर पराभव झाला होता.

तसेच साराच्या सेलिब्रेशनचे फोटो त्याच तारखेचे आहेत ज्या दिवशी शुभमन गिलच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाचा लॉर्ड्सवर पराभव झाला होता. पण तिच्या सेलिब्रेशनचा आणि टीम इंडियाच्या हारण्याचा काही एक संबंध नाही. मग ती काय सेलिब्रेट करत होती?

सारा तेंडुलकर कशाचं सेलिब्रेशन करत होती?

14 जुलै रोजी सारा तेंडुलकर इंग्लंडमध्ये नव्हती तर ती फ्रान्समध्ये होती. फ्रान्स दरवर्षी 14 जुलै रोजी देशात सुरू झालेल्या क्रांतीचा उत्सव साजरा केला जातो. फ्रान्समध्ये याला ‘बॉस्टिल डे’ म्हणतात. सारा तेंडुलकर तिची मैत्रीण साशा जयरामसोबत हाच उत्सव साजरा करताना दिसली. फ्रान्समधील बॉस्टिल डे निमित्त सारा तेंडुलकरने तिच्या सेलिब्रेशनचे फोटो इंस्टा स्टोरीमध्ये पोस्ट केले होते.

काही फोटो आणि व्हिडिओ तिची मैत्रीण साशा जयरामनेही शेअर केले आहेत. सारा तेंडुलकरची मैत्रीण साशा जयराम ही व्यवसायाने फॅशन डिझायनर आहे. तर सारा तेंडुलकर सचिन तेंडुलकर फाउंडेशनची डायरेक्टर आहे.

या फ्रेंडसोबत इंग्लंडमध्ये पाहिले होते विम्बल्डन
सारा तेंडुलकरला यापूर्वी तिची मैत्रीण बनिता संधूसोबत इंग्लंडमध्ये पाहिले होते. तिने लंडनमध्येही विम्बल्डनचा पुरेपूर आनंद घेतला होता. पण विम्बल्डन संपताच सारा तेंडुलकर फ्रान्सला ट्रीपला निघून गेली. सारा तेंडुलकर सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. तिचे अपडेट ती तिच्या चाहत्यांसोबत शेअर करत असते.