Sachin Tendulkar: सत्यसाईबाबांच्या निधनानं खचलेला सचिन तेंडुलकर, दोन दिवस… काय घडलेलं?

सचिन तेंडुलकर हे सत्य साईबाबा यांचा मोठा भक्त आहे. ही गोष्ट सर्वांनाच माहित होती कोणासाठी नवीन नाही. पण त्यांच्या निधनाची बातमी ऐकताच सचिनने काय केले होते ते पाहा...

Sachin Tendulkar: सत्यसाईबाबांच्या निधनानं खचलेला सचिन तेंडुलकर, दोन दिवस... काय घडलेलं?
| Updated on: Oct 27, 2026 | 3:12 PM

Sachin Tendulkar News: मास्टर ब्लास्टर आणि क्रिकेटचा देव म्हणून ओळखला जाणारा सचिन तेंडुलकर श्री सत्य साईबाबांच्या भक्तांपैकी एक आहे. सचिन तेंडुलकर अनेकदा सत्य साईबाबांचं दर्शनासाठी गेला आहे. आताही अधून मधून सचिन तेंडुलकर त्यांच्या समाधीचं दर्शन घेण्यासाठी जात असतो. जेव्हा श्री सत्य साईबाबा यांच्या शताब्दी समारंभात सचिनने हजेरी लावलेली तेव्हा त्यांनी एक अननभव बोलून दाखवला होता. आंध्र प्रदेशातील पुट्टपर्ती येथे हा शताब्दी समारंभ पार पडला होता. तेव्हा या समारंभात भारतरत्न सचिन तेंडुलकर याने 2011 वर्ल्डकप स्पर्धेदरम्यान सत्य साईबाबांशी निगडीत एक अनुभव बोलून दाखवला होता. स्पर्धेदरम्यान कसा आत्मविश्वास दिला याबाबत आर्वजून सांगितले. माजी क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर याने, श्री सत्य साईबाबा यांचा त्याच्या जीवनावर कसा प्रभाव होता याबाबतचाही अनुभव बोलून दाखवला होता.

२०११ च्या वर्ल्डकप दरम्यान काय घडलं होतं?

Loading...

सचिन तेंडुलकरने सांगितले की, हा शेवटचा वनडे वर्ल्डकप आहे हे माहिती होते. क्रिकेटमधील सर्वात मोठी ट्रॉफी जिंकण्याची शेवटची संधी असणार होती. संघासोबत बंगळुरुमधील एका कॅम्पमध्ये होतो आणि नेमका तेव्हाच माझा फोन वाजला. त्यात सांगितले की, बाबांनी माझ्यासाठी एक पुस्तक पाठवले आहे. ते ऐकून आनंदाला पार गगनाला भिडला होता. त्यामुळे माझ्या मनात भावना आल्या की हा वनडे वर्ल्डकप माझ्यासाठी खास असणार आहे. बाबांच्या पुस्तकाने मला आत्मिक शक्ती दिली आणि माझा आत्मविश्वास वाढला. हे पुस्तक संपूर्ण स्पर्धेत माझ्यासोबत खऱ्या साथीदारासारखे राहिले.”

सत्य साईबाबांच्या मृत्यूची बातमी समजताच…

सचिन तेंडुलकर बाबा यांच्या निधनाच्या वेळी प्रचंड खचले होते. असं म्हणतात की, जेव्हा बाबा यांच्या निधनाची बातमी सचिनला समजली होती तेव्हा त्याने एका खोलीत कोंढून घेतले होते. तो तेव्हा हैदराबादमधील एका हॉटेल रुममध्ये थांबलेला. त्याचा त्या दिवशी वाढदिवस होता. अगदी त्याच दिवशी अशी बातमी समजल्यामुळे तो प्रचंड दुखावला असेल आणि त्याने स्वत:ला कोंढून घेतले असेल.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us