AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

रोहित-श्रेयस आणि जयस्वाल सेंट्रल करारातून बाद! एमसीएने सांगितलं सर्वकाही…

MCA Central Contracts: मुंबई क्रिकेट असोसिएशनने एक मोठी घोषणा केली आहे. बीसीसीसआयप्रमाणे मुंबई क्रिकेट असोसिएशन खेळाडूंसोबत सेंट्रल करार करणार आहे. यात काही स्टार खेळाडूंचा समावेश होणार नाही. त्याला कारणही तसंच आहे.

रोहित-श्रेयस आणि जयस्वाल सेंट्रल करारातून बाद! एमसीएने सांगितलं सर्वकाही...
रोहित-श्रेयस आणि जयस्वाल सेंट्रल करारातून बाद! एमसीएने सांगितलं सर्वकाही... Image Credit source: PTI
Rakesh Thakur
Rakesh Thakur | Updated on: Jan 14, 2026 | 10:31 PM
Share

MCA Central Contracts: मुंबई क्रिकेट असोसिएशनने मुंबई क्रिकेटला बळ देण्यासाठी मोठा निर्णय घेतला. एपेक्स काउंसिलच्या बैठकीत काही महत्त्वाचे निर्णय घेतले गेला. यात काही महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा केली गेली. तसेच काही निर्णयांवर शिक्कामोर्तब लावला गेला. यात दिलीप वेंगसरकर इंटर कॉलेज स्पर्धा, सेंट्रल करार आणि टी20 स्काउटिंग लीगसारखे मुद्द्यांवर चर्चा केली गेली. वरिष्ठ खेळाडूंसाठी सेंट्रल करार करण्याचा निर्णय खूपच महत्त्वाचा आहे. कारण अनेक खेळाडूंना आर्थिक कारणामुळे क्रिकेटवर फोकस करणं कठीण होतं. अशा स्थितीत सेंट्रल करारामुळे त्यांना फायदा होणार आहे. खेळाडूंच्या भविष्याच्या दृष्टीने हा निर्णय महत्त्वाचा ठरणार आहे. वरिष्ठ संघाच्या खेळाडूंसाठी सेंट्रल करार सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे.

मिडिया रिपोर्टनुसार, एमसीएच्या सेंट्रल करारातून भारतीय संघाचे खेळाडू आणि आयपीएल खेळाडूंना वगळण्यात येणार आहे. म्हणजेच रोहित शर्मा, श्रेयस अय्यर, सरफराज खान या सारख्या खेळाडूंना हा करार मिळणार नाही. म्हणजेच या करारात नवोदीत आणि देशांतर्गत क्रिकेटमध्ये सक्रिय असलेल्या वरिष्ठ खेळाडूंना मानधन मिळेल. त्यामुळे त्यांच्या आर्थिक गरजा पूर्ण होतील आणि कोणत्याही चिंतेशिवाय क्रिकेटवर फोकस करू शकतील. एमसीएने एक पत्रकात स्पष्ट सांगितलं की, “खेळाडूंच्या दीर्घकालीन विकासासाठी, अ‍ॅपेक्स कौन्सिलने खेळाडूंसाठी केंद्रीय करार मंजूर केले आहेत, जे उदयोन्मुख प्रतिभेला आधार आणि आर्थिक सुरक्षा प्रदान करेल.”

इंटर कॉलेज स्पर्धा होणार असल्याने खेळाडूंना नवी संधी मिळणार आहे. या स्पर्धेला टीम इंडियाचे माजी कर्णधार दिलीप वेंगसरकर यांचं नाव दिलं जाईल. इतकंच काय तर एमसीएने एक समर्पित टी20 स्काउटिंग स्पर्धा आयोजित करण्याची योजना आखली आहे. एमसीएचे अध्यक्ष अजिंक्य नाईक म्हणाले, “मुंबई क्रिकेटची समृद्ध परंपरा जपताना तरुण पिढीला बळकटी देण्यासाठी हे निर्णय महत्त्वाचे आहेत. एमसीएच्या या उपक्रमामुळे केवळ देशांतर्गत क्रिकेटच बळकट होणार नाही तर राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर मुंबईच्या खेळाडूंची उपस्थितीही बळकट होईल.”

छत्रपती संभाजीनगरमध्ये निवडणुकीची तयारी पूर्ण; 1267 केंद्रांवर मतदान
छत्रपती संभाजीनगरमध्ये निवडणुकीची तयारी पूर्ण; 1267 केंद्रांवर मतदान.
सिंचन योजनेत 110 कोटींचा घोटाळा, पवारांच्या आरोपांवर काय म्हणाले खडसे?
सिंचन योजनेत 110 कोटींचा घोटाळा, पवारांच्या आरोपांवर काय म्हणाले खडसे?.
येवल्यात तीन दिवसीय पतंग महोत्सवाची धूम
येवल्यात तीन दिवसीय पतंग महोत्सवाची धूम.
अपरात्री शेतातून येतो कुत्र्यांचा, माणसाचा आवाज... शेतकऱ्यांची शक्कल
अपरात्री शेतातून येतो कुत्र्यांचा, माणसाचा आवाज... शेतकऱ्यांची शक्कल.
मनपा निवडणुकीला काही तास शिल्लक असताना शिंदेंचा ठाकरेंना धक्का
मनपा निवडणुकीला काही तास शिल्लक असताना शिंदेंचा ठाकरेंना धक्का.
..म्हणून आता मंदिरात वणवण फिरतायत! आशिष शेलारांचा ठाकरे बंधूंवर निशाणा
..म्हणून आता मंदिरात वणवण फिरतायत! आशिष शेलारांचा ठाकरे बंधूंवर निशाणा.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचा नामविस्तार दिन उत्साहात
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचा नामविस्तार दिन उत्साहात.
ठाकरे बंधू एकत्र येणं म्हणजे भीतीसंगम! फडणवीसांची टीका
ठाकरे बंधू एकत्र येणं म्हणजे भीतीसंगम! फडणवीसांची टीका.
काँग्रेस जिंकते तेव्हा.... PADUच्या वादावर भाजपचं प्रत्युत्तर
काँग्रेस जिंकते तेव्हा.... PADUच्या वादावर भाजपचं प्रत्युत्तर.
उद्या मतदान, अनेक भागात पैसे वाटल्याचा आरोप; नेमकं काय घडलं?
उद्या मतदान, अनेक भागात पैसे वाटल्याचा आरोप; नेमकं काय घडलं?.