AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

45 वर्षीय शाहीद आफ्रिदीला पाचवी मुलगी, नेटकरी म्हणाले, अजून 6 हव्या!

आफ्रिदीने सोशल मीडियावर सर्व पाचही मुलींसोबत फोटो शेअर करुन चाहत्यांना (Shahid Afridi fifth Daughter) ही बातमी दिली.

45 वर्षीय शाहीद आफ्रिदीला पाचवी मुलगी, नेटकरी म्हणाले, अजून 6 हव्या!
| Updated on: Feb 15, 2020 | 1:00 PM
Share

इस्लामाबाद : पाकिस्तानी संघाचा माजी कर्णधार शाहीद आफ्रिदी पुन्हा एकदा बाबा झाला आहे.  45 वर्षीय शाहीद आफ्रिदीला पाचवं कन्यारत्न (Shahid Afridi fifth Daughter) झालं आहे.  आफ्रिदीने सोशल मीडियावर सर्व पाचही मुलींसोबत फोटो शेअर करुन चाहत्यांना (Shahid Afridi fifth Daughter) ही बातमी दिली. इन्स्टाग्रामवर फोटो पोस्ट करताना आफ्रिदी म्हणाला, “अल्लाचे आशीर्वाद आणि दया माझ्यावर आहे. चार सुंदर मुलींनंतर आता आणखी एका मुलीचा पिता झालो आहे. तुम्हा सर्वांसोबत ही गुड न्यूज शेअर करताना मला आनंद होत आहे”

आफ्रिदीच्या जन्मतारखेवरुन वाद आहे. आफ्रिदीने 1980 हे जन्मवर्ष असल्याचं म्हटलं होतं. मात्र त्याच्या आत्मचरित्रात 1975 हे जन्मवर्ष असल्याचं मान्य केलं. त्यानुसार 45 वर्षीय आफ्रिदीला अक्सा, अंशा, अज्वा आणि अस्मारा अशा चार मुली आहेत.  त्यामध्ये आता नव्या चिमुकलीची भर पडली आहे.

दरम्यान, शाहीद आफ्रिदीला पाच अपत्य झाल्यानंतर सोशल मीडियावर वेगवेगळ्या कमेंट येत आहेत. कोणी शाहीद आफ्रिदीचं अभिनंदन करत आहे, तर कोणी त्याला टोमणे मारत आहे.

शाहीद आफ्रिदी मुलाच्या हव्यासापोटी अनेक अपत्यांना जन्म देत आहे, अशाही कमेंट येत आहेत. तर काही लोक शाहीद आफ्रिदीला महिला क्रिकेट संघ बनवायचा आहे, अशा कमेंट करत आहेत. दुसरीकडे काही नेटीझन्स आफ्रिदीला पाकिस्तानच्या लोकसंख्येचा विचार करण्याचा सल्ला देत आहेत.

शाहीद आफ्रिदी हा पाकिस्तानचा लोकप्रिय क्रिकेटपटू आहे. आक्रमक फलंदाज म्हणून आफ्रिदीची जागतिक क्रिकेटमध्ये ओळख होती. पहिलं वेगवान शतक आफ्रिदीच्या नावावर आहे.

आफ्रिदीने वय लपवल्याचा आरोप

पाकिस्तानी क्रिकेटपटू शाहीद आफ्रिदीने (Shahid Afridi ) तब्बल 23 वर्षे जगाला धोका दिल्याचं समोर आलं आहे. आफ्रिदीने स्वत:चं वय लपवल्याचा आरोप आहे. त्यामुळे आयसीसीने आफ्रिदीला दिलेले गौरव परत घेण्याची शक्यता आहे. आफ्रिदीने जन्मतारीख 5 वर्षांनी कमी करुन सांगितली होती. आफ्रिदी 1980 हे जन्मवर्ष सांगत होता, मात्र त्याचं खरं जन्मवर्ष 1975 आहे. आफ्रिदीने आत्मचरित्रामध्येच (shahid afridi autobiography Game Changer ) त्याचा उल्लेख केला आहे.

आफ्रिदीने 1996 मध्ये नैरोबीमध्ये श्रीलंकेविरुद्ध केवळ 37 चेंडूत शतक ठोकलं होतं. त्यावेळी अवघ्या 16 वर्षाच्या मुलाने हा आंतरराष्ट्रीय विक्रम केल्याचं म्हटलं जात होतं. मात्र आता आफ्रिदीचं खरं वय समोर आलं आहे.

आफ्रिदीने 27 कसोटी, 398 वन डे आणि 99 टी 20 आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. आफ्रिदीने टी 20 वर्ल्डकप 2016 नंतर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली.

संबंधित बातम्या 

शाहीद आफ्रिदी तब्बल 23 वर्षे खोटं बोलला, आयसीसी कारवाई करणार?

कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.