“बाप बाप होता है” वगैरे घडलंच नाही, सेहवाग खोटारडा : अख्तर

| Updated on: May 11, 2020 | 12:58 PM

मैदानावर जर असे काही झाले असते, तर मी सेहवागला सोडले नसते, असेही शोएब अख्तर म्हणाला. (Shoaib Akhtar Denies Baap Baap Hota Hai Fable told by Virender Sehwag)

बाप बाप होता है वगैरे घडलंच नाही, सेहवाग खोटारडा : अख्तर
Follow us on

मुंबई : क्रिकेटचा देव सचिन तेंडुलकर याच्या स्तुतीमध्ये भारताचा खंदा फलंदाज वीरेंद्र सेहवाग याने सांगितलेला ‘बाप बाप होता है, बेटा बेटा होता है’ असा किस्सा खोटा असल्याचा दावा ‘रावळपिंडी एक्स्प्रेस’ नावाने प्रसिद्ध पाकिस्तानी क्रिकेटपटू शोएब अख्तरने केला आहे. 2003 च्या विश्वचषकात मुलतानमधील मैदानावर घडलेला किस्सा क्रीडा रसिकांमध्ये लोकप्रिय आहे. (Shoaib Akhtar Denies Baap Baap Hota Hai Fable told by Virender Sehwag)

शोएब अख्तरने Helo अॅपवर लाईव्ह येत क्रीडा पत्रकार विमल कुमार यांच्याशी बातचित केली. या लाईव्हमध्ये अख्तरला सचिन-सेहवागच्या ‘बाप बाप होता है, बेटा बेटा होता है’ या किश्श्याबद्दल विचारण्यात आले. तेव्हा असे काही झालेच नव्हते, हे सर्व खोटे आहे, असा दावा अख्तरने केला. मैदानावर जर असे काही झाले असते, तर मी सेहवागला सोडले नसते, असेही शोएब अख्तर म्हणाला.

“मी सेहवागची गचांडी पकडून विचारलं, तू टीव्हीवर ही गोष्ट सांगितली आहेस का, तर तो पलटला. गौतम गंभीरला विचारा. मी त्याला बोललो जर मी पाहिलं की तू टीव्हीवर हे सांगितलं आहेस, तर मी तुला सोडणार नाही. मी गरम डोक्याचा माणूस आहे. मैदानावर जर असे काही झाले असते, तर मी सेहवागला सोडले नसते” असं अख्तरने सांगितलं. (Shoaib Akhtar Denies Baap Baap Hota Hai Fable told by Virender Sehwag)

काय आहे किस्सा?

“शोएब मला गोलंदाजी करत होता. मला बघून बघून तो थकला होता. त्याने विचार केला, शिव्या दिल्या तर मी आऊट होईन. त्याने बाऊन्सर टाकायला सुरुवात केली. प्रत्येक बॉलनंतर बोलायचा, हुक मारुन दाखव. तर एका ओव्हरनंतर मला वाटलं, आता तो असेच चेंडू मला टाकेल. मी बोललो, तो तुझा बाप तिथे नॉन स्ट्राईकर एंडला उभा आहे. त्याला सांग, तो (हुक) मारेल. तिथे सचिन तेंडुलकर होता” असं सेहवागने शाहरुख खानला दिलेल्या एका मुलाखतीत सांगितलं होतं.

दुसऱ्या ओव्हरमध्ये त्याने पुन्हा बाऊन्सर टाकला आणि सचिनने सिक्सर मारला. ‘बाप बाप होता है, बेटा बेटा होता है’ असा किस्सा घडल्याचं सेहवाग सांगतो.