AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

श्रीलंका क्रिकेटला सगळ्यात मोठा धक्का, 18 शतक झळकावणाऱ्या ओपनरसोबत 15 खेळाडू देश सोडणार!

श्रीलंका क्रिकेट संघाच्या जवळपास 15 खेळाडूंनी देश सोडून दुसऱ्या देशाकडून क्रिकेट खेळण्याचा विचार केला आहे.

श्रीलंका क्रिकेटला सगळ्यात मोठा धक्का, 18 शतक झळकावणाऱ्या ओपनरसोबत 15 खेळाडू देश सोडणार!
Upul Tharanga
| Updated on: Feb 19, 2021 | 9:05 AM
Share

मुंबई : श्रीलंका क्रिकेट बोर्डाला (Shrilanka Cricket Board ) आणि श्रीलंका क्रिकेट जगताला आतापर्यंतचा सगळ्यात मोठा धक्का बसण्याच्या मार्गावर आहे. श्रीलंका क्रिकेट संघाच्या जवळपास 15 खेळाडूंनी देश सोडून दुसऱ्या देशाकडून क्रिकेट खेळण्याचा विचार केला आहे. यामुळे श्रीलंकेत एकच खळबळ उडाली आहे. आपला देश सोडून अमेरिकन क्रिकेटसाठी हे खेळाडू क्रिकेट खेळू शकतात, असं प्राथमिक अनुमान लावलं जात आहे. (Shrilanka Upul Tharanga 15 Cricketers Planning To leave Country to play For USA)

देश सोडून जाणाऱ्यांमध्ये श्रीलंकेचा धडाकेबाज फलंदाज उपुल थरंगासोबत (Upul Tharanga) 15 खेळाडूंची नावं आहेत. पुढच्या महिन्यात हे 15 खेळाडू अमेरिकेत जाऊ शकतात. इव्हाना त्याची तयारीही सुरु झाली आहे. संघात योग्य संधी न मिळाल्याने तसंच कमी वेतनामुळे या खेळाडूंनी देश सोडून जाण्याचा विचार केला आहे.

श्रीलंकेन वृत्तपत्र द मॉर्निंगच्या अनुसार , हे 15 क्रिकेटर्स आपल्या देशातीतल संघात योग्य न संधी न मिळाल्याने तसंच आर्थिक पातळीवर जास्त फायदा होत नसल्याने हे खेळाडू निराश होते तसंच ते नव्या पर्यायांच्या शोधात होते. पाठीमागच्या महिन्यात ऑलराऊंडर शेहान जयसूर्याने अमेरिकेला जाण्याचा निर्णय घेतल्याने आता त्याच्या पावलावर पाऊल टाकण्याच्या विचारात बाकी खेळाडू आहेत.

उपुल थरंगासह 15 खेळाडू अमेरिकेला जाणार

रिपोर्टनुसार, श्रीलंकेचा धडाकेबाज ओपनर उपुल थरंगा, जलदगती गोलंदाज दुष्यंत चमीरा , अमिला अपोंसो, दिलशान मुनवीरा, लाहिरु मधुयशनका, मनोज सरतचंद्रा आणि निशान जेरीस यांसारख्या खेळाडूंनी अमेरिकेला जाण्याचा निर्णय घेतला आहै. हे खेळाडू मार्चपर्यंत आपला देश सोडून अमेरिकेला रवाना होतील.

श्रीलंकेत चांगलं भविष्य नाही

अमिरेकेला जाण्याचा निर्णय घेणाऱ्या एका खेळाडूने दिलेल्या मुलाखतीत तो म्हणतो, श्रीलंकेत चांगलं भविष्य नाही. यासाठी आम्ही खेळाडूंनी अमेरिकेला जाण्याचा निर्णय. घेतला आहे. जगातील विविध देशांच्या क्रिकेटपटूंना एकत्रित करुन जगाला चांगलं क्रिकेट देण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. वेतन कमी केल्याने तसंच कॉन्ट्रॅक्ट न वाढवल्याने खेळाडू नाराज होते. आमच्या भविष्याची आम्हाला चिंता होती. त्याच चिंतेतून आम्ही पर्यायांचा विचार करत होता. अखेर आता आम्ही अमेरिकेला जाण्याचा निर्णय घेतला आहे.

(Shrilanka Upul Tharanga 15 Cricketers Planning To leave Country to play For USA)

हे ही वाचा :

IPL Auction 2021 Mumbai Indians Live Updates | सचिन तेंडुलकरचा मुलगा अर्जुन मुंबईच्या ताफ्यात

IPL Auction 2021 Highlights | ख्रिस मॉरिसला सर्वात मोठी रक्कम, एकूण 57 खेळाडूंचा लिलाव

कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.