पलाश मुच्छल याच्यासोबतच्या लग्नाच्या विविध चर्चांमध्येच स्मृती मानधना हिचा खळबळजनक निर्णय, थेट भारतीय संघासोबत न जाता…

भारताची क्रिकेटपटू स्मृती मानधना ही सध्या तिच्या खासगी आयुष्यामुळे जोरदार चर्चेत असल्याचे बघायला मिळत आहे. अचानक 23 नोव्हेंबरचे लग्न पुढे ढकलण्यात आले. हेच नाही तर वडिलांची तब्येत खराब झाल्याचे सांगितले गेले. मात्र, आता काही हैराण करणारी खुलासे होताना दिसत आहेत.

पलाश मुच्छल याच्यासोबतच्या लग्नाच्या विविध चर्चांमध्येच स्मृती मानधना हिचा खळबळजनक निर्णय, थेट भारतीय संघासोबत न जाता...
Smriti Mandhana
| Updated on: Nov 26, 2025 | 5:46 PM

भारताची क्रिकेटपटू स्मृती मानधना आणि संगीतकार पलाश मुच्छल 23 नोव्हेंबर रोजी लग्नबंधनात अडकणार होते. दोघे जवळपास सहा वर्षांपासून रिलेशनमध्ये होते. शेवटी त्यांच्या आयुष्यातील सर्वात मोठा लग्नाचा क्षण आला. संगीत, मेहंदी सर्वकाही जोरात झाले. स्मृती आणि पलाश यांच्या संगीतातील काही व्हिडीओ व्हायरल झाले. मस्त सर्वजण आनंदात दिसले. सारी दुनिया से जितके मे आई हूं इधर या गाण्यावर पलाशसमोर डान्स करताना स्मृती दिसली. मात्र, वडिलांची तब्येत खराब झाल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करावे लागल्याने लग्न पूर्ण ढकलण्याचा निर्णय घेतल्याचे सांगितले. हेच नाही तर आता स्मृतीच्या वडिलांना घरी आणले गेले. मात्र, यादरम्यान विविध चर्चा या रंगताना दिसत आहेत. कारण स्मृतीच्या वडिलांनंतर पलाशलाही दवाखान्यात दाखल करण्यात आले.

त्यामध्येच पलाशचे कोरिओग्राफर मेरी डीकोस्टासोबतचे फ्लर्टिंगचे चॅट्स समोर आले. स्मृती मानधनाला लग्नाच्या शेवटच्या क्षणी समजले की, पलाश आपल्याला धोका देत असल्याने आणि त्यामुळेच तिने हे लग्न थांबवण्याचा निर्णय घेतल्याचे सांगितले जातंय. सध्या तूफान चर्चा सुरू असून स्मृती मानधना हिने लग्नाचे काही फोटो आणि व्हिडीओही सोशल मीडियावरून डिलीट केली आहेत.

अमिताभ बच्चन यांच लोकप्रिय शो कौन बनेगा करोडपतीच्या एका विशेष भागात विश्वचषक विजेत्या भारतीय महिला क्रिकेट संघाचा सन्मान केला जाईल. कॅप्टन हरमनप्रीत कौर, हरलीन देओल, रिचा घोष, शेफाली वर्मा, दीप्ती शर्मा, स्नेह राणा आणि प्रशिक्षक अमोल मुझुमदार या एपिसोडमध्ये दिसणार आहेत. मात्र, या लिस्टमध्ये स्मृती मानधना हिच्या नावाचा समावेश नाहीये.

वडिलांच्या बिघडत्या तब्येतीमुळे त्यांचे लग्न रद्द करण्यात आले. लग्न पुढे ढकलल्यानंतर, स्मृतीने तिच्या साखरपुड्याचा व्हिडिओ इंस्टाग्रामवरून डिलीट केला. हेच नाही तर आता काैन बनेंगा करोडपतीमध्येही सहभागी न होण्याचा निर्णय स्मृती मानधनाने घेतल्याचे कळतंय. स्मृती मानधनाच्या खासगी आयुष्यात मोठे वादळ आल्याचे स्पष्ट दिसत आहे. आता सध्याच्या चर्चांवर स्मृती मानधना नेमका काय खुलासा करते हे पाहण्यासारखे ठरेल.