Sourav Ganguly: आता ‘दादागिरी’ चालणार, सौरव गांगुली यांच्याकडे मोठी जबाबदारी, थेट हेड कोच बनले

Sourav Ganguly Headcoch: भारतीय संघाचे माजी दिग्गज फलंदाज सौरव गांगुली यांना एक मोठी जबाबदारी मिळाली आहे.

Sourav Ganguly: आता दादागिरी चालणार, सौरव गांगुली यांच्याकडे मोठी जबाबदारी, थेट हेड कोच बनले
| Updated on: Oct 06, 2026 | 1:47 PM

आयपीएल २०२७ पुढील वर्षी होणार आहे. याआधी, दिल्ली कॅपिटल्सने एक मोठी घोषणा केली आहे. त्यांनी आपल्या नवीन मुख्य प्रशिक्षकाच्या नावाची घोषणा केली आहे. त्यांनी दिग्गज सौरव गांगुली यांची नवीन प्रशिक्षक म्हणून नियुक्ती केली आहे. दिल्ली कॅपिटल्सने ही माहिती इंस्टाग्रामवर शेअर केली. एक व्हिडिओ शेअर करत दिल्ली कॅपिटल्सने लिहिले, “दिल्ली, दादागिरीची वेळ झाली आहे. सौरव गांगुली, टायगर्सचे मुख्य प्रशिक्षक.”

माजी भारतीय क्रिकेटपटू हेमांग बदानी यांनी गेल्या हंगामापर्यंत दिल्ली कॅपिटल्सचे मुख्य प्रशिक्षक म्हणून काम पाहिले होते. आता, सौरव गांगुली मुख्य प्रशिक्षक म्हणून पदभार स्वीकारतील. दिल्ली कॅपिटल्स हा अशा काही संघांपैकी एक आहे ज्यांनी अद्याप आयपीएलचे विजेतेपद जिंकलेले नाही. गांगुली यांचे ध्येय दिल्ली कॅपिटल्सला पहिल्यांदाच चॅम्पियन बनवणे असेल.

Loading...

सौरव गांगुली यांचा दिल्ली संघाशी दीर्घकाळचा संबंध आहे आणि त्यांनी तिथे विविध भूमिका बजावल्या आहेत. मार्च २०१९ मध्ये, गांगुली यांची दिल्ली कॅपिटल्स आयपीएल संघाचे सल्लागार म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. मात्र, ऑक्टोबर २०१९ मध्ये बीसीसीआयचे अध्यक्ष झाल्यानंतर त्यांना दिल्ली सोडावी लागली. बीसीसीआयमधील आपला कार्यकाळ पूर्ण केल्यानंतर, गांगुली क्रिकेट संचालक म्हणून फ्रँचायझीमध्ये परतले. येथे त्यांनी आयपीएल आणि डब्ल्यूपीएल या दोन्ही स्पर्धांमध्ये पडद्यामागील कामकाज आणि संघबांधणीची देखरेख केली. याव्यतिरिक्त, त्यांनी २०२५ च्या एसए२० हंगामात डीसीची फ्रँचायझी, प्रिटोरिया कॅपिटल्सचे मुख्य प्रशिक्षक म्हणून काम पाहिले आणि संघाला अंतिम फेरीपर्यंत पोहोचवले.

आता ते पुढील वर्षी दिल्लीला ट्रॉफी जिंकवण्यासाठी प्रयत्न करतील. दिल्लीने ऋषभ पंतलाही आपल्या संघात पुन्हा सामील केले गेले आहे. पुढील वर्षीसाठी पंत हा दिल्लीच्या कर्णधारपदाचा कारभार सांभाळेल अशी अपेक्षा आहे. मागील दोन हंगाम अक्षर पटेलने दिल्लीच्या कर्णधारपदाचा कारभार सांभाळला होता. पण अपेक्षेऐवढी चांगली कामगिरी झाली नाही. सुरुवात दणक्यात व्हायची पण नंतर मात्र संघ कुठेतरी आपला सूर गमावत असे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us