गांगुली-अमित शाहांची भेट, BCCI च्या अध्यक्षपदी दादा जवळपास निश्चित, जय शाहही महत्त्वाच्या पदी

टीम इंडियाचा माजी कर्णधार सौरव गांगुलीला (Sourav Ganguly BCCI) मिळणार हे जवळपास निश्चित झालं आहे.

गांगुली-अमित शाहांची भेट, BCCI च्या अध्यक्षपदी दादा जवळपास निश्चित, जय शाहही महत्त्वाच्या पदी
Follow us
| Updated on: Oct 14, 2019 | 10:43 AM

नवी दिल्ली : जगातील सर्वात शक्तीशाली क्रिकेट बोर्ड भारतीय क्रिकेट नियामक मंडळ अर्थात बीसीसीआयचं (BCCI President ) अध्यक्षपद, टीम इंडियाचा माजी कर्णधार सौरव गांगुलीला (Sourav Ganguly BCCI) मिळणार हे जवळपास निश्चित झालं आहे. रविवारी मुंबईतील पंचतारांकित हॉटेलमध्ये (Sourav Ganguly BCCI)  सर्वात श्रीमंत क्रिकेट बोर्डाचा अध्यक्ष (BCCI President ) निवडण्यासाठी बैठक झाली.

अध्यक्षपदाच्या शर्यतीत बीसीसीआयचे माजी अध्यक्ष अनुराग ठाकूर आणि एन श्रीनिवास हे गट आमने-सामने होते. श्रीनिवासन गटाकडून ब्रजेश पटेल तर ठाकूर गटाकडून प्रिन्स ऑफ कोलकाता सौरव गांगुली होते.

क्रिकेटमधील या दोन दिग्गज गटांनी आपआपले उमेदवार अध्यक्षपदी बसवण्यासाठी चांगलाच जोर लावला होता. अखेर यामध्ये क्रिकेटमधील दादा अर्थात सौरव गांगुलीने बाजी मारली. मात्र त्याचवेळी ब्रजेश पटेल यांना आयपीएलचे चेअरमन बनवण्यावरही सहमती झाली.

दरम्यान, गृहमंत्री अमित शाह यांचे सुपुत्र जय शाह बीसीसीआय सचिव, तर अनुराग ठाकूर यांचे बंधू अरुणसिंह ठाकूर यांच्या गळ्यात कोषाध्यक्षाची माळ पडू शकते.

गांगुली-अमित शाह भेट

अध्यक्षपदाच्या शर्यतीत श्रीनिवासन गटाने प्रचंड जोर लावला होता. श्रीनिवासन यांनी शनिवारी गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेऊन ब्रजेश पटेल यांची दावेदारी सादर केली होती. मात्र गांगुलीनेही स्वत: अमित शाह यांची भेट घेऊन बीसीसीआय अध्यक्ष होण्याची इच्छा व्यक्त केली होती.

गांगुलीला अनुराग ठाकूरांची साथ

गांगुलीला भाजप खासदार आणि विद्यमान केंद्रीय अर्थ राज्यमंत्री अनुराग ठाकूर यांचीही साथ होती. अनुराग ठाकूर हे मोदी-शाहांच्या मंत्रिमंडळात असल्याने केंद्रात त्यांच्या शब्दाला मान आहे. त्याचा फायदा गांगुलीला झाला.

 तर गांगुली 10 महिने अध्यक्ष

गांगुलीच्या नावावर एकमत झाल्याची माहिती सूत्रांनी दिली. गांगुलीच्या नावावर केवळ औपचारिक शिक्कामोर्तब होणं बाकी आहे. ते झाल्यानंतर गांगुली 10 महिन्यांसाठी अध्यक्षपदाची धुरा सांभाळेल. सध्या गांगुली बंगाल क्रिकेट असोसिएशनचा अध्यक्ष आहे. गांगुलीने स्वत: भारतीय संघाचं कर्णधारपद भूषवलं आहे. त्यामुळे गांगुलीला मैदानातील अनुभव तर आहेच, पण प्रशासनातील अनुभव त्याच्या पाठिशी आहे.

Non Stop LIVE Update
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका.
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर.
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका.
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?.