Sourav Ganguly: सौरव गांगुली यांना ‘दादा’गिरी करणं महागात पडणार, दिल्लीचा कोच बनताच थेट बीसीसीआय…
Sourav Ganguly News: सौरव गांगुली यांना दिल्ली कॅपिटल्सचा कोच बनवला आहे, आता ते कोच बनताच एक वाद निर्माण झाला आहे.

भारताचा माजी कर्णधार सौरव गांगुलीची मंगळवारी दिल्ली कॅपिटल्सच्या नव्या मुख्य प्रशिक्षकपदी नियुक्ती करण्यात आली. गांगुली क्रिकेट असोसिएशन ऑफ बंगालचे अध्यक्ष म्हणूनही कार्यरत आहेत. आता आयपीएलमध्ये दिल्लीच्या कोचपदाचा भार स्विकारल्यानंतर आता गांगुली अडचणीत आले आहे.
गांगुली यांनी एकवेळी दोन सांभाळल्यामुळे त्यांची तक्रार आता बीसीसीआयकडे करण्यात आली आहे. एकाच वेळी दोन पदे भूषवल्यामुळे हितसंबंधांचा संघर्ष निर्माण झाल्याचा संशय होता, परंतु माजी कर्णधाराने हे नाकारले आणि सांगितले की त्यांना लोकपालाकडून आदेश मिळाला आहे. दिल्ली कॅपिटल्सने आयपीएल २०२७ साठी सौरव गांगुलीची नव्या मुख्य प्रशिक्षकपदी नियुक्ती केली आहे. गांगुली माजी भारतीय क्रिकेटपटू हेमांग बदानी यांची जागा घेतील, ज्यांनी या फ्रँचायझीसोबत दोन हंगाम काम केले होते.
हितसंबंधांच्या संघर्षाच्या मुद्द्यावर विचारले असता, सौरव गांगुलीने उत्तर दिले, “माझ्याकडे लोकपालाकडून आदेश आहेत.” गांगुलीला अशा विषयाला सामोरे जाण्याची ही पहिली वेळ नाही. २०१९ मध्ये, तत्कालीन बीसीसीआय लोकपाल, डी. के. जैन यांना गांगुलीच्या भूमिकेबद्दल प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावेळी गांगुली डीसीचे सल्लागार आणि सीएबीचे अध्यक्ष दोन्ही होते.
मुख्य प्रशिक्षक बनण्याबद्दल तो काय म्हणाला?
मात्र, सौरव गांगुलीची आयपीएल फ्रँचायझीचा मुख्य प्रशिक्षक म्हणून ही पहिलीच वेळ असेल. यापूर्वी त्याने गेल्या वर्षी एसए२० मध्ये प्रिटोरिया कॅपिटल्सचा मुख्य प्रशिक्षक म्हणून काम पाहिले होते. दिल्ली कॅपिटल्सचा मुख्य प्रशिक्षक बनल्यानंतर गांगुली म्हणाला, “दिल्ली चांगली कामगिरी करेल. यापुढे मी त्यावरच लक्ष केंद्रित करणार आहे. दिल्ली कॅपिटल्स फ्रँचायझी माझ्या हृदयाच्या खूप जवळ आहे आणि गेल्या अनेक वर्षांपासून या फ्रँचायझीसोबत माझे घट्ट नाते आहे.”
मागील वर्षी दिल्लीची कामगिरी चांगली नसल्याने आता ही मोठी पावले उचलण्यात आली असावी. सौरव गांगुली यांना कोच म्हणून नियुक्त करणे असो किंवा ऋषभ पंतला संघात पुन्हा सामील करणं असो दिल्लीने आता हे मोठे निर्णय घेतले आहेत. दिल्लीचा संघ सोडून पंत लखनौ सुपर जायट्ंसमध्ये गेला होता पण तिथेही त्याला विशेष कामगिरी करता आलेली नाही.