Suresh Raina | चेन्नई सुपर किंग्जला धक्क्यावर धक्के, सुरेश रैना IPL मधून बाहेर

| Updated on: Aug 29, 2020 | 2:20 PM

चेन्नईचा धडाकेबाज खेळाडू सुरेश रैना आयपीएलमध्ये खेळणार नाही. सुरेश रैना संयुक्त अरब अमिराती अर्थात UAE वरुन परतला आहे. (Suresh Raina unavailable for IPL)

Suresh Raina | चेन्नई सुपर किंग्जला धक्क्यावर धक्के, सुरेश रैना IPL मधून बाहेर
Follow us on

IPL2020 यूएई : आयपीएल 2020 सुरु होण्यापूर्वीच चेन्नई सुपर किंग्जला धक्क्यावर धक्के बसत आहेत. CSK संघाशी संबंधित डझनभर स्टाफ कोरोना पॉझिटिव्ह आढळल्यानंतर, आता आणखी एक मोठा धक्का बसला आहे. चेन्नईचा धडाकेबाज खेळाडू सुरेश रैना आयपीएलमध्ये खेळणार नाही. सुरेश रैना संयुक्त अरब अमिराती अर्थात UAE वरुन परतला आहे. येत्या 19 सप्टेंबरपासून IPL 2020 स्पर्धेला सुरुवात होणार आहे. (Suresh Raina unavailable for IPL)

सुरेश रैना खासगी कारणामुळे भारतात परतल्याचं सांगण्यात येत आहे. चेन्नई सुपर किंग्जने याबाबत सोशल मीडियाच्या माध्यमातून ही माहिती दिली. “सुरेश रैना खासगी कारणामुळे भारतात परतला आहे. तो आयपीएल स्पर्धेसाठी उपलब्ध नसेल. चेन्नई सुपर किंग्ज या काळात रैना आणि त्याच्या कुटुंबियांच्या पाठिशी आहे” असं CSK ने ट्विट केलं आहे.

33 वर्षीय सुरेश रैनाने 15 ऑगस्टला आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली. महेंद्रसिंह धोनीने क्रिकेटला अलविदा केला, त्याच दिवशी त्याचा मित्र असलेल्या रैनानेही निवृत्ती जाहीर केली. मात्र रैना आयपीएलच्या सराव सत्रात सहभागी झाला होता. तो संघासोबत दुबईला रवाना झाला होता.  रैनाने कालच ट्विट करुन, जगाची गती मंदावली असेल तर तुम्ही स्वत:चा शोध घेऊ शकता, अशा आषयाचं ट्विट केलं होतं.

सुरेश रैना आयपीएलमधून बाहेर पडणे हा CSK साठी मोठा धक्का आहे. आयपीएलमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या यादीत सुरेश रैना 5368 धावांसह दुसऱ्या स्थानावर आहे. या यादीत टीम इंडियाचा कर्णधार आणि रॉयल चॅलेंजर बंगळुरुचं नेतृत्त्व करणारा विराट कोहली 5412 धावांसह पहिल्या स्थानी आहे.

(Suresh Raina unavailable for IPL)

संबंधित बातम्या 

आयपीएल सुरु होण्याआधीच CSK संघाला मोठा झटका, सपोर्ट स्टाफमधील काही जणांना कोरोना   

भारतीय संघात ‘हा’ खेळाडू असता, तर भारत 2019 चा विश्वचषक जिंकू शकला असता : सुरेश रैना