AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

“सूर्यकुमार यादव 10 वर्ष आयपीएल खेळला, पण वनडेत..”,राहुल द्रविडने स्पष्टच सांगितलं

सूर्यकुमार यादवच्या फॉर्मबाबत चिंता व्यक्त केली जात आहे. त्याच्याऐवजी संघात दुसऱ्या खेळाडूला संधी देण्याची मागणी जोर धरू लागली. या दरम्यान प्रशिक्षक राहुल द्रविडने आपलं मत मांडलं आहे.

सूर्यकुमार यादव 10 वर्ष आयपीएल खेळला, पण वनडेत..,राहुल द्रविडने स्पष्टच सांगितलं
सूर्यकुमार यादवच्या वनडे भवितव्याबाबत राहुल द्रविडने स्पष्टच सांगितल, "दोन वनडेत..."Image Credit source: PTI
| Updated on: Mar 21, 2023 | 10:32 PM
Share

मुंबई : भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया वनडे सिरीजमध्ये 1-1 अशी बरोबरी आहे. त्यामुळे तिसरा आणि शेवटचा सामना निर्णयक ठरणार आहे. शेवटच्या सामन्यापूर्वी सूर्यकुमार यादवच्या फॉर्मबाबत चिंता व्यक्त केली आहे. सूर्यकुमार यादवनं टी 20 सामन्यांमध्ये 1675 धावा केल्या आहेत. त्याचा स्ट्राईक रेट 175 इतका आहे. टी 20 फॉर्मेटमध्ये तो प्रत्येक चेंडूला सामोरं गेला आहे. पण वनडेत मात्र याच्या उलट चित्र आहे. त्याच्या फॉर्मबाबत भारतीय संघाचा प्रशिक्षक राहुल द्रविडने याबाबत आपलं स्पष्ट मत मांडलं आहे.

“दुर्दैवी म्हणजे श्रेयस अय्यर दुखापतग्रस्त आहे. तो चौथ्या क्रमांकावर चांगली फलंदाजी करतो. तो त्या पोझिशनवर सेट झाला होता. या पोझिशनसाठी आम्ही गेल्या दोन वर्षांपासून प्रयत्न करतोय. आम्ही टी 20 सामने भरपूर खेळलो. पण वनडे सामने हवे तितके झाले नाहीत. पण दुखापतग्रस्त असला तरी आमच्याकडे बरेच पर्याय आहेत.”, असं राहुल द्रविडने सांगितलं.

“सूर्यकुमार यादवबाबत काळजी करण्याचं कारण नाही. पहिल्या दोन वनडेत दोन्ही चेंडू जबरदस्त होते. सूर्यकुमार यादव 50 षटकांचा खेळ शिकत आहे. टी 20 फॉर्मेट वेगळा आहे. तो दहा वर्षे आयपीएलमध्ये खेळला. दबावात क्रिकेट खेळला. पण वनडे क्रिकेट तितका खेळला नाही. त्याला खेळायला वेळ दिला पाहीजे. तो नक्कीच चांगलं करेल.”, असं राहुल द्रविडने सांगितलं.

सूर्यकुमार यादवच्या टी 20 यशामागे आयपीएलमधील प्रदर्शन आहे. खेळण्याची शैली आंतरराष्ट्रीय क्रिकेटपेक्षा कमी नाही, असं राहुल द्रविडने सांगितलं. भारतानं या वर्षात आठ एकदिवसीय सामने खेळला आहे. आता नववा सामना चेन्नईत होणार आहे. टीम इंडियाने श्रीलंकेविरुद्ध तीन, न्यूझीलंडविरुद्ध तीन आणि ऑस्ट्रेलियाविरुद्ध दोन एकदिवसीय सामने खेळले आहेत.

तिसऱ्या वनडे बाबत विचारलं असता राहुल द्रविडनं आपलं मत मांडलं. विश्वचषक डोळ्यासमोर ठेवून वनडेमध्ये त्याने जे काही करायचे आहे ते साध्य केले आहे का? त्यावर द्रविडने सांगितलं की, “उद्याचा निकाल काही असो. आम्हाला ती स्पष्टता निर्माण करणे आवश्यक आहे.”

सूर्यकुमार यादवनं फेब्रुवारी 2022 मध्ये 50 पेक्षा जास्त धावा केल्या होत्या. त्यानंतर आजपर्यंत 16 सामातन्य नाबाद 34 ही त्याची सर्वोत्तम खेळी आहे. 32 वर्षीय सूर्यकुमार यादव आतापर्यंत 22 वनडे सामने खेळला आहे. यात त्याचा फलंदाजी सरासरी 25.47 इतकी आहे. सूर्यकुमार यादवने वनडेत एकूण 433 धावा केल्या आहेत.

Follow Us
प्रशांत किशोर राष्ट्रवादीसोबत काम करणार की नाहीत? पार्थ पवारांनी...
प्रशांत किशोर राष्ट्रवादीसोबत काम करणार की नाहीत? पार्थ पवारांनी....
स्वत:चं मेडिकल कॉलेज, लेकाच्या नावापुढे डॉक्टर, मोटेगावकरचं स्वप्न...
स्वत:चं मेडिकल कॉलेज, लेकाच्या नावापुढे डॉक्टर, मोटेगावकरचं स्वप्न....
पंतप्रधान मोदींच्या आखाती दौऱ्यावरून पडळकरांचा मोठा दावा...
पंतप्रधान मोदींच्या आखाती दौऱ्यावरून पडळकरांचा मोठा दावा....
युद्धामुळे नितीन गडकरींच्या व्यवसायाला फटका, निर्यात रखडली; स्थानिक...
युद्धामुळे नितीन गडकरींच्या व्यवसायाला फटका, निर्यात रखडली; स्थानिक....
NEET प्रकरणी सुप्रीम कोर्टात नवी याचिका; NTA ऐवजी स्वतंत्र यंत्रणेकडून
NEET प्रकरणी सुप्रीम कोर्टात नवी याचिका; NTA ऐवजी स्वतंत्र यंत्रणेकडून.
मोठी बातमी! रोहित पवार अचानक मुख्यमंत्र्यांच्या भेटीला, राजकारणात...
मोठी बातमी! रोहित पवार अचानक मुख्यमंत्र्यांच्या भेटीला, राजकारणात....
रेल्वे प्रशासन ॲक्शन मोडमध्ये; मुंबईत अतिक्रमण हटाव मोहीम, गरीब नगरात
रेल्वे प्रशासन ॲक्शन मोडमध्ये; मुंबईत अतिक्रमण हटाव मोहीम, गरीब नगरात.
राहुल गांधींनी शेअर केला नरेंद्र मोदी यांचा परदेश दौऱ्यातील व्हिडीओ...
राहुल गांधींनी शेअर केला नरेंद्र मोदी यांचा परदेश दौऱ्यातील व्हिडीओ....
थरारक दृश्य! एक्सप्रेस रुळावरून घसरली अन् डब्बा थेट 20 फुटावर लटकला...
थरारक दृश्य! एक्सप्रेस रुळावरून घसरली अन् डब्बा थेट 20 फुटावर लटकला....
नागपूर विधानपरिषदेसाठी सर्वपक्षीय फॉर्म्युला? निवडणूक बिनविरोध.....
नागपूर विधानपरिषदेसाठी सर्वपक्षीय फॉर्म्युला? निवडणूक बिनविरोध......