Video : सूर्यकुमार यादवचा तो गगनचुंबी षटकार पाहिला का ?

आशिया चषक आणि ऑस्ट्रेलियाविरुद्ध खराब कामगिरी झाल्यानंतर गोलंदाजांनी कालच्या सामन्यात चांगली कामगिरी केली आहे.

Video : सूर्यकुमार यादवचा तो गगनचुंबी षटकार पाहिला का ?
सूर्यकुमार यादव
Image Credit source: Twitter Video Grab
| Updated on: Sep 29, 2022 | 1:21 PM

ऑस्ट्रेलियाविरुद्ध (Australia) तुफान फलंदाजी करुन चाहत्यांना खुष करणार सुर्यकुमार यादव (Surykumar Yadhav) सद्या चांगल्या फॉर्ममध्ये आहे. सद्या तो टीम इंडियामधील महत्त्वाचा खेळाडू झाला आहे. कारण ऑस्ट्रेलियाविरुद्ध त्याने चांगली खेळी केल्यामुळे टीम इंडियाला (Team India) विजय मिळविता आला. ऑस्ट्रे्लियाविरुद्ध खेळत असताना त्याने त्यांच्या गोलंदाजांची धुलाई केली. त्यामुळे विश्वचषक स्पर्धेत तो चांगली कामगिरी करेल अशी त्याच्या चाहत्यांना आशा आहे.

काल सुद्धा सुर्यकुमार यादवने चांगली फटकेबाजी केली आहे, त्यामुळे त्याचे व्हि़डीओ चाहत्यांनी सोशल मीडियावर शेअर केले आहेत. आफ्रिकेच्या गोलंदाजांची यादवने चांगली धुलाई केली. विशेष म्हणजे कालच्या सामन्यात सुद्धा त्याने अर्धशतक झळकवलं आहे.

आशिया चषक आणि ऑस्ट्रेलियाविरुद्ध खराब कामगिरी झाल्यानंतर गोलंदाजांनी कालच्या सामन्यात चांगली कामगिरी केली आहे. अर्शदीप सिंह आणि दीपक चहर या दोन गोलंदाजांनी काल चांगली कामगिरी केली.

कालच्या सामन्यात गोलंदाजी यशस्वी झाल्यामुळे धावसंख्या कमी झाली होती. सुर्यकुमार यादव आणि केएल या दोघांनी अर्धशतकी खेळी केली. कालचे सुर्यकुमार यादवचे गगनचुंबी षटकार अधिक व्हायरल झाले आहेत.