Suryakumar Yadav : टीम इंडियातून पत्ता कट झाल्यावर सूर्याला आणखी एक मोठा धक्का ? मुंबई इंडियन्स…

भारतीय क्रिकेट संघाच्या टी-20 कर्णधारपदावरून हटवल्यामुळे क्रिकेटर सूर्यकुमार यादवला मोठा धक्का बसला आहे. त्यातच आता त्याच्यासंदर्भात आणखी एक मोठी अपडेट समोर आली आहे. मुंबई इंडियन्समधूनही त्याचा पत्ता कट होण्याच्या चर्चा आहेत.

Suryakumar Yadav : टीम इंडियातून पत्ता कट झाल्यावर सूर्याला आणखी एक मोठा धक्का ? मुंबई इंडियन्स...
सूर्यकुमार यादवला मोठा धक्का ?
| Updated on: Jun 08, 2026 | 12:48 PM

टीम इंडियाचा प्रसिद्ध खेळाडू आणि टी-20चा कर्णधार सूर्यकुमार यादव याला आयर्लंड आणि इंग्लड विरुद्धच्या टी20 सीरिजमधील संघातून वगळण्यात आलं. एवढंच नवन्हे तर त्याला टी-20 चं कर्णधारपदही गमवावं लागलं. आता त्यानंतर त्याला आणखी एक मोठा झटका बसू शकतो. कारण आता आयपीएलमधील मुंबई इंडियन्सच्याया संघामधून बाहेर पडणं निश्चित मानलं जात आहे. गेल्या हंगामात मुंबई इंडियन्ससाठी सूर्यकुमार यादवची कामगिरी खूपच निराशाजनक होती. सूर्याच्या मुंबई इंडियन्समधून बाहेर पडण्याचा सर्वात मोठा पुरावा त्याने उचललेलं एक पाऊल. कारण सूर्याने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून संघाला अनफॉलो केलं आहे.

एवढंच नव्हे तर, सूर्यकुमार यादवच्या इंस्टाग्राम हँडलवर मुंबई इंडियन्सच्या जर्सीमधील त्याचा एकही फोटो दिसत नाही. यावरून सूर्यकुमार यादवने मुंबई इंडियन्स सोडल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे. मात्र, त्याची पत्नी, देविशा शेट्टी, इंस्टाग्रामवर अजूनही मुंबई इंडियन्सला फॉलो करते.

आता कोणत्या संघात जाणार सूर्यकुमार यादव ?

इंडियन प्रीमिअर लीग 2026 साठी मुंबई इंडियन्सने सूर्यकुमार यादवला 16.25 कोटी रुपयांना कायम ठेवलं होतं.सूर्या हा 2018 सालापासून मुंबई इंडियन्सकडून खेळतोय. मात्र अनेक वृत्तांनुसार, जर सूर्यकुमारने मुंबई इंडियन्स सोडले, तर तो त्याच्या पूर्वीचा संघ, अर्थात केकेआरमध्ये परत येऊ शकतो. केकेआरदेखील एका कर्णधाराच्या आणि एका भारतीय अव्वल फळीतील फलंदाजाच्या शोधात आहे. केकेआर व्यतिरिक्त, चेन्नई सुपर किंग्सदेखील सूर्याला आपल्या संघात घेण्यासाठी प्रयत्न करू शकते.

मुंबई इंडियन्ससाठी सूर्याचं प्रदर्शन

आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्ससाठी सूर्यकुमार यादवची कामगिरी उत्कृष्ट रहोती. सूर्याने 2011 मध्ये मुंबई इंडियन्सकडून आयपीएलमध्ये पदार्पण केले, पण त्या हंगामात तो फक्त एकाच सामन्यात खेळला होता. त्यानंतर तो केकेआरमध्ये गेला आणि 2018 साली मध्ये मुंबईच्या संघात परतला. मुंबईसाठी फलंदाजी करताना त्याने आतापर्यंत 127 सामने खेळले आहेत. सूर्यकुमार यादवने दोन शतकांसह 4020धावा केल्या आहेत. दरम्यान, केकेआरसाठी सूर्याने 60 सामन्यांमध्ये 684 धावा केल्या असून, त्यात सीएलटी20 मधील 127 धावांचा समावेश आहे.

Follow Us