IND vs PAK : विजयादरम्यान भारतीय संघात गरमा-गरमी ! कुलदीप यादववर बरसला हार्दिक पंड्या, असं काय घडलं ? VIDEO समोर

टी20 वर्ल्ड कप 2026 मध्ये भारताने पाकिस्तानी संघाची धूळधाण उडवत सुपर-8मध्ये एंट्री केली. या सामन्यात भारताचा फिरकी गोलंदाज कुलदीप यादवने चांगली गोलंदाजी केली, त्याने 3 ओव्हर्समध्ये 14 धावा देऊन 1 विकेट टिपली. मात्र तरीही कॅप्टन सूर्यकुमार यादव आणि हार्दिक पंड्या त्याच्यावर भडकलेले दिसले. नेमकं काय झालं तिथे ?

IND vs PAK : विजयादरम्यान भारतीय संघात गरमा-गरमी ! कुलदीप यादववर बरसला हार्दिक पंड्या, असं काय घडलं ? VIDEO समोर
कुलदीप - हार्दिक पंड्यामध्ये काय घडलं ?
Image Credit source: social media
| Updated on: Feb 16, 2026 | 9:33 AM

आयसीसी मेन्स टी20 वर्ल्ड कप 2026 मध्ये काल दोन पारंपारिक प्रतिस्पर्धी एकमेकांशी भिडले. हाय व्होल्टेज अशा या सामन्यात भारताने पाकिस्तानला सहज लोळवलं आणि 61 धावांनी विजय मिळवला. एवढंच नव्हे तर सुपर-8 मध्येही जागा पक्की केली. पाकवर दणदणीत विजय मिळवल्याने संघातील खेळाडूंसह चाहतेही खुशीत होते. मात्र याच विजयादरम्यान मैदानावरील वातावरण मात्र चांगलंच तापलेलं दिसत होतं. भारतीय खेळाडूंमध्ये काही काळ तणावाच वातावरण दिसत होतं. या घटनेचा व्हिडीओही समोर आला असून नेमकं काय घडलं याचे तर्क-वितर्क लावले जात आहेत.

कोलंबोतील आर प्रेमदासा स्टेडियममध्ये रंगलेल्या सामन्यात भारताने प्रथम फलंदाजीकरत 176 धावांचं मजबूत टार्गेट उभं केलं. मात्र या लक्ष्याचा पाठलाग करताना पाकिसत्नाचा संघ 114 धावांवरच ढेपाळला आणि 18 ओव्हर्समध्येच ऑलआऊट झाला. भारताने पाकवर 61 धावांनी दणदणीत विजय मिळवला. मात्र या मोठ्या विजयनानंतरही एक वेळ अशी आली जेव्हा भारतीय संघातील वातावरण तापलेलं दिसलं.

नक्की घडलं तरी काय ?

खरंतर या मॅचदरम्यान कुलदीप यादव याने बाऊंड्री लाईनवर पाकिस्तानच्या शाहीन आफ्रिदीचा सोपा कॅच सोडला. 18 व्या ओव्हरमध्ये हार्दिक पंड्याच्यादुसऱ्या चेंडूवर शाहीनने स्लॉग खेळण्याचा प्रयत्न केला आणि बॉल उंचावर गेला. तेव्हा भारतीय संघातील खेळाडूव कुलदीप यादव हा बॉलखाली नीट सेट होता, पण अखेरच्या क्षणी एकाग्रता ढळल्याने बॉल त्याच्या हातातून निसटला आणि थेट बाऊंड्रीपार गेला. आणि शाहीनच्या खात्यात 6 धावा जोडल्या गेल्या. विकेटही गेली नाही आणि त्यातच 6 धावा आणखी मिळाल्या.

भडकला हार्दिक पंड्या 

विशेष म्हणजे त्याच्या बरोब्बर आधीच्या चेडूंवर विकेटकीप ईशान किशनलाही कॅच पकडता आला नव्हता. (विकेट मिळवण्याच्या) सलग 2 संधि हातातून निसटल्यामुळे बॉलर हार्दिक पंड्या चांगलाच नाराजा झाला होता. अखेर सामना संपल्यानंतर, जेव्हा खेळाडू ड्रेसिंग रूममध्ये परत जात होते, तेव्हा हार्दिक कुलदीप यादवशी रागावून बोलताना दिसत होता. एवढंच नव्हे तर कर्णधार सूर्यकुमार यादवही कुलदीपवर चिडलेला होता. तिलक वर्माचा चेहरा काळजीने भरलेला होता, तर रिंकू सिंग हा परिस्थिती शांत करण्याचा प्रयत्न करत होता.

 

हार्दिक पंड्याच्या नाराजीचे कारण स्पष्ट होतं. जर कुलदीप यादवने तो कॅच पकडला घेतला असता तर सामना तिथेच संपला असता. त्याऐवजी, कुलदीपने आणखी सहा धावा दिल्या आणि अतिरिक्त चेंडू टाकावे लागले. मोठमोठ्या सामन्यांमध्ये, अशा छोट्या चुका देखील खेळाडूंमध्ये भावनिक प्रतिक्रिया निर्माण करू शकतात.

 

मात्र एवढं सगळं होऊनही हार्दिक पांड्याने उल्लेखनीय व्यावसायिकता दाखवली. त्याने स्वतःला सावरले आणि 18 व्या षटकाच्या शेवटच्या चेंडूवर उस्मान तारिकची विकेट घेतली आणि भारताला दणदणीत विजय मिळवून दिला. दबावाखाली असतानाही सामना संपवण्याती त्याची क्षमता हार्किने या गोलंदाजीने सिद्ध केली. काल पाकिस्तानविरुद्ध मिळालेला हा विजय भारतासाठी अनेक प्रकारे खास होता. एकीकडे, संघाने दबावाखाली चमकदार कामगिरी केली, तर दुसरीकडे, विजय मिळवीनही खेळाडू छोट्या चुकांबद्दल किती गंभीर आहेत हे देखील याने दाखवून दिले. या व्यावसायिक वृत्तीमुळे मोठ्या स्पर्धांमध्ये संघ आणखी मजबूत होतो.