AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Team India: Smriti Mandhana ला ICC चं खास गिफ्ट, या दिग्गजांनाही संधी

भारतीय महिला संघाची स्टार फलंदाज स्मृती मानधनाचा तिच्या उत्कृष्ट कामगिरीमुळे आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने तिचा विशेष यादीत समावेश केला आहे.

Team India: Smriti Mandhana ला ICC चं खास गिफ्ट, या दिग्गजांनाही संधी
महादेव कांबळे
महादेव कांबळे | Updated on: Aug 27, 2022 | 7:38 AM
Share

मुंबईः भारतीय महिला संघाची स्टार फलंदाज स्मृती मानधना (Star Batsman Smriti mandhana) तिच्या बेधडक फलंदाजीसाठी खास ओळखली जाते. स्मृती मानधना सध्या इंग्लंडमध्ये द हंड्रेड क्रिकेट टुर्नामेंट खेळत आहे. ही क्रिकेट स्पर्धा चालू असतानाच स्मृती मानधनाला मोठी आनंदाची बातमी देण्यात आली आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (ICC) तिचे नाव त्यांच्या विशेष यादीत समाविष्ट केले आहे. उपकर्णधार (vice captain) स्मृती मानधना ही भारतीय महिला संघाची युवा सलामीवीर (Young opener) आता तिला शफाली वर्मालाबरोबरच आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने जाहीर केलेल्या “100 Percent Cricket Superstars” यादीत तिचा समावेश केला आहे. शफाली वर्मा, इंग्लंडची सोफी एक्लेस्टोन, न्यूझीलंडची अमेलिया केर, वेस्ट इंडिजची हेली मॅथ्यूज आणि दक्षिण आफ्रिकेची लॉरा वोल्वार्ड या 100 टक्के क्रिकेट सुपरस्टारच्या महिला खेळाडूंचा त्यामध्ये समावेश करण्यात आला आहे.

शुक्रवारी, ICC ने “100 Percent Cricket Superstars” उपक्रमात आणखी पाच खेळाडूंचा समावेश केला – मानधना, फातिमा सना (पाकिस्तान), ऍशले गार्डनर (ऑस्ट्रेलिया), सोफिया डंकले (इंग्लंड) आणि गॅबी लुईस (आयर). 26 वर्षीय मानधना आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये एक दशक पूर्ण करण्याच्या तयारीत आहे. तिच्या कारकीर्दीत तिने स्वतःला जगभरातील सर्वच फॉरमॅटमध्ये खेळणाऱ्यांपैकी एक उत्तम खेळाडू म्हणून स्वतःला सिद्ध केले आहे.

क्रिकेटर ऑफ द इयर

भारतीय महिला क्रिकेटमध्येही मानधना कर्णधार म्हणून उदयास आली खरी पण तिच्या सातत्यामुळे तिला 2021 ICC महिला क्रिकेटर ऑफ द इयर म्हणून तिला नाव देण्यात आले आहे, तर ICC महिला खेळाडूंच्या क्रमवारीत ती ODI आणि T20I मध्ये फलंदाजांसाठी अनुक्रमे 10 व्या आणि 4 व्या स्थानावर आहे.

मानधनाचा खेळ

मानधनाने 74 एकदिवसीय सामने खेळले असून 42.52 च्या सरासरीने 2,892 धावा केल्या आहेत, ज्यामध्ये पाच शतके आणि 23 अर्धशतकांचा समावेश आहे. टी-20 क्रिकेटमध्ये त्याने 92 सामन्यांमध्ये 2,192 धावा केल्या असून ज्यामध्ये 16 अर्धशतकांचा समावेश करण्यात आला आहे. मानधनानेही चार कसोटी सामने खेळले असून एक शतक आणि दोन अर्धशतके केली आहेत.

Follow Us
राहुल गांधींनी आता... मोदींच्या मिमिक्रीवर फडणवीसांचा हल्लाबोल
Devendra Fadnavis : राहुल गांधींनी आता कॉमेडियन बनलं पाहिजे, मोदींच्या मिमिक्रीवर फडणवीसांचा जोरदार हल्लाबोल
तोफेचा गोळीबार अन् लक्ष्याचा क्षणार्धात खात्मा! भारत-अमेरिका...
US India War Practice : तोफेचा गोळीबार अन् लक्ष्याचा क्षणार्धात खात्मा! भारत-अमेरिका संयुक्त युद्धाभ्यासात भारतीय लष्कराची दमदार कामगिरी
विशेष अधिवेशनाची गरज काय? राऊत-रोहित पवारांच्या मागणीवर बन यांचं...
Navnath Ban : विशेष अधिवेशनाची गरज काय? राऊत-रोहित पवारांच्या मागणीवर नवनाथ बन यांचं प्रत्युत्तर, पुढे म्हणाले...
गंगापूर रोडवरील 50 झाडांची कत्तल भोवली; भुजबळांनी दिले महत्वाचे आदेश
Chhagan Bhujbal : गंगापूर रोडवरील 50 झाडांची कत्तल भोवली; भुजबळांनी दिले महत्वाचे आदेश
गणेशोत्सवात महागणपती मंडपात काळीज पिळवटून टाकणारी घटना
Kalachowki : गणेशोत्सवात महागणपती मंडपात काळीज पिळवटून टाकणारी घटना
हार चढवला, पण फुलांचा नाही; मुंबईच्या राजाला चक्क 101..VIDEO व्हायरल
Mumbai Cha Raja : हार चढवला, पण फुलांचा नाही; मुंबईच्या राजाला चक्क 101..VIDEO व्हायरल
दिशा सालियन प्रकरणावर संजय राऊतांची प्रतिक्रीया, म्हणाले...
Sanjay Raut | मातोश्रीवर येऊन प्रसिद्धी मिळवण्याचा प्रयत्न घाणेरडा; दिशा सालियन प्रकरणावर संजय राऊतांची प्रतिक्रीया, पुढे म्हणाले...
भरधाव BMWचा अक्षरशः चक्काचूर! मुंबईच्या कोस्टल रोडवर चालकाचं नियंत्रण
BMW Car Accident | भरधाव BMWचा अक्षरशः चक्काचूर! मुंबईच्या कोस्टल रोडवर चालकाचं नियंत्रण सुटलं अन् BMW थेट खाली कोसळली
शेतात ट्रॅक्टर नाही, थेट ड्रोनची एन्ट्री; मुळशीत अभिनव प्रयोग
Drone In Farm | शेतात ट्रॅक्टर नाही, थेट ड्रोनची एन्ट्री; मुळशीत अभिनव प्रयोग, व्हिडिओ बघाच
पाच दिवसांत चारा छावण्या सुरू करा, रोहित पवारांचा सरकारला अल्टिमेटम
Rohit Pawar | पाच दिवसांत चारा छावण्या सुरू करा, रोहित पवारांचा सरकारला अल्टिमेटम; शेतकऱ्यांसाठी 50 हजारांची मदत अन्...