Rishabh Pant | टीम इंडियाचा रिषभ पंत ठरला ICC Men’s Player of the Month पुरस्कराचा मानकरी

| Updated on: Feb 08, 2021 | 7:18 PM

आयसीसीने (ICC) ट्विट करत याबाबतची माहिती दिली आहे. रिषभ पंत (Rishabh Pant) हा पुरस्कार जिंकणारा पहिलाच क्रिकेटपटू ठरला आहे.

Rishabh Pant | टीम इंडियाचा रिषभ पंत ठरला ICC Men’s Player of the Month पुरस्कराचा मानकरी
रिषभ पंत
Follow us on

दुबई : आयसीसीने (ICC) अर्थात आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने जानेवारी महिन्यातील सर्वोत्तम खेळाडूची घोषणा केली आहे. यानुसार टीम इंडियाचा तडाखेदार फलंदाज रिषभ पंतने ICC Men’s Player of the Month या पुरस्काराचा मान पटकावला आहे. आयसीसीने ट्विट करत याबाबतची माहिती दिली आहे. यामुळे पंत हा पुरस्कार जिंकणारा पहिलाच खेळाडू ठरला आहे. पंतने इंग्लंडचा कर्णधार जो रुट (Joe Root) आणि आयर्लंडचा पॉल स्टर्लिंग (Paul Stirling) यांना पछाडत हा पुरस्कार पटकावला आहे. आयसीसीने या पुरस्कारासाठी या 3 खेळाडूंना नामांकन दिलं होतं. पण अखेर पंत हा पुरस्कार पटकावण्यात यशस्वी ठरला. (Team India rishabh pant winner of the ICC Mens Player of the Month award)

रिषभ पंतने जानेवारी 2021 या महिन्यात 4 डावांमध्ये 81.66 च्या एव्हरेजने 245 धावा केल्या. तसेच 4 कॅचही त्याने घेतल्या. तसेच एकदा मॅन ऑफ द मॅच या पुरस्काराचा मानकरी ठरला. या अशा दणकेबाज कामगिरीमुळे आयसीसीच्या व्होटींग समिती आणि क्रिकेट चाहत्यांनी पंतलाच पसंती दिली.

आयसीसीने नववर्षापासून या नव्या पुरस्काराची घोषणा केली होती. त्यानुसार दर महिन्यात क्रिकेटच्या तिन्ही प्रकारात सर्व आघाड्यांवर शानदार कामगिरी करणाऱ्या खेळाडूंना ICC Men’s Player of the Month पुरस्कार देण्याचं ठरवंल. आयसीसीने 27 जानेवारीला ट्विट करत याबाबतची घोषणा केली होती.

पहिल्या डावात शतकी भागीदारी

दरम्यान पुजाराने इंग्लंड विरुद्धच्या पहिल्या सामन्यातील पहिल्या डावात चेतेश्वर पुजारासह शतकी भागीदारी केली. टीम इंडियाचे सलामीवीर आणि मीडल ऑर्डरमधील मुख्य फलंदाज अपयशी ठरले. त्यामुळे भारताची 73 बाद 4 अशी स्थिती झाली. पण यानंतर चेतेश्वर पुजारा आणि रिषभ पंतने टीम इंडियाचा डाव सावरला. या दोघांनी पाचव्या विकेटसाठी शतकी भागीदारी केली. या भागीदारीदरम्यान दोघांनी वैयक्तिक अर्धशतक पूर्ण केलं. दोघांनी पाचव्या विकेटसाठी 119 धावांची भागीदारी केली. पंतने एकूण 88 चेंडूत 9 फोर आणि 5 सिक्ससह 91 धावांची खेळी केली.

संबंधित बातम्या :

ICC कडून नव्या पुरस्काराची घोषणा, जाणून घ्या निवड प्रक्रिया कशी असणार?

ICC Awards | विराट कोहली दशकातील सर्वोत्तम क्रिकेटर

ICC Awards : आयसीसीकडून दशकातील तिन्ही प्रकारातील सर्वश्रेष्ठ संघाची घोषणा, टीम इंडियाच्या खेळाडूंची चलती

ICC Awards 2020 | धोनीच्या ‘त्या’ निर्णयाला ICC चा कडक सॅल्युट, दशकातील सर्वोत्तम खेळभावना पुरस्कार

(Team India rishabh pant winner of the ICC Men’s Player of the Month award)