AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

आयसीसीच्या Player of the Month पुरस्कारासाठी 3 फलंदाजांमध्ये कडवी झुंज, रिषभ पंत शर्यतीत

आयसीसीने या पुरस्करासाठी टॉप 3 खेळाडूंना नामांकन दिलं आहे. टीम इंडिया (Team India),आयर्लंड (Ireland) आणि इंग्लंड (England) टीमच्या प्रत्येकी 1 खेळाडूला नामांकन देण्यात आलं आहे.

आयसीसीच्या Player of the Month पुरस्कारासाठी 3 फलंदाजांमध्ये कडवी झुंज, रिषभ पंत शर्यतीत
रिषभ पंत, जो रुट आणि पॉल स्टर्लिंग
| Updated on: Feb 02, 2021 | 6:29 PM
Share

दुबई : आयसीसीने अर्थात आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (International Cricket Council) अवघ्या काही दिवसांपूर्वी (Player of the Month) या नव्या पुरस्काराची घोषणा केली होती. यानुसार दर महिन्यात सर्वोत्तम कामगिरी करणाऱ्या खेळाडूला हा पुरस्कार देण्यात येणार असल्याची माहिती आयसीसीने दिली होती. दरम्यान आता आयसीसीने या पुरस्करासाठी टॉप 3 खेळाडूंना नामांकन दिलं आहे. टीम इंडिया (Team India),आयर्लंड (Ireland) आणि इंग्लंड (England) टीमच्या प्रत्येकी 1 खेळाडूला नामांकन देण्यात आलं आहे. आयसीसीने ट्विट करत याबाबतची माहिती दिली आहे. (ICC announced the nominees for Player of the Month award January 2021)

नामांकन कोणाला मिळालं?

टीम इंडियाचा आक्रमक फलंदाज रिषभ पंत (Rishabh Pant), इंग्लंडचा कर्णधार जो रुट (Joe Root) आणि आयर्लंडचा पॉल स्टर्लिंग (Paul Stirling) या तिघांना नामांकन मिळालं आहे. या तिघांनी गेल्या महिन्याभरात म्हणजेच जानेवारीत शानदार कामगिरी केली. रिषभ पंतने ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या चौथ्या कसोटीत निर्णायक क्षणी अर्धशतकी खेळी केली.  इंग्लंडच्या जो रुटने श्रीलंकेविरोधात कसोटी मालिकेत धमाकेदार कामगिरी केली. तर आयर्लंडच्या स्टर्लिंगनेही चमकदार खेळी केली. पंतने टेस्टमध्ये 245 धावा केल्या. रुटने जानेवारीत कसोटीमध्ये एकूण 426 धावा केल्या. तर स्टर्लिंगने एकदिवसीय क्रिकेटमध्ये 420 धावा चोपल्या.यामुळे या तिघांना नामांकन मिळालं आहे.

क्रिकेट चाहत्यांना या तिघांपैकी आवडत्या खेळाडूला व्होट करता येणार आहे. यासाठी तुम्हाला आयसीसीच्या वेबसाईटवर जावून मत नोंदवता येणार आहे. आयसीसीच्या bit.ly/POTM-Mens या लिंकवर जाऊन फेव्हरेट प्लेअरला मत देता येणार आहे. मतदान प्रक्रियेनंतर ज्याला सर्वात मत मिळाली आहेत त्याला हा पुरस्कार मिळणार आहे. आयसीसीकडून 7 फेब्रुवारीला या लकी खेळाडूचं नाव जाहीर करण्यात येणार आहे.

संबंधित बातम्या :

ICC कडून नव्या पुरस्काराची घोषणा, जाणून घ्या निवड प्रक्रिया कशी असणार?

ICC Awards | विराट कोहली दशकातील सर्वोत्तम क्रिकेटर

ICC Awards : आयसीसीकडून दशकातील तिन्ही प्रकारातील सर्वश्रेष्ठ संघाची घोषणा, टीम इंडियाच्या खेळाडूंची चलती

ICC Awards 2020 | धोनीच्या ‘त्या’ निर्णयाला ICC चा कडक सॅल्युट, दशकातील सर्वोत्तम खेळभावना पुरस्कार

(ICC announced the nominees for Player of the Month award January 2021)

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.