ICC Awards : आयसीसीकडून दशकातील तिन्ही प्रकारातील सर्वश्रेष्ठ संघाची घोषणा, टीम इंडियाच्या खेळाडूंची चलती

आयसीसीच्या दशकातील सर्वश्रेष्ठ टी 20 संघाच्या नेतृत्वाची जबाबदारी महेंद्रसिंह धोनीला देण्यात आली आहे.

ICC Awards : आयसीसीकडून दशकातील तिन्ही प्रकारातील सर्वश्रेष्ठ संघाची घोषणा, टीम इंडियाच्या खेळाडूंची चलती
Follow us
| Updated on: Dec 27, 2020 | 4:56 PM

दुबई : आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने अर्थात आयसीसीने  (ICC Men’s T20I Team of the Decade)  दशकातील सर्वश्रेष्ठ टी 20 संघाची घोषणा केली आहे. या संघात टीम इंडियाच्या (Team India) सर्वाधिक खेळाडूंचा समावेश आहे. आयसीसीने टीम इंडियाच्या एकूण 4 खेळाडू्ंना या संघात स्थान दिलं आहे. यामध्ये टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली, ‘हिटमॅन’ रोहित शर्मा आणि ‘यॉर्कर किंग’ जसप्रीत बुमरहाचा समावेश आहे. या संघाच्या नेतृत्वाची जबाबदारी महेंद्रसिंह धोनीला (Mahendra Singh Dhoni) देण्यात आली आहे. (ICC announced T20I Team Of The Decade in this Team 4 players of India)

टीम इंडियाच्या खेळांडूव्यतिरिक्त या संघात ऑस्ट्रेलिया आणि वेस्ट इंडिजच्या प्रत्येकी 2 खेळाडूंना संधी मिळाली आहे. तर आयसीसीने दक्षिण आफ्रिका, अफगाणिस्तान आणि श्रीलंकेच्या प्रत्येकी 1 खेळाडूला संधी दिली आहे.

ऑस्ट्रेलियाच्या अॅरॉन फिंच आणि अष्टपैलू ग्लेन मॅक्सवेल, वेस्ट इंडिजच्या ‘युनिव्हर्सल बॉल’ ख्रिस गेल आणि ऑलराऊंडर कायरन पोलार्ड, तसेच श्रीलंकेच्या लसिथ मलिंगा, आफ्रिकेच्या एबी डी व्हीलियर्स आणि अफगाणिस्तानच्या राशिद खानचा समावेश आहे.

संघात एकूण 3 गोलंदाज

आयसीसीच्या या टी 20 टीममध्ये एकूण 3 फुल टाईम बोलर आहेत. यामध्ये वेगवान गोलंदाज लसिथ मलिंगा आणि जसप्रीत बुमराहचा समावेश आहे. तर फिरकीपटू म्हणून अफगाणिस्तानच्या राशिद खानला संधी मिळाली आहे.

अशी आहे आयसीसीची दशकातील सर्वोत्कृष्ट टी 20 टीम  : महेंद्रसिंह धोनी (कर्णधार), रोहित शर्मा, ख्रिस गेल, अॅरॉन फिंच, विराट कोहली, एबी डी व्हीलियर्स, ग्लेन मॅक्सवेल, कायरन पोलार्ड, राशिद खान, जसप्रीत बुमराह आणि लसिथ मलिंगा.

दशकातील सर्वोत्तम वनडे टीम : रोहित शर्मा, डेव्हिड वॉर्नर, विराट कोहली, एबी डिव्हीलिअर्स, शाकिब अल हसन, एमएस धोनी (यष्टीरक्षक/कर्णधार), बेन स्टोक्स, मिचेल स्टार्क, ट्रेन्ट बोल्ट, इम्रान ताहिर आणि लसिथ मलिंगा.

दशकातील टेस्ट टीम : अॅलिस्टर कूक, डेव्हिड वॉर्नर, केन विल्यमसन, विराट कोहली(कर्णधार), स्टीव्ह स्मिथ, कुमार संगकारा (यष्टीरक्षक), बेन स्टोक्स, आर. अश्विन, डेल स्टेन, स्टुअर्ट ब्रॉड आणि जेस्म अँडरसन.

संबंधित बातम्या :

ICC Decade Awards | आयसीसी दशकातील सर्वश्रेष्ठ क्रिकेटपटू निवडणार, विराट कोहलीला ‘या’ पाच पुरस्कारांसाठी नामांकन

AUS vs IND, 2nd Test 2nd Day Highlights | टीम इंडिया मजबूत स्थितीत, कर्णधार रहाणेचे शतक, दुसऱ्या दिवसखेर 82 धावांची आघाडी

(ICC announced T20I Team Of The Decade in this Team 4 players of India)

Non Stop LIVE Update
धमक्या देणाऱ्यांना माझा नंबर द्या, सुप्रिया सुळेंचा रोख नेमका कुणावर?
धमक्या देणाऱ्यांना माझा नंबर द्या, सुप्रिया सुळेंचा रोख नेमका कुणावर?.
निधीवरून धमकीचा मामला...अजित पवारांचं 'त्या' वक्तव्यावरून स्पष्टीकरण
निधीवरून धमकीचा मामला...अजित पवारांचं 'त्या' वक्तव्यावरून स्पष्टीकरण.
लटकवून लटकवून उमेदवारी मिळाली, राणेंना ठाकरे गटाच्या नेत्यानं डिवचलं
लटकवून लटकवून उमेदवारी मिळाली, राणेंना ठाकरे गटाच्या नेत्यानं डिवचलं.
बाई खुणावेल, डोळा मारेल पण... राऊतांचा नाव न घेता राणांवर निशाणा
बाई खुणावेल, डोळा मारेल पण... राऊतांचा नाव न घेता राणांवर निशाणा.
अजितदादांवर गुन्हा दाखल होणार? शरद पवार गटाच्या नेत्याची मागणी, पण का?
अजितदादांवर गुन्हा दाखल होणार? शरद पवार गटाच्या नेत्याची मागणी, पण का?.
'यमराज'नं भरला लोकसभेचा उमेदवारी अर्ज? रेड्यावर बसून घेतली एन्ट्री
'यमराज'नं भरला लोकसभेचा उमेदवारी अर्ज? रेड्यावर बसून घेतली एन्ट्री.
नाची, डान्सर आणि... नवनीत राणांवर बोलताना संजय राऊतांची जीभ घसरली
नाची, डान्सर आणि... नवनीत राणांवर बोलताना संजय राऊतांची जीभ घसरली.
सुनेत्रा पवारांनी उमेदावारीचा अर्ज दाखल करताच दादांनी भरला डमी अर्ज
सुनेत्रा पवारांनी उमेदावारीचा अर्ज दाखल करताच दादांनी भरला डमी अर्ज.
लोकसभेची निवडणूक म्हणजे अफझलखानाची... अमोल कोल्हे नेमकं काय म्हणाले?
लोकसभेची निवडणूक म्हणजे अफझलखानाची... अमोल कोल्हे नेमकं काय म्हणाले?.
ठरलं... रत्नागिरी-सिंधुदुर्गातून राणे लढणार, भाजपकडून 13 वी यादी जाहीर
ठरलं... रत्नागिरी-सिंधुदुर्गातून राणे लढणार, भाजपकडून 13 वी यादी जाहीर.