ICC कडून नव्या पुरस्काराची घोषणा, जाणून घ्या निवड प्रक्रिया कशी असणार?

आयसीसीने (ICC) ट्विट करत ही घोषण केली आहे.

ICC कडून नव्या पुरस्काराची घोषणा, जाणून घ्या निवड प्रक्रिया कशी असणार?
प्रातिनिधक छायाचित्र
Follow us
| Updated on: Jan 27, 2021 | 5:25 PM

दुबई : क्रिकेटमध्ये (Cricket) सर्वोत्तम कामगिरी करणाऱ्या खेळाडूंना आयसीसी (ICC)दरवर्षी पुरस्कार देऊन सन्मानित करते. उत्साह वाढवण्यासाठी आणि त्यांच्या कामगिरीचं कौतुक करण्यासाठी आयसीसीकडून हे पुरस्कार देण्यात येतात. दरम्यान आयसीसीने आता दर महिन्याला सर्वोत्कृष्ठ कामगिरी करणाऱ्या खेळाडूला पुरस्कराने गौरवणार असल्याची माहिती दिली आहे. आयसीसीने (ICC Player Of The Month) या नव्या पुरस्काराची घोषणा केली आहे. आयसीसीने याबाबतची माहिती ट्विट करत दिली आहे. (icc announces player of the month awards)

तिन्ही फॉर्मेटमधील कामगिरीनिहाय पुरस्कार

हा पुरस्कार कसोटी, वनडे आणि टी 20 अशा तिन्ही फॉर्मेटमधील कामगिरीच्या आधारावर देण्यात येणार आहे. म्हणजेच महिन्याभरात ज्या ज्या खेळाडूंनी चांगली कामगिरी केली आहे, ते खेळाडू या पुरस्काराचे प्रबळ दावेदार असतील.

निवड प्रक्रिया कशी असणार ?

आयसीसीनुसार खेळाडूंची निवड करण्याची जबाबदारी ही icc व्होटिंग अकादमीवर असणार आहे. या अकादमीवरद्वारे पुरस्कारासाठी योग्य खेळाडूंची निवड केली जाईल. या अकादमीमध्ये माजी क्रिकेटपटू, ब्रॉडकास्टर आणि जगभरातील पत्रकारांचा समावेश असणार आहे. ही मंडळी (ICC Player Of The Month) निवडण्यासाठी मतदान करतील. हा पुरस्कार महिला आणि पुरुष अशा दोन्ही प्रवर्गात देण्यात येणार आहे.

या दोन्ही प्रवर्गात पुरस्कारसाठी प्रत्येकी 3 खेळाडूंना नामांकन देण्यात येईल. नामांकन देण्याची जबाबदारी ही नामांकन समितीवर असणार आहे. ही समिती क्रिकेटमध्ये महिन्याभरात दमदार कामगिरी केलेल्या खेळाडूंपैकी टॉप 3 खेळाडूंची निवड करेल. यानंतर नामांकन देण्यात आलेल्या खेळाडूंसाठी मतदान केलं जाईल. यासाठी आयसीसी व्होटिंग अॅकेडमी आणि क्रिकेट चाहते मतदान करतील. या अॅकेडमीतील सदस्यांना आपल्या आवडत्या खेळाडूला इमेलद्वारे आपलं मत देता येणार आहे.

तर चाहत्यांना आयसीसीच्या वेबसाईटवरुन आपल्या आवडत्या खेळाडूला मत देता येणार आहे. त्यासाठी आयासीसीच्या वेबसाईटवर नोंदणी करणं आवश्यक असणार आहे.

या व्होटिंग अॅकेडमीला एकूण 90 टक्के तर क्रिकेट चाहत्यांना उर्वरित 10 टक्के मतदानाचे अधिकार असणार आहेत. ही सर्व प्रक्रिया पार पडल्यानंतर महिन्यातील सर्वोत्कृष्ट महिला आणि पुरुष क्रिकेटपटूंची आयसीसी घोषणा करेल. आयसीसीकडून या पुरस्कार विजेत्या खेळाडूंची नावं प्रत्येक महिन्यातील दुसऱ्या सोमवारी केली जातील.

संबंधित बातम्या :

ICC Awards | विराट कोहली दशकातील सर्वोत्तम क्रिकेटर

ICC Awards : आयसीसीकडून दशकातील तिन्ही प्रकारातील सर्वश्रेष्ठ संघाची घोषणा, टीम इंडियाच्या खेळाडूंची चलती

ICC Awards 2020 | धोनीच्या ‘त्या’ निर्णयाला ICC चा कडक सॅल्युट, दशकातील सर्वोत्तम खेळभावना पुरस्कार

(icc announces player of the month awards)

Non Stop LIVE Update
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका.
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर.
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका.
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?.
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका.
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका.