AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

India vs Australia T 2o | टीम इंडियाचा मालिका विजय, अनुष्काचा विराटसाठी खास मेसेज

टीम इंडियाने ऑस्ट्रेलियाविरोधातील टी 20 मालिकेत 2-0 अशी आघाडी घेतली आहे.

India vs Australia T 2o | टीम इंडियाचा मालिका विजय, अनुष्काचा विराटसाठी खास मेसेज
| Updated on: Dec 07, 2020 | 4:04 PM
Share

सिडनी : टीम इंडियाने दुसऱ्या टी 20 सामन्यात ऑस्ट्रेलियाचा 6 विकेट्सने (India Tour Australia 2020) शानदार विजय मिळवला. या विजयासह टीम इंडियाने मालिकाही जिंकली. टीम इंडियाने 3 टी 20 सामन्यांच्या मालिकेत 2-0 अशी आघाडी घेतली. मालिका विजयामुळे टीम इंडियाचं सर्वच स्तरातून कौतुक केलं जात आहे. तसेच या मालिका विजयामुळे कर्णधार विराट कोहलीची (Team India Captain Virat Kohli) पत्नी आणि सिनेअभिनेत्री अनुष्का शर्मानेही (Anushka Sharma) टीम इंडियाचं अभिनंदन केलंय. तसेच विराटसाठी एक खास मेसेजही दिलाय. team india win t 20 series against australia anushka sharma congratulates his love virat kohli by special message

अनुष्काकडून शुभेच्छा

सिडनीमध्ये शानदार विजय मिळवल्यानंतर विराटने सामन्यातील एक फोटो शेअर केला. ”एक शानदार सामना. संघातील खेळाडूंनी फार चांगली कामगिरी केली” असं कॅप्शन विराटने या फोटोला दिलं. विराटने शेअर केलेल्या या फोटोवर अनुष्काने कमेंटद्वारे शुभेच्छा दिल्या. अनुष्काने कमेंटध्ये हार्ट रिएक्ट केलं. तसेच अनुष्काने इंस्टाग्राम स्टोरीमध्ये टीम इंडियाचा फोटो शेअर केला. यावेळेस अनुष्काने टीम इंडियाला शुभेच्छा दिल्या. “मालिका जिंकलात, फार चांगले खेळलात मेन इन ब्ल्यू”, अशा शब्दात टीम इंडियाचं अभिनंदन केलं. ‘माझ्या प्रेमाला अभिनंदन’ अशा शब्दात अनुष्काने विराटला खास मेसेज दिला.

अफगाणिस्तानच्या खेळाडूकडून टीम इंडियाचं अभिनंदन

टीम इंडियाच्या या मालिका विजयासाठी अफगाणिस्तानच्या खेळाडूने टीम इंडियाचं अभिनंदन केलं. फिरकीपटू रशिद खानने टीम इंडियाचं अभिनंदन केलं.  टीम इंडियाचा हा सलग 10 वा विजय ठरला. टीम इंडियाला ऑस्ट्रेलियाला क्लीन स्वीप देण्याची संधी आहे. या टी 20 मालिकेतील तिसरा आणि शेवटचा मंगळवारी 8 डिसेंबरला खेळण्यात येणार आहे.

विराट पहिल्या कसोटीनंतर मायदेशी

टी 20 मालिकेनंतर टीम इंडिया ऑस्ट्रेलियाविरोधात 4 कसोटी सामन्यांची मालिका खेळणार आहे. या मालिकेतील पहिल्या सामन्यानंतर कर्णधार विराट कोहली मायदेशी परतणार आहे. विराट लवकरच बाबा होणार आहे. विराटच्या घरी जानेवारी महिन्यात नव्या पाहुण्याचं आगमन होणार आहे. या अशा क्षणी विराट आपल्या कुटुंबासोबत वेळ घालवणार आहे. यामुळे विराटला बीसीसाआयने पाल्कत्वाची रजा मंजूर केली आहे.

संबंधित बातम्या :

India vs Australia 2020 | टीम इंडियाचा ‘हा’ खेळाडू वेस्ट इंडिजच्या आंद्रे रसेलपेक्षा सर्वोत्तम : हरभजन सिंह

India vs Australia 2020 2nd T20 Updates : हार्दिकची फटकेबाजी, धवनचे अर्धशतक, अटीतटीच्या सामन्यात टीम इंडियाची ऑस्ट्रेलियावर 6 विकेट्सने मात, सीरिजही जिंकली

team india win t 20 series against australia anushka sharma congratulates his love virat kohli by special message

कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.