IND vs ENG : टीम इंडियाची कुत्र्याशी तुलना ? दिनेश कार्तिकच्या विधानाने खळबळ, नवा वाद पेटणार ?

भारतीय क्रिकेट टीमचा सध्या इंग्लंड दौरा सुरू असून लीड्स कसोटी गमावल्यानंतर, 5 कसोटी सामन्यांच्या मालिकेत टीम इंडिया ही 0-1 ने पिछाडीवर आहे. या कसोटी सामन्यादरम्यान टीम इंडियाची तुलना एका डॉबरमॅन कुत्र्याशी करण्यात आली, दिनेश कार्तिकने त्याचा उल्लेख केला होता, मात्र यावरून आता नवा वाद पेटू शकतो. संपूर्ण प्रकरण काय आहे ते जाणून घेऊया...

IND vs ENG : टीम इंडियाची कुत्र्याशी तुलना ? दिनेश कार्तिकच्या विधानाने खळबळ, नवा वाद पेटणार ?
टीम इंडिया आणि डॉबरमॅन कुत्रा.. तुलना का ?
| Updated on: Jun 25, 2025 | 12:02 PM

इंग्लंडच्या दौऱ्यावर असलेल्या टीम इंडियाला लीड्स टेस्टमध्ये हार पत्करावा लागला असून 5 विकेट्सने निराशाजनक पराभव झाला. या सामन्यात फलंदाजांनी 5 शतके झळकावूनही टीम इंडियाला या पराभवाचा सामना करावा लागला. पहिल्याच कसोटीत हरल्यामुळे 5 कसोटी सामन्यांच्या या मालिकेत भारत आता 0-1 ने पिछाडीवर आहे. आता याच कसोटीच्या निकालानंतर एक धक्कादायक गोष्ट समोर आली आहे. लीड्स कसोटीनंतर टीम इंडियाची तुलना ही चक्क डॉबरमॅन कुत्र्याशी करण्यात आली असून त्यामुळे नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे. दिनेश कार्तिक स्काय स्पोर्ट्सवर याबद्दल बोलला तेव्हा हे उघडकीस आले. मात्र ही तुलसना नेमकी का झाली, काय आहे प्रकरण? जाणून घेऊया.

टीम इंडिया आणि डॉबरमॅन कुत्रा.. तुलना का ?

टीम इंडियाची डॉबरमॅन कुत्र्याशी तुलना कोणी केली, दिनेश कार्तिकने याबद्दल कधी आणि काय म्हटलं? सर्वप्रथम, ते जाणून घेऊया. इंग्लंडच्या ब्रॉडकास्टर चॅनल, स्काय स्पोर्ट्सवर, माजी भारतीय यष्टीरक्षकाने याबद्दल सांगितलं. त्याने ट्विटरवर कुठेतरी पाहिलं की टीम इंडियाची फलंदाजी डॉबरमॅन कुत्र्यासारखी आहे, ज्याचे डोके चांगले आहे, मधला भाग ठीक आहे, परंतु ज्याला शेपूट नाही. त्याचं हे बोलण सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. या विधानामुळे चांगलीच खळबळ माजली असून नवा वाद पेटण्याची चिन्हे आहेत.

 

दिनेश कार्तिकने जे सांगितलं त्यामागचं कारण काय ?

आता प्रश्न असा आहे की दिनेश कार्तिकने सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या गोष्टीचा उल्लेख का केला? आणि भारतीय फलंदाजीची तुलना डॉबरमॅन कुत्र्याशी का करण्यात आली ? त्याचे उत्तर खरोखरच भारताच्या फलंदाजीत लपलेले आहे का ? हे जाणून घेऊया.

दिनेश कार्तिकने ट्विटरवरील ज्या विधानाचा उल्लेख केला, त्यात टीम इंडियाचं डोकं (हेडला) चांगलं म्हटलं आहे. भारतीय फलंदाजी क्रमातील हेड म्हणजे टॉप ऑर्डर. जर आपण लीड्समध्ये खेळलेल्या भारताच्या दोन्ही डावांवर नजर टाकली तर टॉप ऑर्डरची कामगिरी चांगली झाल्याचे दिसून आलं. या कसोटीच्या दोन्ही डावांमध्ये, टॉप ऑर्डरमधील फलंदाजांनी विकेटवर टिकून रहात शतक झळकावलं, यशस्वी आणि गिलने पहिल्या डावात शतक झळकावले असेल, तर केएल राहुलने दुसऱ्या डावात शतक झळकावले.

त्यानंतर या विधानात मधला भाग ओके म्हटला आहे, म्हणजे टीम इंडियाची मिडल ऑर्डर. येथे याचा अर्थ मधल्या फळीशी आहे, तिथे ऋषभ पंतने धावफलकावर खूप धावा केल्या. त्याने दोन्ही डावात शतक झळकावले. त्याच्याशिवाय जडेजा आणि करुण नायर यांनीही काही चांगल्या धावा केल्या.

पण डॉबरमन कुत्र्यांना शेपटी नसते. जर आपण टीम इंडियाच्या संदर्भात या विधानाचा अर्थ लावला तर टीममधील टेलएंडर्स देखील अपयशी ठरले आहेत. टेलच्या खराब कामगिरीमुळे भारताचा स्कोअरबोर्ड काही धावांनी कमी पडला. लीड्स कसोटीच्या पहिल्या डावात 6 विकेटवर 453 धावा करणारी टीम इंडिया नंतर फक्त 471 धावांवर ऑलआउट झाली. तर दुसऱ्या डावात 6 विकेट्स गमावून 335 धावा करणाऱ्या टीम इंडियाचा सर्व खेळ पुढे अवघ्या 364 धावांवर आटोपला.

इंग्लंडच्या खालच्या फळीने म्हणजेच शेवटच्या 5 विकेट्सनी पहिल्या डावात 189 धावा केल्या. त्या तुलनेत, भारतीय संघात्या खालच्या फळीला फक्त 55 धावा करता आल्या.