सानिया मिर्झा हिचा घटस्फोटानंतर दुसऱ्या बाळाबद्दल अत्यंत मोठा खुलासा, थेट म्हणाली, मी एग्स..

भारताची स्टार टेनिस खेळाडू अर्थात सानिया मिर्झा मागील काही दिवसांपासून तिच्या खासगी आयुष्यामुळे जोरदार चर्चेत आहे. नुकताच सानियाने तिच्या खासगी आयुष्याबद्दल अत्यंत मोठा खुलासा केला. तिने दुसऱ्या बाळाबद्दल भाष्य केले.

सानिया मिर्झा हिचा घटस्फोटानंतर दुसऱ्या बाळाबद्दल अत्यंत मोठा खुलासा, थेट म्हणाली, मी एग्स..
Sania Mirza son
| Updated on: Nov 25, 2025 | 10:01 AM

भारतीय टेनिस स्टार सानिया मिर्झा हिने पाकिस्तानी क्रिकेटर शोएब मलिकसोबत लग्न केले. दोघांचा एक मुलगा आहे. 2024 मध्ये अचानक विभक्त होण्याचा त्यांनी निर्णय घेतला. यादरम्यान शोएबने पाकिस्तानी अभिनेत्रीसोबत लग्न केले. सानिया अजूनही सिंगल आहे. सानिया अनेकदा सोशल मीडियावर दु:खी पोस्ट शेअर करताना दिसली. घटस्फोटावर भाष्य करणे टाळताना सानिया दिसली. आता घटस्फोटाच्या काही महिन्यानंतर घटस्फोटावेळी काय काय आयुष्यात घडत होते हे सांगताना सानिया मिर्झा दिसली. सानिया मुलगा इजहान याच्यासोबत दुबईत राहते. आता नुकताच सानियाने तिच्या आयुष्याबद्दल अत्यंत मोठा खुलासा केला. सानिया मिर्झाने तिचा मुलगा इजहानला 2018 मध्ये जन्म दिला.

घटस्फोटानंतर दोन वर्षांनी सानियाने दुसऱ्या बाळाबद्दल मोठे विधान केले. सानिया मिर्झाने तिच्या पॉडकास्टमध्ये फराह खानसोबत बोलताना खुलासा केला की, तिने एग्स फ्रीज केले होते. सानिया म्हटले की, मला एग्स फ्रीज करायचे होते, त्यावेळी मी तुमच्याशी संपर्क केला. त्यावेळी मला फिरोजा पारीखची ओळख तुम्ही करून दिली. सानिया पुढे म्हणाली की, मी इजहानला नैसर्गिकरित्या जन्म दिला आणि त्यानंतर मी एग्स फ्रीज केले.

हेच नाही तर पुढे सानिया मिर्झा हिने थेट म्हटले की, मी सर्वांना आवाहन करते की, त्यांनीही एग्स फ्रीज केले पाहिजेत. कारण बायोलॉजिकल क्लॉक सुरू आहे. पहिल्यांदाच सानिया मिर्झा तिच्या सेकंड प्रेग्नंसीबद्दल बोलताना दिसली. हेच नाही तर पहिली गर्भधारणा नैसर्गिक होती, असेही सानिया मिर्झाने स्पष्ट केले. सानिया मिर्झाला अजून एक बाळ हवे होते, हे तिच्या बोलण्यातून स्पष्ट झाले.

अचानक सानिया मिर्झा आणि शोएब मलिक यांच्या आयुष्यात मोठे वादळ आले आणि दोघांनी घटस्फोट घेतला. लग्नाच्या अगोदर कित्येक वर्ष दोघांनी एकमेकांना डेट केले आणि त्यानंतर त्यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. मात्र, अचानक दोघांनी घटस्फोट घेतला. सानियाला इजहानसोबत अजून एक बाळ पाहिजे होते हे तिच्या बोलण्यावरून स्पष्ट झाले. सानिया मागील काही दिवसांपासून तिच्या खासगी आयुष्याबद्दल अनेक खुलासे करताना दिसत आहे.